भाजपचे सरकार तरले

Submitted by नितीनचंद्र on 12 November, 2014 - 03:16

आज महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मतदानाने सिध्द न करता आवाजी मतदान पध्दतीने नवनिर्वाचित लोकसभा अध्य्क्षांनी निर्णय देऊन सरकार तारले. एकदा गुप्त मतदानाची मागणी आली नाही की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा फायनल असतो. त्यावर कुठेही दाद मागता येत नाही ही लोकशाहीची तांत्रीक प्रक्रिया झाली आणि म्हणुनच जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणुन शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची निवड झाली आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची मागणि करताच तो विषय संपला आहे असे विधानसभा अध्यक्षांनी जाहिर केले.

वास्तविक सुरवातीला प्रस्ताव मताला टाकताना आवाजी मतदानाने निर्णय करायचा किंवा नाही ही प्रक्रिया लोकशाहीला आणि सभागृहाच्या परंपरेला धरुन आहे परंतु ती नैतीकतेला धरुन आहे किंवा नाही असा प्रश्न विरोधी पक्ष किंवा जनता विचारु शकते.

हे सरकार चालणे महत्वाचे आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष मतदानाला गैरहजर रहाणार हे स्पष्ट होते. यामुळे आवाजी मतदानात२८६ सदस्यापैकी ४१ सदस्यांचा सुर बहुमताच्या समर्थनार्थ होता.

हा प्रस्ताव गुप्त मताला टाकायला हवा होता असे मला वाटते. जी खद्खद शिवसेना आणि काँग्रेसच्या मनात राहील तेव्हढाही चान्स भाजपने द्यायला नको होता.

यात राष्ट्रवादीवर आम्ही अवलंबुन राहिलो नाही असे दाखवण्याचा प्रयत्न भाजपचा असेल तर योग्य नाही. यातुनच स्थिर सरकार देण्याची राष्ट्रवादीची घोषणा आणि सरकारला सहकार्य देण्याची अपक्षाची विश्वासार्हता तपासता आली असती.

दुर्दैवाने असे न केल्याने सहामहिन्यांनी पुन्हा अविश्वासाचा ठराव दाखल होण्याची शक्यता आहे जी किमान एक ते दोन वर्षे टाळली जाउ शकली असती.

भारतातल्या लोकसभेत आणि अनेक राज्यांच्या विधानसभेत अल्पमतातले सरकार चालवण्याचे शिवधनुष्य काँग्रेस / भाजप सह सर्वच प्रमुख पक्षांनी पेलले आहे. यात अनेकदा त्यांना यश किंवा अपयश मिळाल्याने लोकसभा किंवा विधानसभा कार्यकाळ पुर्ण करु शकले नाही हाही इतिहास आहे.

पक्षीय स्वार्थापुढे निवडणुकीतल्या निकालाचा जनादेश आणि त्याचा अर्थ लावणे ह्याला चर्चेसाठी एक मुददा या पेक्षा किंमत नाही असे म्हणावे लागेल. हा जनादेश सोयीचा अर्थ लाऊन अल्पमतातले सरकार आपल्या सोयीसाठी पाडणे हा खेळ लोकसभेत भाजपने केलेला आहे तसा इतर पक्षांनी सुध्दा केलेला आहे.

या उलट अत्यंत भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालणे. जनतेचा हिताचा विचार न करता सोयीचे राजकारण करत सरकारची मुदत एकाच पक्षाला असलेल्या बहुमताच्या आधारे पुर्ण करणे हा खेळ ही सर्वच पक्षांनी केलेला आहे आणि जनतेने पाहिलेला आहे.

सर्व पक्षात काही दगड आणि काही विटा इतकाच काय तो फरक. जनतेला अल्पमतातले सरकार येण केण प्रकाराने चालवणे मंजुर नसते कारण सरकार पक्षाची सगळी ताकद हा सरकार टिकवण्यात खर्च होते. या उलट अल्पमतातले सरकार केजरीवालांनी जसे सोडले तेही मंजुर नसते कारण ते चालवायचा अटोकाट प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात विकासाचे दिवस मात्र कमी होत जातात. हे उघड सत्य स्विकारण्याशिवाय जनतेला दुसरा पर्याय रहात नाही.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ToI has always been a pro-governement paper.

औद्योगिक उत्पादन वाढणे आणि किंमती कमी होणे यामागे नवीन (आता साडेपाच महिने जुन्या) सरकारने उचललेली नक्की कोणती पावले, कशी कारणीभूत झाली? या दोन्ही गोष्टींना नेमकी सुरुवात केव्हा झाली? तपासणार का?

http://www.business-standard.com/article/opinion/the-numbers-add-up-1140...

when it comes to consumer price inflation, it must be noted that the month after Mr Chidambaram left office, it fell to 7.3 per cent year-on-year, a 30-month low.

Even growth, which Mr Chidambaram failed to protect while fending off an external crisis, showed signs of hope with May industrial production growing for the second consecutive month - and at 4.7 per cent, a 19-month high.

Almost all of the above post is eligible for lekha-jokha, that is not the subject matter of this bb. I was simply stating the public mindset to not accept any good news as good news.

