बस वेगात जात होती. ...................................

चिरुमाला (भाग ३)

Submitted by मिरिंडा on 14 May, 2018 - 08:48

बस वेगात जात होती . माझे विचार मात्र मागे मागे जात होते. पाटलांचा विचित्र वाडा. त्यातलं ते चित्र. त्या चित्रातली ती स्त्री , मला आता तर पाटलीणबाईंसारखी वाटू लागली. हे चित्र नक्की कोणाचं आहे ? ते तिथे का होतं. आणी त्याचा आकार बदलणं, दुसऱ्या भिंतीवरतीही तेच चित्र उमटणं. या सगळ्याच गोष्टींचा मला तरी संदर्भ लागत नव्हता. नाही म्हणायला. पूर्वी एक पुस्तक असंच वाचनात आलं होतं , की पृथ्वीवरील कोणत्याही जागेचं चित्र तिथे न जाता काढता येण्याची कला अगदी प्राचीन होती म्हणे आणि मुख्य म्हणजे असे चित्रकार पाचेक हजार वर्षांपूर्वी होते असेही त्यात लिहिले होते.

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - बस वेगात जात होती. ...................................