इंग्रजी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

२०१२ मधे बातम्या.कॉम मायबोली वेबसमुहात सामील झाली. नंतर २०१४ मधे आपण बातम्या एकत्र दाखवणार्‍या, हिंदी आणि कानडी भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. त्यानंतर २०१५ मधे बंगाली आणि गुजराती भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या. यावर्षी नुकतीच आपण इंग्रजी भाषेतली बातम्यांचे मथळे एकत्र दाखवणारी वेबसाईट सुरु केली आहे. बातमी संपूर्ण वाचायची असेल तर मूळ स्रोताची लिंकही तिथेच दिली आहे.


news.khabar.io-: India news online from many newspapers

बातम्या.कॉम वर सुरुवातीपासून मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतल्या बातम्यांचे मथळे आहेत. इतर भाषेतल्या वेबसाईटवरही इंग्रजी विभाग आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. प्रशासनाच्या दृष्टीने , नवीन सुविधा देण्याच्या उद्देशाने आणी वाचकांना सोपे व्हावे म्हणून एकत्रित इंग्रजी विभाग सुरु करतो आहोत. काही दिवसात प्रत्येक भाषेतल्या पानांवरच्या इंग्रजी बातम्या कमी करून त्या सगळ्या एकाच इंग्रजी विभागात पाहत येतील. हे काम बहुतांशी पुरेही झाले आहे.
बहुतेक सगळ्ञा मोठ्या न्यु़ज माध्यमांच्या वेबसाईटचे दुवे तिथे दिले आहेत. पण तुम्ही नेहमी भेट देता ती बातम्या संबंधीची एखादी वेबसाइट आम्ही अजून जोडली नसेल तर जरूर सांगा , त्या वेबसाईटचीही लिंक देऊ.


news.khabar.io - India news online from many newspapers

hindi.khabar.io - हिंदी.खबर.आयो - खबर आयो, समाचार लायो !


batmya.com - Marathi news ऑनलाईन मराठी बातम्या एका जागी

bangla.khabar.io - Bangla News বাংলা খবর


gujarati.khabar.io - Gujarati News ગુજરાતી સમાચાર

kannada.khabar.io - kannada suddi - ಕನ್ನಡ.ಖಬರ್.ಅಯೋ - ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ಆನ್ಲೈನ್

विषय: 
प्रकार: 

छान आहे. त्या त्या पेपर्सच्या संपादकीयांचीही लिन्क असेल तर आवडेल. तसेच या सर्व भाषांतील पेजेस वरून इतर भाषांतील पेजेस च्या लिन्क्स असतील तर ही साइट पोर्टल सारखी वापरून लोक तेथून आपापल्या भाषांच्या पानांवर जातील.