Phone posting is a pain so taking a break. Hopefully someone else might be here who is thinks that the due process has definitely been followed ☺

.... and it not तरले but जिंकले.

ध चा मा करणारी पेशवाई आली आहे ,काय तर म्हणे ण ला ण आणि न ला न म्हणणार मुख्यमंत्री आला आहे ,ईतका लबाड आणि कावेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितलेला नाही. थेट जनतेचीच फसवणुक. राज्य टोलमुक्त करु असे सांगुन सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी फक्त जाचक टोल बंद करणार, टोलमुक्ती अशक्य आहे असे सांगुण बारामतीच्या काकांच्या कोलांट्यांना लाजवेल अशी कोलांटी मारली.
लोक काँग्रेसला साठ वर्षे का निवडुन देत होते ते समजेल भाजप्यांना आता...

धि का, ते मोदीकाकांच्या पावलावर पाऊल टाकून चालताहेत. मोदींच्या बिफोर आफ्टर सारखंच यांचंही आहे. ट्विटरमुळे मी असं बोललोच नाही हे बोलायचीही सोय नाही.

कालच्या प्रकाराबद्दल मला काय वाटलं तें-
१] भाजपने काल विधानसभेत मखलाशी केली, यात शंकाच नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा त्यानी घेतला हें स्पष्ट आहे व तें लोक लक्षात ठेवणारच आहेत. मग निदान, ' आम्ही मागितला नसताना त्यानी पाठींबा दिला व तो आम्ही नाकारला नाहीं व त्यासाठी कोणतीही अट मान्य झालेली नाही ', इतकं तरी जाहिरपणे सांगण्याची हिम्मत भाजपकडून अपेक्षित होती; विशेषतः, फडणविसांच्या प्रतिमेशी हें नि:संशय विसंगत होतं;

२] काल विश्वासदर्शक ठरावाला विधानसभेत आवश्यक तें बहुमत मिळालंय याबद्दल कुणालाही शंका नाहीय; पण आवाजी मतदानामुळे भाजपने राष्ट्रवादीचा पाठींबा घेतल्याचं स्पष्ट असलं तरी जाहिरपणे सिद्ध झालं नाहीं, हें सेनेच्या जिव्हारीं लागलंय. भारताच्या घटनेचा 'गळा दाबला' हा गळा उगीचच काढतायत सेनेचे नेते; कालही, टीव्हीवरच्या चर्चेत सेनेचे नेते [ अडसूळ] भाजप व मोदींवर भ्रष्टाचाराचे, पवारांबरोबर अभद्र युति असल्याचे आरोप ज्या बेजबाबदारपणे करत होते, त्यावरून भाजप-सेना संयुक्त सरकार महाराष्ट्रात आलं नाहीं, हेंच बरं झालं असं वाटलं. [ भाजप भ्रष्ट राकॉचा पाठींबा घेतय याचा सेनेला जर इतका संताप आलाय तर त्यांच्याच मतें इतक्या भ्रष्ट असलेल्या भाजपशीं हातमिळवणी करायला इतकी उत्सुक कां होती सेना, हें अडसूळना कुणीतरी विचारायला हवं होतं !]. या सर्व प्रकारात भाजपबद्दल लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकणारच पण सेनेबद्दल तर अढी व तिरस्कारच निर्माण होण्याची शक्यता अधिक;

३] आपण एक परिपक्व विचाराचा, लोकानीं दिलेला कौल मनापासून स्विकारणारा लोकशाहीवादी पक्ष आहोत, असा मोठ्ठा नैतिकतेचा आव आणणारी काँग्रेस मात्र बुरी तरहसे उघडी पडली काल !!!

भाजप्यांना लोक सरड्याची उपमा देत आहे म्हणुन सरड्यांनी मोर्चा काढुन निषेध नोंदवला आहे. त्यांच्या मते सरडे ते फक्त रंग बदलतात वृत्ती नाही Wink

विरोधी पक्ष नेता शिवसेनेचा झाला आहे की काँग्रेसचा ? काल फडणनिस सारखे काँग्रेसला बोलत होते अविश्वास ठराव आणा अविश्वास ठराव आणा. शिवसेना आपल्यात नाही हे विसरुन गेले का

फडणविस बरंच काही विसरुन गेलेत .. अगदी स्वत:ची निवडणुकपूर्व वक्तव्य देखिल (आता त्यांना मुक्ताफळं म्हणायला हरकत नाही)

भाजपा : सत्ताधारी आहात तसेच वागा, काम करा. उथळपणा बंद करा. लुझ कॉमेंट्स बंद करा. उठ सुट माध्यमात जाऊन प्रसिद्धीलोलुप बोलु नका घोषणा करु नका. सरकार कसे चालवायचे असते ते नीट शिका. हो हो भाजपला हा अनुभव नाहीये. मोदींची गुजरातमधले आणि शिवराज चौहानांची मध्यप्रदेशातली सलग ३ री टर्म सोडली तर भाजपाचा सरकार चालवण्याचा अनुभव खुपच कमी आहे. बाकी सगळीकडेच ते just for a change म्हनुन सत्तेत आले होते. जशे आले तशेच गेले पण होते.

