प्रकाशचित्र सौजन्य:- आंतरजाल
देशभरात ' वाघ वाचवा ' मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे . त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे . वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला; परंतु हाचा वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीविताच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
स्विमिंग पुमलधील पाणी जर झाडांकरता वापरायचं ठरवलं तर त्या पाण्यावर आधी काय काय प्रक्रिया कराव्या लागतील याबद्दल माहिती हवी आहे..
EARTH HOUR 2012 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जागतिक चळवळ
२००७ मधे सिडनी, ऑस्ट्रेलिया इथे सर्वप्रथम 'अर्थ आवर' ही कल्पना रूजली. मार्च महिन्याच्या शेवटच्या शनीवारी रात्री ८.३० वाजता वीजेचे दिवे, अनावश्यक वीजेची उपकरणे इ इ एक तासासाठी बंद ठेऊन 'ग्रीन हाऊस गॅसेस' च्या प्रमाणात लक्षणीय घट आणण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. आता हा उपक्रम जगातिल इतर अनेक देशात राबवला जातो. भारतातसुद्धा मागची २ वर्ष 'अर्थ आवर' साजरा केला जातो.