शिव स्मारक ????

Submitted by घारुआण्णा on 7 December, 2014 - 04:25

http://www.bharatchannels.com/zee24taas-marathi-news-videos-watchonline/new-del...

मुंबई जवळच्य समुद्रात , शिव स्मारक बांधायला पर्यावरण बांधण्याचा मार्ग मोकळा
नुकतेच वरील बातमी आणि आणि संबधित व्हिडेओही पाहीला.. आणि खरोखरच आनंद वाटावा की खेद ,
मुर्खपणा कि कोत्या राजकारणाची कीव करावी असे अनेक प्रश्न समोर आले.
मुंबई सारख्या आधिच गजबजलेल्या आणि आर्थिक , संरक्षण दृष्ट्या महत्वाच्या शहरा जवळ असे स्मारक उभारणे , आणि त्यामुळे आपण अस्मिता जपल्याचा आव आणणे कितपत योग्य हेच कळेनासे झालेय.
स्मारक जरुर असावे , छत्रपतीचे नाव , तो इतिहास , जनतेपर्यन्त आणि जगा पर्यन्त गेलाच पाहिजे हा नक्की विषय आहे . पण काहि कोट रुपये खर्चुन समुद्रातच का हे काही समजले नाही.
आणि या विषयाकडे फारसे कोणी गांभिर्यानेही पाहीले नाही.
आज महाराष्टातील सुमारे ३५० किल्ल्यांपैकी काही काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या मार्यात नामशेष होत चालेले आहेत .
राजगड सारखा १ल्या राजधानीच किल्ला , रायगड सारखा अभेद्य गड जे आजही पर्यटन द्रुष्ट्या विकसीत करुन स्मारक रुपात जतन करणे शक्य आहे, त्यावर नीधी ही तुलनेने कमी लागेल , अशी परिस्थीती असताना कोणाच्या राजकिय आणि आर्थिक फायद्यासाठी हा घाट घातला जातोय हेच कळत नाही.
राजगड , रायगड, शिवनेरी, प्रतापगड यासारखी ठेकाणे तद्ज्न्य लोकांच्या मार्गदर्शनाखाली, आजुबाजुच्या निसर्गाला धक्का न लावता, त्याच बरोबरीने स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करत आंतराष्ट्रीय नकाशावर उत्तम पर्यटन क्षेत्रे म्हणुन पुढे आणता येणार नाहीत का.
केवळ आर्किओलोजिकल खात्याचे नाव सांगत आपल्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि उगाचच नको त्या ठीकाणी नीधी आणि श्रम वाया घालवायचे ....
एकिकडे विक्रांत सारखा अमुल्य ठेवा आता भंगारच्या दिशेने वाटचाल करतोय आणि दुसरीकडे भरसमुद्रात स्मारकाच्या गप्पा.....
अनेक गड वेड्या आणि सच्च्या शिव प्रेमींची कदाचित हीच भावना असेल पण हे घडावे कसे या बद्दल काहीच उपाय कळत नाही.
या विषयावर अधिकाधिक चर्चा व्हायला हवी...

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुतळ्या समोर पुजा करनारा पुजारी नसतो धुप अंगारा हळद-कुंकू,फुल-पत्ते,नारळ्,प्रसाद विकनारे दुकानदार असे काहिच नसते किंवा नवस उपास-तापास भजन-किर्तन असेही काही चालत नाही म्ह्णुन तर पुतळ्याना विरोध होत नसेल ना?>>>>>> नाय, बेवडे येऊन काहीतरी उपद्व्याप करत्यात. राजकारणी लोक किन्वा कोणीतरी वेडा दोन धर्मात/ जातीत तेढ माजावी म्हणून चपलान्चा हार वगैरे घालुन जातो.

मेरे रन्गमे रन्गनेवाले असे म्हणून पुतळ्याला विद्रुप करतो, मग हे गोन्धळ माजतो. बन्द, मोडतोड, आगी असले चावट प्रकार सुरु होतात म्हणून पुतळेच नको, त्यापेक्षा त्या पुतळ्यान्चे जिवन्त असतानाचे ( म्हणजे ती जी कोण व्यक्ती हयात असतानाचे) महान कार्य पुढे चालु ठेवा.

पुतळा उभारण्याचा निर्णय हा आम जनतेचा आहे का? जर तो निर्णय एखाद्या राजकिय पक्षाचा किंवा नेत्याचा असेल तर जनतेचा निधी पुतळा उभारणी साठी जनतेचा पैसा वापरणे गैर वाटते.

बरं भव्यदिव्य पुतळा उभारायचाच आहे आणि अगदी अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखां, तर तो BOTच्या माध्यमातूनही उभारता येऊ शकेल. आज BOTच्या उड्डाणपुलांसाठी, महामार्गांसाठी आम्ही पैसे मोजतोच ना.. मग इथे मोजू.. पर्यटकही मोजतील... जनतेला वेठीस धरु नये.

वीणा सुरू | 17 December, 2014 - 21:46
माझी एक गंभीर सूचना आहे.

जर पुतळा बसवावा आणि तो ही समुद्रातच असं ठरलंच असेल तर मग समुद्रात खोलवर विमानतळ बनवावा.
http://www.mumbainet.com/template1.php?CID=15&SCID=1
या नकाशात Butcher Island हा भाग विमानतळासाठी आदर्श वाटतो. इथून चेंबूर, भायखळा आणि मानखुर्द मार्गे इतर ठिकाणी पटकन जाने सोयीचे होईल.

