पर्यावरण

पर्यावरण

रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 7 July, 2013 - 15:02

....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!

Shelarkhind1_DiscoverSahyadri.jpg
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)

हे करून बघा........

Submitted by मी मी on 25 June, 2013 - 12:16

मित्रांनो या पावसाळ्यात तुमच्या छोटुल्या मुलांबरोबर मिळून एक सुंदरसा प्रयोग आणि त्यासोबत धम्माल मस्ती नक्की करून बघा......

भंडारा डोंगर

Submitted by ferfatka on 25 June, 2013 - 03:43


अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर आवर्जुन गेलो. त्या विषयी...

DSCN3545.jpg

असा हि मुजरा शिवरायांना ,३४०वा शिवराज्याभिषेकसोहळा २०१३

Submitted by मी दुर्गवीर on 23 June, 2013 - 09:40

जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.

शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण

आधी बीज एकले

Submitted by सई केसकर on 2 June, 2013 - 05:39

गेले काही दिवस मोन्सॅन्टो विरुद्ध चाललेल्या या चळवळीनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच्या मुळाशी बर्‍याच गोष्टी असल्या तरी सध्या प्रसिद्धी मिळालेली एक लक्षवेधी कोर्ट केस आहे. अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ह्यु बोमन या शेतकर्‍याला मोन्सॅन्टो या मल्टी बिलियन डॉलर बायोटेक साम्राज्यानी कोर्टात नेले. त्याच्यावर पॅटंट व्हॉयलेशनचा दावा लावण्यात आला. ही केस हा शेतकरी हरला आणि त्याला मोन्सॅन्टोला ऐंशी हजार डॉलर चा दंड द्यावा लागला.

दुर्गविरांची यशस्वी कार्ये : किल्ले सुरगड

Submitted by मी दुर्गवीर on 31 May, 2013 - 10:55

किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .

उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .

ddd_0.jpg

या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले

dddddd_0.jpg

दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........

घोरावडेश्वर

Submitted by ferfatka on 29 May, 2013 - 08:13

कुटुंबकबीला ‘मामाच्या’ गावाला गेल्याने एकटाच होतो. कुठे तरी जवळपास हिंडून यावे असा विचार करत बसलो होतो. ‘काखेत कळसा व गावाला वळसा’ अशीच परिस्थिती माझी झाली. त्यासाठी जुने फोटो अल्बम पाहत होतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी साध्या रोलच्या कॅमेºयाने काढलेला एक फोटो दिसला. तेथे जाण्याचे पक्के केले. १० वाजता गाडी, पाण्याची बाटली व कॅमेरा घेऊन घराजवळच सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो त्या विषयी....

DSCN2981 copy.jpg

शब्दखुणा: 

वैशाख-वणव्यात सह्याद्रीदर्शन: इगतपुरीचं दुर्ग-त्रिकुट

Submitted by Discoverसह्याद्री on 26 May, 2013 - 06:53

मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!

“वसंत – स्पर्श चैतन्याचा”

Submitted by vaiju.jd on 15 May, 2013 - 11:19

।। श्री ।।

नुकतीच फुटू लागली चैत्र पालवी, वसंताची झळाळी पानोपानी नवी ।

कुठे गुलाबी कुठे पोपटी नाजुक रंगकळा, सृष्टीचा साज असे आगळा |

लालकेशरी गुच्छ घेउनी उभा गुलमोहोर, आम्रही सुगंधी निजमोहोर ।

सुवर्ण पिवळे घोस झुलवित उभा असे बहावा, वसंताचा उत्साह दाटला नवा ।

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण