सामाजिक दबाव गट

Submitted by निवांत पाटील on 17 October, 2013 - 06:08

बर्‍याच वेळा समाजात वावरताना आपण अश्या गोष्टी पहात असतो ज्या अतिशय चुकिच्या असतात हे समजत असते पण अक्षरशः आपण काही करु शकत नाही. करायचा प्रयत्न केला तरी तो पुरत नाही. आणि होणार्‍या गोष्टी होतच रहातात आणि आपली चिडचिड होतच रहाते आणि मनात एक विचार येतो कि बाकि लोकांना याचे कसेच काही कसे वाटत नाही.
पण मला वाटते असे बर्‍याच लोकांना वाटत असणार आणि अश्या लोकांचा एखादा दबावगट तयार झाला तर काही प्रमाणात हे प्रश्न सुटू शकतील.
आपल्या परिवारामध्ये बरेच लोक मिडीयाशी संबंधित आहेत त्या लोकांपर्यंततरी ही गोष्ट पोहोचेल आणि त्याचा काहीतरी परिणाम होइल हि अपेक्षा ठेवुन हा धागा काढला आहे.

दबावगटः
वर्गात ५० ते ६० मुले असतात. त्यातील टवाळ असतात ५ ते ६. साधारणपणे १०%. पण ते दंगा करत असताना इतर ९०% मुले त्यांना प्रतिकार करत नाहित (शक्यतो / बर्‍याचवेळा). कारण त्या १० % लोकांचा दबाव गट तयार झालेला असतो. त्यांच्याबद्दल इतर मुले तक्रार देखिल करत नाहित.

हीच आवृत्ती रस्त्यावर रहदारीचे नियम मोडताना / वर्गणी मागताना / गल्लीत दंगा धोपा करताना / थोडक्यात चुकिच्या गोष्टी करताना दिसुन येते.

याचाच व्यत्यास जर आपण वापरला तर नक्किच बदल होउ शकेल. जर ४० मुलांने एकत्र येउन १० मुलांना सांगितले कि त्यांची दादागिरी खपवुन घेतली जाणार नाही तर.... बरच काही बदलु शकेल. १० % लोकांचा दबावगट येवढ्या सहजासहजी होत असेल तर ९०% लोकांचा का होउ नये.

सध्या तरी याला पर्यावरणापुरता मर्यादित ठेवला आहे. आपण जर अश्या गोष्टी आपल्या अजुबाजुला पहात असाल तर इथे जरुर लिहा, (त्याचे फोटो त्यासंबंधी बातमी याचा उल्लेख करा). पर्यावरणाच्या बाबतीत सुप्रिम कोर्ट अ‍ॅथॉरीटी आहे, त्यामुळे या गोष्टी या संस्थेच्या निदर्शनास आणुन दिले तरी खुप काही कमवल्यासारखे आहे. आपले सहकार्य अपेक्षित आहे.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दसर्‍याला कवठे एकंद मध्ये आतिषबाजीच्या वेळी अपघात होउन ५ जण गेले. मग काल पोलिसांनी सगळ शिल्लक राहिलेलं दारुकामाचं साहित्य लोकांना फेकुन द्यायला लावल. लोकांनी ते ओढ्यात टाकलं. सकाळला फोटो आला आहे. मटेरिअल भरपुर होतं. ओढा अगदी भरुन गेला आहे असं लिहलयं.

या सामानात काही प्रमाणात मेटल ऑक्साइड्स असतात जे भरपुर विषारी असतात तसेच काही क्षार जे रंग येण्यासाठी वापरले जातात ते पाण्यात विद्राव्य असतात.

मग येथेल जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करुन अपर जिल्हाधिकार्‍यांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यांचे म्हणणे असे पडले कि, एका जुन्या वापरात नसलेल्या खणीमध्ये हे सामान टाकले आहे Uhoh . पुढारीत तशी बातमी आहे. पण पावसाच्या पाण्यामुळे ते केमिकल्स पिण्याच्या पाण्यात मिसळु सहकतात हे सांगितल्यवार त्यांनी बघुया करुया या टायपचा थंडा प्रतिसाद दिला. मग तेथेच ऑन्लाइन तक्रार देखिल दाखल केली आहे.

त्याच वेळी एका पत्रकार मित्राच्या कानावर ही गोष्ट घातली असता त्याने सांगली ब्रँच ला फोन करुन हा प्रकार कानावर घातला. त्याने मग मला त्यात अस्लेले केमिकल्स व त्याचे होणारे दुष्परिणाम याबद्दल डिटेल माहिती विचारली.

आता यावर काही हालचाल होइल कि नाही माहित नाही पण याचा त्रास त्याच गावातील लोकांना होणार आहे हे नक्कि.

निवांत....

