स्वाइन फ्लू.. नो क्लू.. !!!
जगभरात कहर माजवणार्या या स्वाईन फ्लू च्या साथीमुळे कित्येकांच्या मनात दहशत निर्माण झालीय. दररोज पेपरचे रकाने मृतांच्या आकड्याने भरलेले असतात. एकट्या भारतात डिसेंबर पासून सुमारे १५०० लोक या रोगाला बळी पडले आहेत. गुजरात आणि राजस्थानात ही संख्या जरी जास्त असली तरी झपाट्याने इतर शहरांतही हा रोग पसरत चालला आहे.