काँग्रेस : आता तुम्ही विरोधात आहात. उठसुट विरोध करायचा म्हनुन विरोध करुन शक्तिपात करु नका. विस्कळीत झालेली संघटना बांधणीकड लक्ष द्या....

शिवसेना / रा काँ : जमल तर तुम्ही नक्की काय ते ठरवा कोणाच्या बाजुने आहात ते.

मनसे : तुम्ही नक्की काही करायचे की नाही ते पहिले ठरवा. करायच ठरल तर?????

आम जनता : भाजपावर विश्वास ठेऊन सगळ्यात जास्त उमेदवार निवडुण दिलेत ना आपण. २ नंबर्‍अच्या पक्षापेक्षा दुप्पट आहेत ते पण पुर्ण नाहीयेत. तर त्यांना काम करण्याची संधी द्या. त्यासाठी जर ते आतुन बाहेरुन खालुन वरतुन कोणाचा जरी पाठींबा घेत असले तरी काम तर करु द्या. त्यांनी काम केल तर परत निवडुन देऊ नाही केल तर त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईलच ना. ३ दिवसात अस काय काम करु शकणार आहेत ते.... wait & watch......

३ दिवसात अस काय काम करु शकणार आहेत ते.... wait & watch......>>> ओह ओह.... 'आप' च्या वेळी भाजपायींचे वागणे कसे होते ते आठवा!

धागा वाहत्या गप्पांचे पान झालेला आहे त्यात लेखकाने बदल करावा म्हणजे सर्व मते संदर्भासह शाबूत राहतील.

सुशांत तुम्च्या पोस्टमधे दम आहे.

धागा वाहताच राहिल.. भाजपाने कसं आपल्याविरुद्ध किती मते पडली ते कळु नये म्हणुन गेम केला, तसंच! Wink

राज्यातलं सरकार तरलं किंवा बुडलं तरी फेरनिवडणुकांशिवाय जे करायचं ते करा राव! दर सहा महिन्यांनी ड्युटी करायचा वैताग येतो. आणि एकेका CPS साठी इतक्याजणांची गाढवमेहनत आणि कैच्याकै खर्च येत असेल (माझी अंदाज करायची मजल तेवढीच) तर अख्ख्या राज्यासाठी केवढा येईल? फेरनिवडणुका व्हायच्याच असतील तर ऑनलाईन करा. लोकांना उद्योग नसल्यासारखं आणि पैसा उतू जात असल्यासारखं निवडणुकांची नाटकं नकोत.

<< लोकांना उद्योग नसल्यासारखं आणि पैसा उतू जात असल्यासारखं निवडणुकांची नाटकं नकोत >> सहमत. लोकाना मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यापेक्षां राजकीय पक्षाना व त्यांच्या नेत्याना मतदानानंतरच्या त्यांच्या जबाबदारीची सक्त ताकीद देणं खरं महत्वाचं आहे; लोकशाही टीकण्यासाठी आतां तें अधिक आवश्यक ठरतंय.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/BJP-Governer/a...

आवाजी मतदानाच्या बळावर विश्वासदर्शक ठराव जिंकणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली संख्याबळाची आकडेवारीच राज्यपालांकडे दिली नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे सत्ता सिंहासनावर बसलेल्या भाजपासोबत नेमके किती आमदार आहेत, याविषयी राज्यपालसुद्धा अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

---

धागाकर्त्याकडे नक्कीच माहीती असेल खर तर त्यालोकांनी इथे विचारायला हवे होते. नितिनचंद्र इत्यादींनी नक्कीच छातीठोक पणे उत्तरे दिली असती. Wink चुकीच्या ठिकाणी माहीती विचारली वाटते

छातीठोकपणे ?

इश्श ! भाजप्यांची छाती नका बै ठोकू .

कदाचित त्यातल्या चार बरगड्याही मेड इन बारामती असतील .

मी काय राज्यपालांचा सचीव आहे ? आर टी आय खाली विचारा आणि आवश्यकता असल्यास राष्ट्रपतींकडे तक्रार करा. छाती ठोकायची तिथे ठोकीनच.

काऊ, फाट्यावर मारतो तुला.

हे सरकार चालणे महत्वाचे आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष मतदानाला गैरहजर रहाणार हे स्पष्ट होते. यामुळे आवाजी मतदानात२८६ सदस्यापैकी ४१ सदस्यांचा सुर बहुमताच्या समर्थनार्थ होता >

नितीन भाउ. इथे कशापाई छाती ठोकलीत Wink

काऊ, फाट्यावर मारतो तुला.<<< Lol

स्वतंत्ररीत्या वाक्य वाचून फार हसू आले.

(ह्या हसण्याचा काऊ व फाट्यावर मारणारे ह्यांच्या ह्या धाग्यावरील मतांशी संबंध जोडला जाऊ नये)

'छातीठोक'पणे असा एक शब्द मराठीत अस्तित्वात आहे त्याचा ठोकण्याशी काही संबंध नाही का मग?