महाराष्ट्र

सिग्नल

Submitted by अतुल बिबवे on 26 December, 2013 - 18:09

वेळ दुपारची, मित्रमंडळहून अप्पा बळवंत चौकात चाललो होतो. सारसबागेजवळचा सिग्नल लाल झाला तसा थांबलो, शक्यतो थांबतो नेहमी (एक पुणेकर असूनसुद्धा). काही कारण नसताना डावीकडे पाहिले आणि पाहतच राहिलो, मला ती फार आवडली, जास्त वेळ नाही मिळाला पण सिग्नल हिरवा होईपर्यंत पाहिलं. हाताच्या अंतरावर उभी होती ती. ज्यावेळी मी तिला पाहिले अगदी त्याचवेळी तिनेसुद्धा माझ्याकडे पाहिले. त्या क्षणी भुवया जवळ झाल्या आणि विस्मृतीत गेलेल्या आपल्या माणसाकडे पाहावे तसे आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

गुंतवणूक आणि ट्रेडिंग मार्गदर्शन

Submitted by अज्ञ on 15 December, 2013 - 10:54
तारीख/वेळ: 
29 December, 2013 - 18:30 to 21:30
ठिकाण/पत्ता: 
सहानी वाडी राधाबाई म्हात्रे रोड दहिसर (प) (सभासद संख्या वाढल्यास बदलण्यात येईल आणि तसे व्यक्तीशः कळवले जाईल. संपर्क : ९९३०९०१९८८

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग कसे करावे? हा प्रश्न बर्याच वेळेस विचारला जातो. त्या अनुशंगाने एक कार्य शाळा आयोजित करण्यात येत आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश असेल.

  • ट्रेडिंग योग्य शेअर्स कोणते
  • खरेदी - विक्री योग्य वेळ कशी ओळखावी
  • ट्रेडिंग कसे करावे इत्यादी विषयी मार्गदर्शन
  • पुढील संपूर्ण वर्षभर ट्रेडिंग साठी मार्गदर्शन
माहितीचा स्रोत: 
स्वतः
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

स्टार कसा आहे.

Submitted by अज्ञ on 12 December, 2013 - 02:02

स्टार (एन एस इ कोड ),५३२५३१ (बी एस इ कोड)
रुपये ५०० प्रती शेअर एवढा घसघशीत लाभांश जाहीर झाला आहे.
१९/१२/२०१३ ला एक्स डीविडंड होत आहे.
काय करावे ?

बाजार भाव ८९२ (१२/१२/२०१३ )

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

माधुरी मिडल्क्लास - स्टार प्रवाह

Submitted by मुग्धटली on 28 November, 2013 - 00:44

स्टार प्रवाहवर कालपासुन एक नवीन मालिका सुरु झाली आहे. स्टार वनवरच्या सुप्रसिद्ध साराभाई v/s साराभईची ही कॉपी आहे, पण मालिका छान काढली आहे.
नावः- माधुरी मिडल्क्लास
वाहिनी:- स्टार प्रवाह
प्रसारण वेळ:- रोज रात्री ९:३० ते १०:३०
कलाकारः-
१. अमिताभ राजे Amitabh Raje.jpg (साराभईमधल्या सतीश शहाच्या रोलमध्ये)
२. माया राजेMaya Raje.jpg (साराभईमधल्या सतीश शहाच्या बायकोच्या (नाव नाही आठवत) रोलमध्ये)

प्रांत/गाव: 

भट म्हणता आयडी हत्या

Submitted by तथास्तु on 10 October, 2013 - 02:01

आजकाल मायबोलीवर काय चाललय काही कळत नाही. भट शब्दाच्या उच्चाराबरोबर आयडी खल्लास होतो. एका धागाप्रवर्तकाने स्वतः

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

म्हणे अंतर आपल्यातलं शहाणं आहे

Submitted by ashishcrane on 12 September, 2013 - 03:39

म्हणे अंतर आपल्यातलं शहाणं आहे Happy

अंतर आपल्यातलं शहाणं आहे,
रुसलं कुणी की येणं त्याचं,
दुखलं कुणी की जाणं आहे,
अन् म्हणे अंतर आपल्यातलं शहाणं आहे Happy

प्रांत/गाव: 

सांग ना

Submitted by ashishcrane on 12 September, 2013 - 03:38

सांग ना

मनाचेच आहेत हे खेळ सारे,
क्षणात जाणले मी, तरी तुला इतका वेळ का रे?

झोंबले मला अन् तुला स्पर्शतही नाहीत हे वारे?
एकटीच सोसू का मी हे शहाऱ्याचे भारे?

गणित सारखे आपुले, तरी आकडे वेगळे का रे?
होता धरलास हात जेव्हा, तेव्हाच हिशोब जुळले ना रे?

मिटल्या पापण्या की दिसे आपल्या स्वप्नांची दुनिया,
तू कसा परका स्वप्नांना? खरंच झोपतोस ना रे?

धृतराष्ट्र होता अंध खरा, पण तू बनलास गांधारी का रे?
माझ्या प्रश्नांचं उत्तर म्हणुनी तरी तू माझाच ना रे?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

अविस्मरणीय प्रसंग

Submitted by नीतु on 30 May, 2013 - 01:03

प्रत्येकाच्या आयुश्यात असा एक तरी प्रसंग घडतो जो आपण कधीच विसरु शकत नाही. आम्ही एकदा
ट्रेनने डोंबीवलीला वाढदिवसाला चाललो होतो. प्रेझेंट्चा बोक्स आम्ही वरती ठेवला होता . डोंवीवली स्टेशन आलं आणि आम्ही उतरलो. ट्रेन निघुन गेल्यावर लशात आले. प्रेझेंट वरच राहिले. मुकाट्याने पाकिटात पैसे घातले आणि आम्ही वाढदिवसाला गेलो. तो वाढदिवस आम्ही कधीच विसरु शकलो नाही.

तुमच्याही आयुश्यात असे काही अविस्मरणीय प्रसंग घडले असतील तर लिहा.........

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र