सामाजिकदृष्ट्या महत्वाचे हे काम अगत्याने केले त्याबद्दल तुम्ही नक्की अभिनंदनास पात्र आहात. पण एवढ्या गोष्टीवरून शारीरिक पातळीवरील केमिकल्सचा संपूर्णतया निचरा होईल असे समजण्यात अर्थ नाही. ५ निष्पाप जीव गेले म्हणजे त्याची बातमी भडकाऊ होणार हे पोलिसांनी ओळखले आणि आतषबाजीवर गदा आली...आणली गेली. म्हणजे मग आपल्या भागातील दिवाळी आता फटाकेविरहीत होणार का ? तर नक्कीच नाही. कारण फटाक्यांचा धंदा हा देशभरात पसरलेला असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते शिवकाशीसारख्या मुख्य नगरात. यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्याही पोटापाण्याच्या प्रश्नाला सरकारला पाहावे लागते. म्हणजेच याचा अर्थ वर रमा म्हणतात तसे "...मुळात आतिषबाजीचे उद्योग आता थांबवले पाहीजेत...." असे होईल का...? तर बिलकुल नाही. कारण प्रासंगिक कारणावरून सर्वव्यापी पाऊल सरकारला उचलता येत नाही. त्यांचीही काहीतरी मशिनरी असते, जी असल्या समस्यांचा मागोवा घेऊन स्वतंत्र पेपरद्वारे आपला अहवाल देवून त्यावरील शिफारशीही सादर करते. त्यातील सर्वच शिफारशी जशाच्यातशा अंमलात कधीच येत नाहीत.

ऑनलाईन तक्रार तुम्ही नोंदविली आहे ते ठीक आहे; पण त्यावर विचार करणारे जे कुणी तज्ज्ञ आहेत त्याना याच सरकारने ठोस अधिकार दिले तरच पाण्याशी खेळण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन वा शासक याना घेता येणार नाही.

कठीण आहे हे सारे !

मला वाटते असे बर्‍याच लोकांना वाटत असणार >>> हे अगदी खरे

दबाव गटाची कल्पना एकदम मस्त.

आपल्या परिवारात, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे त्यांचे काय आणि कसे करावे याबद्दल मार्गदर्शन आणि बौद्धिक / वैचारिक पाठींबा पण खूपच महत्वाचा ठरू शकतो.

आपल्या देशात पर्यावरणाच्या बाबतीत असलेली अनास्था सार्वत्रिक असल्याने त्याला प्राधान्यक्रम देणेही क्रमप्राप्त, संयुक्तिक आणि स्वागतार्ह. Happy

आपण पुढाकार घेऊन तक्रार नोंदणी केली त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन Happy

पण दबावगट म्हणजे कशा प्रकारचा त्या गटाने काय करावे / करता येईल या बाबत काही ठोस कल्पना / योजना असतील तर सांगाव्यात.

तसेच वरच्या उदाहरणाबद्दल अजून काय करता येईल / करायला पाहिजे होते हे ही इथल्या जाणकारांनी सुचवावे. या बद्दल जसजसे प्रतिसाद येत जातील तसतसे वर हेडर मधे अपडेट करता येईल व एक केस स्टडी तयार करता येऊ शकेल.

पर्यावरणासाठी दबाव गटाची कल्पना चांगली आहे.

आंतरजालीय पातळीवर असे (विविध देशांत विखुरलेल्या लोकांचे) दबावगट काय करू शकतात?

माझ्या अल्प माहितीनुसार :

१. आंतरजालीय पातळीवर जागरुकता/सजगता मोहीम. ह्यात डू'ज अ‍ॅन्ड डोन्ट्स चा समावेश, तसेच कोणत्या प्रकारच्या घटनांसाठी कोठे/कोणाकडे संपर्क साधावा ह्याचे पत्ते - फोन - इमेल इ.

२. एखादी घटना होण्याअगोदर संभाव्य दुष्परिणाम टाळणे ह्यासाठी प्रयत्न - हे स्थानिक पातळीवर, वृत्तपत्रांच्या / अन्य प्रसारमाध्यमांच्या पातळीवर व आंतरजालीय पातळीवर असू शकतात.

३. पर्यावरणासंबंधी निषेधार्ह घटना झाल्यास त्यासंबंधी स्थानिक प्रशासनाकडून किंवा संबंधितांकडून केली जाणारी दुरुस्ती/ संभाव्य नुकसान टाळणारी कारवाई यांचा ई-पाठपुरावा?

धन्यवाद.
पण दबावगट म्हणजे कशा प्रकारचा त्या गटाने काय करावे / करता येईल या बाबत काही ठोस कल्पना / योजना असतील तर सांगाव्यात.>> आहेत. आज रात्री नक्कि अपडेट. अजुन बर्‍याच जणांकडुन सुचना येतील तसतसे अपडेट करतो.

प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाइटवर हि सेवा उपल्ब्ध आहे. http://sanglielokshahi.in/index.aspx