तिथे जाणारे रस्ते असे बनवावेत की ते जागतिक मापदंड बनावेत. या विमानतळाच्या रस्त्यावर सर्व वंदनीय आणि थोर महापुरूष आणि स्त्रियांचे पुतळे बसवावेत. जसे की संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, दादोजी कोंडदेव, जिजामाता, पहिला बाजीराव, रामशास्त्री प्रभूणे माधवराव पेशवे, लोकमान्य टिळक,न्यायमूर्ती रानडे, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतीकारक हुतात्मा चाफेकर बंधू, झाशीची राणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, प. पू. सावरकर, प. पू. डॉ. केशवराव हेडगेवार, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. ही यादी कमीजास्त होऊ शकते. एखादी थीम असेल तर विमानतळावरून शहराकडे येताना त्याप्रमाणे पुतळे पाहता येतील. पुतळ्याखाली थांबण्याची सोय व संग्रहालय, माहीती इ. असेल तर येणा-यालाही आनंद वाटेल.

कल्पना कशी वाटली ते कळवा. यामधे सुधारणा सुचवाव्यात ही विनंती. शासनाने याची नोंद घ्यावी म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत.

-->तुम्हाला खरेच वाटतेय का कि हि कल्पना शासन ऐकेल ? Happy

वीणा सुरू, भारी आणि एकदम ओरिजिनल झँटॅमॅटिक कल्पना आहे.
देवा, कसलं टॅलेंट माबोवर वेस्ट चाललंय.(धागा वाहता असल्याने)
कुणी तरी पटकन कॉपीपेस्ट करून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना कळवा.

अश्विनी के - जहाजं समुद्रात नांगरली जातात की बेटावरही ?
इथे मी शक्यता गृहीत धरल्यात.

- पुतळा उभारायचाच हे ठरलंच आहे.
- समुद्रातच उभारायचा आहे.

समुद्रात उभा करायचा असल्यास उगाच खर्च करण्याऐवजी चीन की कुठल्या देशाने समुद्रात उभारलेल्या विमानतळावर एनजी वर फिल्म दाखवली होती तसा स्टेट ऑफ द आर्ट विमानतळ आणि त्याला जोडणारा रस्ता उभारला गेल्यास तंत्रज्ञान आणि इतर गोष्टीही पणाला लागतील आणि राज्य व देशाच्या लौकीकात भरच पडेल असा मुद्दा होता. यामुळे पनवेल च्या परिसरात विमानतळ नेऊन तिकडे वाहतूक कोंडी, प्रचंड भाववाढ , लॅंडमाफीया हे चक्रही थांबेल.

( जवाहर बेट रिकामे करता येउ शकेल किंवा अन्य पर्याय शोधता येतील. समुद्रातच नव्याने बांधायचे तर कोण थांबवणार ? )

च्रप्स- शासन ऐकणार की नाही याची चर्चा चालू आहे का ?

साती - मनापासून म्हणत आहात की उपहासाने ? Lol
तुमच्या प्रतिसादाने फेबुवरील कैलासजीवन या आयडीची आठवण झाली.

वीणा सुरू, भारी आणि एकदम ओरिजिनल झँटॅमॅटिक कल्पना आहे.
देवा, कसलं टॅलेंट माबोवर वेस्ट चाललंय.(धागा वाहता असल्याने)
कुणी तरी पटकन कॉपीपेस्ट करून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना कळवा.+१११११

>>>वाहता धागा म्हणजे काय ?<<<

एक असा धागा जो तुम्ही काढला असतात तर अनेकजण एका मोठ्या आनंदापासून वंचित राहिले असते.

बेफिकीर.:हहगलो:

वीणा, इथे आपण तुम्ही, आम्ही लिहीलेले उद्या परत वाचु शकतोय, पण इतर घडामोडी सारखे जे धागे आहेत त्यावर आज लिहीलेले उद्या वाहुन गेलेले असते ( जर माबोकरानी उड्या मारुन मारुन भरभरुन प्रतीसाद दिले असतील तर).

>>>असे धागे ठेवावेत तरी कशाला मग?<<<

काही लोकांना आयुष्यातील बहुतांश कालावधी अश्या पानांवर व्यतीत करता यावा म्हणून

वीणा सुरु, सरळ म्हणतेय.
मस्तं कल्पना आहे तुमची. म्हणजे आम्ही विमानातून खाली बघतोय आणि वरून एकेक पुतळा आयडेंटिफाय करतोय ही फारच रम्य कल्पना आहे.
वाहता धागा म्हणजे ३०प्रतिसादच एका धाग्यावर रहातात. ३१ वा आला की पहिला प्रतिसाद वाहून जातो.
म्हणजे पहिले प्रतिसाद वाहूनच जातात.
याऊलट स्थिर धाग्यावर २००० प्रतिसाद देता येतात जे अ‍ॅडमिनचा मूड असेपर्यंत कायम रहातात.

फेसबुक मला निरर्थक वाटत असल्याने अजिबात वापरत नाही म्हणून कैलासजीवन कोण हे माहित नाही.

@साती Happy
२००० प्रतिसाद !! बाप्रे. कोण वाचत असेल एव्हढे प्रतिसाद ? मुळात एखादा धागा इतका चालतो हेच आश्चर्य आहे.

वाहता धागा - आलं लक्षात. आभार. सेव्ह करून ठेवला आहे माझा प्रतिसाद.

बेफिकीर, तुम्ही गूढ प्रतिसाद का देत आहात ?

>>>असे धागे ठेवावेत तरी कशाला मग?<<<

काही लोक मायबोलीवर चोवीस तास पडीक असतात ... इतका data जमेल कि सर्वर कोसळेल delete नाही केला तर