मायबोली

आपल्या मायबोलींचा अभिमान बाळगू – जनगणनेत मायबोलीच नोंदवू!

Submitted by HRM on 10 April, 2026 - 04:04

सध्या २०२७ च्या जनगणनेच्या निमित्ताने 'हिंदी' तसेच 'संस्कृत' भाषेंची नोंद करण्याबाबतचे काही भावनिक संदेश पसरवले जात आहेत. आपली संस्कृती, प्रार्थना आणि श्लोक यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असणे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु, जनगणनेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत केवळ भावनिक आवाहनाला बळी पडण्यापूर्वी, आपण आपला इतिहास, आपल्या संतांची शिकवण आणि आपल्या खऱ्या मायबोलींचे - मराठी, कोंकणी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी भाषांचे - भविष्य काय, याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

पुणे तळजाई तत्काल गटग

Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57

sajira1.jpgsajira2.jpg

Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त

गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना

विषय: 
शब्दखुणा: 

मराठी भाषेचे लहजे गोळा करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मदत हवी आहे.

Submitted by सई. on 6 June, 2024 - 02:59

नमस्कार मायबोलीकर मित्रमंडळी !!!
कसे आहात तुम्ही सगळेजण?

महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात विखुरलेल्या मायबोलीकर बांधवांना एका महत्त्वाच्या कामासाठी साद द्यायला आम्ही आलोय.

माझ्या आठवणीतली मायबोली - दीपांजली

Submitted by दीपांजली on 18 September, 2021 - 12:11

मी मायबोलीवर येऊन एकोणीस वर्षं आणि सहा महिने झाले, म्हणजे ऑनलाइन गप्पांसाठी फक्तं याहु मेसेन्जर असलेल्या काळापासून ते ऑर्कुट, मायस्पेस, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, स्नॅपचॅट असा भला मोट्ठा टेक्नो प्रवास, journey from my 20’s to 40’s !
तसं असलं तरीपण मायबोली वरचं माझं वय अजुन साडे एकोणीसच आहे, बोले तो ‘अजुनही टिनेज’ आहे Wink
असो , तर मायबोलीची ओळख अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीने ‘मैत्रेयी’ ने करून दिली, त्यावेळी मी बे एरीआ मधे रहायचे.

माझ्या आठवणीतली मायबोली - Maitreyee

Submitted by maitreyee on 10 September, 2021 - 15:58

फार जुनी गोष्ट आहे. इसवी सन २००० च्या शेवटी आमचं गलबत अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर येऊन थडकलं. त्या काळी (फार जुन्या ऐतिहासिक काळाबद्दल असंच बोलतात ना?!) भारतात टर्रर्र टिन्टॅन टिणॅण टिणॅण खर्रर्र असा आवाज करणारे मोडेम वापरून इन्टरनेट उघडून ईमेल्स डाउनलोड करण्याइतकंच वापरलं जात होतं. कारण नेट चा स्पीड हा सुमारे ३ केबिपिएस वगैरे असा मिळायचा! त्यामुळे अमेरिकेत आल्यावर अगागागा एम बिपिएस मधे इन्टरनेट चा स्पीड असू शकतो? हे एक प्रचंड अप्रूप होते.

अलमारी

Submitted by श्रिया सामंत on 16 November, 2020 - 09:18

आज बहुत दिनो बाद अलमारी खोली तुम्हारी
और अंदरसे यादों की खुशबू आ गयी..
खुद को रोक न सकी तो देखा
की अंदर कुछ पुरानी किताबे तो है,
मगर उन पन्नो पर लिखे तुम्हारे लफ्झ आज भी उतनेही जवान
एक तसबीर मिली है और उसमे तुम भी,
तसबीर मे रंग उतनेही नए लगे जितने तुम बुढे
नीचे कुछ रखा है
एक डिब्बा, जिसमे एक पुराना शिशा है
देखा तो पता चला की अब मै भी बूढी लग रही हू
इतने मे मेरे पीठपर रखे हाथ को मेहसूस किया
और देखा तो तुम खडे हो मुस्कुराहते हुए
तुमने वो हाथ मे छुपा हुआ फूल मुझे दे दिया
और मेरे नजदीक आकर खडे हो गये

आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:41

सध्या माहीत नाही का ते, पण मायबोली वर बरच लिखाण हे आंबट शौकीन होत चाललंय. कदाचित हे फक्त मला वाटत असेल. गेल्या ८-९ वर्षांपासून मी मायबोली वर वाचतेय, गेल्या काही महिन्यांपासून लिहतेय, पण अगदी गेल्या काही दिवसांपासून बरच लिखाण हे अश्लिलते कडे झुकल्यासारख वाटायला लागलं आहे. एक दोन ठिकाणी मी प्रतिक्रियांमध्ये टाकलं हे. पण आता जरा जास्त व्हायला लागलं आहे.
ज्यांना कोणाला "bold" लिखाणाच्या अंतर्गत मायबोलीला शोभणार नाही असं लिहायचं असेल त्यांनी इतर ठिकाणी लिहावं अशी माफक अपेक्षा आहे. तुम्हाला तुमचं लिखाण मांडायचा पूर्ण हक्क आहे पण मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

आंबट शौकीन

Submitted by जयश्री साळुंके on 6 April, 2020 - 22:40

चूकून दोन धागे तयार झाले होते. आणि कोणताही बंद होत नव्हता म्हणून इथून मजकूर हटवला. कृपया दुसरा धागा वाचवा.

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 

मायबोली

Submitted by सागर सावंत on 18 June, 2019 - 09:58

मायबोली
माय मराठी, आई मराठी
वाढलो आम्ही बोलत मराठी
नाव मराठी, गाव मराठी
अनं हावभाव आमचे ते बी मराठी.

संतांची वाणी मराठी,
सहयाद्रीची गाणी मराठी
शिवशंभूंचे राज्य मराठी
अनं भगवे आमुचे रक्त ते बी मराठीचं

शिरकाव झाला परभाषेचा
कोनीच न उरला वाली
पेचात पडली आमुची मायबोली

धुंद झाली आमुची मती
आमचीचं आम्ही केली माती
सांगावे लागेल जगाला
आमची मराठी काय होती

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली