शेती

मिरची ची साठवणूक कशी करू?

Submitted by MSL on 17 June, 2021 - 12:17

घरच्या बाजूला मिरची लावलेली...पण मे महिन्याच्या मध्यला, चक्रीवादळ ..मग जवळपास रोज पाऊस...त्यामुळे मिरच्या काढून ,सुकवून ठेवायला वेळ नाही मिळाला..
आता घरात बरीच हिरवी आणि लाल पिकलेली, अशी मिरची आहे...त्याची कशी साठवणूक करता येईल? 1 ,2 पिशवी फ्रिज ला ठेवेन...बाकी? ..पावसाचे प्रमाण खूप आहे...काही उपाय असल्यास प्रतिसाद द्यावा...
...

जीवनज्योती कृषी डायरी भाग-०४ : आमची माती, आमची शेती!

Submitted by अनया on 23 May, 2021 - 06:44

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंक बघा
जीवनज्योती कृषी डायरी भाग-३

सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)

Submitted by Dr. Satilal Patil on 21 May, 2021 - 05:35
ड्रीमर अँड डूअर्स

सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)

पुणे सिंगापूर पुणे या हिमिमेतील २०००० किलोमीटर प्रवासादरम्यान पर्यावरण आणि शेतीसंबंधीचे अनुभव.

१. माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर!

Submitted by Dr. Satilal Patil on 26 April, 2021 - 14:00
ड्रीमर अँड डुअर्स

दुचाकीवरून सात देशांची सफर करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांच्या नजरेतून तेथील शेतीचा रोचक आणि रंजक आढावा...

अळूची कंद कशी लावावीत?

Submitted by सान्वी on 29 March, 2021 - 04:50

मी मोठ्या प्रेमाने अळूची कंद मोठ्या कुंडीत पेरली होती, तब्बल एक महिन्यानंतर त्यातून छोटीशी कोंब बाहेर आले होते. मी प्रचंड खुश! अळू लावण्याची खूप दिवसांपासून ची इच्छा होती आणि आमच्या वॉचमन ने खात्रीचे म्हणून त्याच्या गावाहून कंद आणून दिले होते. एकदा कोंब फुटल्यावर मात्र भराभर पाने येऊन मोठी होऊ लागली. काल होळीच्या मुहूर्तावर भजी करण्यासाठी म्हणून काढली. परंतु अत्यंत खाजरी अळू आहे. माझा खूप भ्रमनिरास झाला. एवढ्या प्रेमाने लावलेल्या झाडाने दगा दिला. आता परत लावायची आहेत, तर कोणी सांगेल का चांगली अळू कशी लावता येईल?

किसान आंदोलन, मीडिया आणि सरकार

Submitted by ashokkabade67@g... on 6 December, 2020 - 11:49

शेतकरी कायद्या विरोधात दिल्लीत आंदोलन पेटले आहे आणि तेही शांततापूर्ण मार्गाने सुरुच आहे .सरकारने साम दाम दंड भेद ही सारी हत्यारे वापरूनही शेतकरी आपल्या मागण्यांवरठाम आहेत आणि विकला गेलेला मीडिया शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवायला निघाला आहे सरकारने चर्चेचे नाटक सुरु ठेवून प्रश्न लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर ज्यांच्या बापाने कधी शेती केली नाही ते सरकारी चम्मच आंदोलनावर टीका करत आहेत तर काही सरकारला विकल्या गेलैल्या मीडियावर देशाच्या ईज्जतीचा प्रश्न उभा केला जात आहे .या साऱ्या आंदोलनात सरकारची चाटुगीरी करणाऱ्या मीडियाचाखरा चेहरा मात्र जनते समोर आला आहे।लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणवून घ

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 23 November, 2020 - 02:18

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

सायबीन सवंगाचं काम
बिलकुल नाही पडलं
चकरभुंग्यापायी पीक
खुमसूखुमसू रडलं
घरी धन आणासाठी
करु का रे गांजा-तस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

औंदाच्या पावसापायी
भलतंच ईपरीत घडलं
कापसाचं अख्खं बोंड
बुडापासून सडलं
आता काय तुह्याच घरी
म्या करावी का चोरी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-३

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:52

एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.

विषय: 

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-२

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:26

प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘पहाट झाली, भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडी’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शेती