गुंतवणुक

घरामध्ये पैसे गुंतवावेत का?

Submitted by निक्षिपा on 11 November, 2019 - 08:10

थोडक्यात नमनाला तेल, आम्ही सधन मध्यमवर्गीय कुटुंब (मी, नवरा, मुलगा) असून मुंबई उपनगरात १ RK (जो १ BHK) मध्ये बनवून घेतला आहे अश्या सोसायटीमध्ये राहतो. आमची २५ वर्ष जुनी सोसायटी आहे, जिला कुठल्याही सोयीसुविधा (गॅलेरी, गार्डन, स्विमिंगपूल वैगेरे उपलब्ध नाहीत.) आमचे स्वप्न आहे गॅलेरीवाले, चांगल्या अमिनिटीज असलेले आणि स्विमिंगपूल असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये स्वतःसाठी २ बीएचकेचे (विकेंड स्पेशल) घर घ्यावे. मुंबईत तर शक्य नाही म्हणून आम्ही मुंबई जवळच्या पालघर या ठिकाणी आमच्या बजेटमधील घर घेण्याचा विचार करतोय. आमचे घराचे बजेट साधारण २५ ते ३० लाख असून काही रकमेचे लोन काढून घर घेणार आहोत.

शब्दखुणा: 

अमेरिकेत घर खरेदी

Submitted by कटप्पा on 3 November, 2019 - 21:13

सरळ मुद्द्यावर येतो .
एक घर आवडले आहे , ऑफर एक्सेप्ट झाली आहे .

20% डाउनपेमेंट करणे चांगले कि 5/10 टक्के विथ मोटगेज इन्सु हा माझा प्रश्न आहे .

घर तीन वर्षाने विकण्याचे असू शकेल , परत भारतात जाण्याचा प्लॅन आहे .

जाणकारांच्या सल्ल्याचा आणि उत्तरांच्या प्रतीक्षेत . हा सिरीयस धागा आहे .

शब्दखुणा: 

लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे पुरेसे?

Submitted by कोहंसोहं१० on 1 November, 2019 - 22:10

माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही.

म्हाडा updates

Submitted by हस्तर on 10 October, 2019 - 05:33

बरेच लोक नवीन फ्लॅट खरेदी असतात पण कामाच्या गडबडीत म्हाडा च्या घोषणा बघायच्या विरून जातात म्हणून हा एक धागा
तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० लाखाला १ bhk आहे
कोणी फीडबॅक देऊ शकेल ?
ह्या भागात ह्या वर्षी पूर आला होता का ?

सोळा आण्याच्या गोष्टी - लाट - रत्न

Submitted by रत्न on 10 September, 2019 - 15:11

धोधो पाऊस पडत होता... तासभर फोनमध्ये रमलेल्या जोशीकाकुनी स्तब्ध नजरेने डोके वर करुन जोशीकाकांकडे पाहिले.. जोशीकाकांना म्हणाल्या - लाट आली आहे..!
जोशीकाकांनी ऐकले आणि चष्मा ठिक करुन तडक शेजारच्या विनुताईना जाऊन म्हणाले -विनुताई जपुन रहा बरे! लाट आली आहे..!
वेंधळी विनुताई बावळट सुनेला जाऊन लगेच म्हणाली, अग लाट आली आहे..! माझ्या समीर बाळला सारखे फोन करुन तो नीट असल्याची खात्री कर बरे...!

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 August, 2019 - 02:47

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

आनंद ओसंडून चाललाय पहा

शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी

सासू लाटतेय चपाती

अन भाजतेय सून मोठी

धाकटीने घातलाय कपड्याना पीळ

मधलीने बसवलीय द्वाड पोरांना खीळ

छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं

इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ?

महालाला लाजवेल अशी घराची शोभा

महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा

घराला घरपण माणसांनीच येते

भुई चालेल कमी , पण लागते घट्ट नाते

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 

लाल करा ओ माझी लाल करा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 23 August, 2019 - 08:53

लाल करा ओ , माझी लाल करा

येता जाता लाल करा

पुसा मला तुम्ही येता जाता

पुसूनि पुरते हाल करा ,

लाल करा ओ लाल करा

येता जाता लाल करा

भजा मज तुम्ही भाई दादा

तुमचाच राहीन , पक्का वादा

गॉड बोलुनी बेहाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

समजू नका मज ऐरागैरा

नीट बघून घ्या माझा चेहरा

या गोंडस, लोभस मित्रासाठी

प्रेमाची पखाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

नका कटू कधी बोलत जाऊ

बनेन मग मी शंभू न शाहू

च्छाताड पुढे , फुगतील बाहू

शब्दखुणा: 

कोण वरडला शिंच्या " भूत भूत "

Submitted by सिद्धेश्वर विला... on 26 June, 2019 - 03:59

कोण वरडला शिंच्या " भूत भूत "

जुळता जुळता ऱ्हायलं माझं सूत

भूत असे दिसते का म्हायासवें ?

तुमच्या मायची *त

बाळिंगा भरात आयलान व्हता

पर मामी अर्धीच उजायली

*त चोंदता चोंदता रहायली

जवा तुमच्यासायी कार्टी आयली

केबर धुस्सूनश्यान मच्छर झायले

मच्छरान चावून चावून *वडे लावियले

खाजवूनश्यान अंग पार , रात सुजायली

ठोकायचंच र्हायले , लेका ठोकायचंच र्हायले

आता कुटूर कुटूर व्हता ,

व्हयल गाव सारं जाग

कोंबडी सोडूनश्यान दे भायेर

मले कर जागा लपायले

खाजवून खाजवून गे मामे

ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र

Submitted by सिद्धेश्वर विला... on 17 June, 2019 - 06:29

ती म्हणाली " चिमणी "

मी म्हणालो भुर्रर्रर्र

ती म्हणाली " कावळा "

पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र

आलतूफालतू उत्तरं देऊन

आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र

लक्षात ठेवून होतो चांगलंच

गुढघ्यात असते अक्कल

डोकं बाजूला ठेऊन काम होतंय

थोडीच पाहिजे शक्कल

कशाला करावा अभ्यास ?

कशाला हवी ती नोकरी ?

कुणी सांगितलंय घासायला

पटवावी श्रीमंत बापाची छोकरी

सासरा बिचारा राबेल

कन्या भोळीच असेल

होऊन जायचं घरजावई

आपोआप झोळी भरेल

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक