''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''
''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''
अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास

बर्याच वेळा समाजात वावरताना आपण अश्या गोष्टी पहात असतो ज्या अतिशय चुकिच्या असतात हे समजत असते पण अक्षरशः आपण काही करु शकत नाही. करायचा प्रयत्न केला तरी तो पुरत नाही. आणि होणार्या गोष्टी होतच रहातात आणि आपली चिडचिड होतच रहाते आणि मनात एक विचार येतो कि बाकि लोकांना याचे कसेच काही कसे वाटत नाही.
पण मला वाटते असे बर्याच लोकांना वाटत असणार आणि अश्या लोकांचा एखादा दबावगट तयार झाला तर काही प्रमाणात हे प्रश्न सुटू शकतील.
आपल्या परिवारामध्ये बरेच लोक मिडीयाशी संबंधित आहेत त्या लोकांपर्यंततरी ही गोष्ट पोहोचेल आणि त्याचा काहीतरी परिणाम होइल हि अपेक्षा ठेवुन हा धागा काढला आहे.
टिटलीसहून परत येताना लुसर्न इथे थोडा वेळ थांबलो. एका रम्य सरोवराच्या सभोवती वसलेले हे गाव.
या गावातून रिगी / फिलाटस आदी पर्वतांचे दर्शन घडते.
तसे गाव निवांत असते पण आम्ही गेलो होतो त्यादिवशी कसलीतरी जत्रा होती, त्यामूळे भरपूर गर्दी होती.
गावातले मुख्य आकर्षण म्हणजे सरोवरावरचा लाकडी पूल. मूळ पूल १४ व्या शतकातला होता पण सध्या आहे तो १९९३ साली नव्याने बांधलेला.
पूलापेक्षा सुंदर असते ती त्याची सजावट. दोन्ही बाजूने अखंड फुलाची मालिका असते. त्यांचे रंग, पाण्याचा रंग,
पूलावरुन दिसणारी दृष्ये आणि पाण्यातले पक्षी...
1
आज आपण टॉप ऑफ युरप, युंगफ्राऊ / यंगफ्राऊ ला जाऊ.
बहुतेक सहली झुरीक रेल्वे स्टेशनजवळच्या एका मैदानातूनच सुटतात. युरपमधील इतर देशांतून येणार्या / जाणार्या बसेसही इथेच येतात.
आधी बूक केले असेल तर प्रश्नच नाही पण आयत्यावेळीही जागा असल्यास टुअर घेता येते. वेळेआधी १० मिनिटे बसमधे बसावे अशी अपेक्षा असते. त्या वेळात गाईडची ओळख होते. दिवसभराचा कार्यक्रम कळतो.
पण हवी ती सीट मिळवायची असेल तर मात्र अर्धा तास तिथे जाणे उत्तम.
आमची ही बस मस्तपैकी डबलडेकर होती. मी अर्थातच पहिल्यांदा जाऊन वरची फ्रंट सीट पकडली होती.
जावळी मुलुखातली भन्नाट भटकंती::: मंगळगड – चंद्रगड – ढवळेघाट – महाबळेश्वर

...................................................................................................................................
स्वराज्यातलं ‘जावळी प्रकरण’
उद्या गणेशविसर्जन. त्यानिमित्त एका उपक्रमाची ही माहिती.
माझ्या एका स्नेह्याने यावर्षीच्या गणेशोत्सवात केलेला हा उपक्रम मायबोलीच्या वाचकांना माहीत असावा म्हणून हा लेख. हा मित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा अभ्यासक. पर्यावरणवादी आणि त्यासाठी कांहीना कांही परिश्रम घेणारा. रूढार्थाने मुळीच धार्मिक नसलेला. शाडूची गणेशमूर्ती मिळाली नाही तर धातूचा गणपती बसवून त्याशेजारी सुपारीचा गणपती ठेवून त्या सुपारी-गणपतीचे विसर्जन करणारा. यावर्षीचा त्याचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे म्हणून देत आहे. याबाबतची त्यांची भूमिका खाली देत आहे.