नातं

Submitted by Malkans on 11 September, 2018 - 21:54

दृश्य एक
प्रवास ST मधला ..... ST लांब पल्ल्याची .... गर्दी नव्हती .... मधील बाक रिकामी .... मी नेहमी लांब पल्ल्याची गाडी असेल आणि आरक्षण नसेल तर तीस नंतरच्याच बाकावर बसतो . एका थांब्यावर गाडी थांबली .. एक जोडपं गाडीत चढलं आणि गाडी सुटली .... बायको पुढे आणि नवरा मागे ...बायको पुढच्या बाकाच्या इथे थांबली ... नवरा तिच्याकडे लक्ष नं देता मागील बाकाकडे आला आणि झर्रकन खिडकी जवळच्या बाकावर जाऊन बसला आणि एकटाच असल्याप्रमाणे खिडकी बाहेर पाहू लागला ..... बायको शांतपणे त्याच्या शेजारी येऊन बसली .
गाडी जस जशी पुढे जाऊ लागली तशी गाडीत गर्दी वाढू लागली.... आतातर गाडीत खूपच गर्दी झाली . बायको आक्रसून बसली , हल्लीची बाक अरुंद असतात . वेगवेगळ्या प्रवाश्यांचे हलके हलके धक्के बायकोला बसत होते . धक्यांनी बायको त्रस्त .... नवरा खिडकीतील हवा खात आपल्याच धुंदीत होता , बायकोने एकदोनन्दा नवऱ्याला खुणेने सांगितलं ...नवरा आपल्याच धुंदीत ...... बायकोचा नाईलाज ... बायको अगतिक !

दृश्य दोन
प्रवास ST मधला ..... ST लांब पल्ल्याची .... गर्दी नव्हती .... मधील बाक रिकामी .... मी नेहमी लांब पल्ल्याची गाडी असेल आणि आरक्षण नसेल तर तीस नंतरच्याच बाकावर बसतो . एका थांब्यावर गाडी थांबली .. एक जोडपं गाडीत चढलं आणि गाडी सुटली .... बायको पुढे आणि नवरा मागे…बायको मधल्या बाकाच्या इथे येऊन थांबली .... नवरा पुढच्या बाका शेजारी थांबला , दोघात खाणाखुणा झाल्या ..... नवरा बायकोच्या बाकाच्या इथे आला ... बायको खुणेनी नवऱ्याला खिडकीजवळ बसण्यास सांगत होती ..... नवऱ्याने खुणेच तिला खिडकी जवळ बसावयास सांगितले .... बायको खिडकी जवळ बसली .. नवरा तिच्या शॅजारी .... बसल्या पासून दोघंही गप्पात रंगले ......
गाडी जस जशी पुढे जाऊ लागली तशी गाडीत गर्दी वाढू लागली.... आतातर गाडीत खूपच गर्दी झाली ...वेगवेगळ्या प्रवाशांचे बसणारे हलके हलके धक्के नवरा परतवून लावत होता . दोघांच्याही गप्पा चालूच होत्या .. बायकोने खुणेने नवऱ्याला आपल्या बाजूला सरकायला सांगितलं , नवरा बायकोकडे थोडा सरकला .......जणू धक्यांपासून बायकोच संरक्षण करीत होता ...नवरा आनंदात .बायकोही आनंदात .... !

परीक्षण
या दोन दृशायातून दोन्ही जोडप्यांची वृत्ती ( attitude ) आणि दोघांमधील मानसिक संबंध कसे असतील याचे अंदाज करावयाचे आहेत ज्यांचे अंदाज सूक्ष्म आणि चांगले वाटतील त्यांना vinata foods कडून एक मॅंगोपल्प ची बाटली भेट म्हणून देण्यात येईल , ज्यांना भेट मिळणार आहे त्यांना कोणताही खर्च नं करता त्यांच्या हातात भेट वस्तू मिळेल.
आपले परीक्षण www.vinatafoods.com
या संकेत स्थळाला भेट देऊन contact निवडून तेथे नमूद करा

धन्यवाद

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिली बायको स्वतःहून थांबली आणि नवऱ्याला पुढे जाऊ दिले खिडकी जवळ ची शीट पकडायला. एकमेंकवर खूप प्रेम वाटत आहे.

दुसरी बायको नवऱ्याच्या धाकाखाली आहे.तिला स्वतःचे मत व्यक्त करू दिले जात नाही आहे. स्त्री पुरुष असमानता स्पष्ट दिसत आहे. तिला खिडकीत बसायची इच्छा नसतानाही जबरदस्ती बसायला लावले गेले आहे.