पर्यावरण

पर्यावरण

माझे सौर ऊर्जा व इतर बरेच पर्यावरणपूरक प्रयोग व उपक्रम

Submitted by प्रमोद् ताम्बे on 30 March, 2014 - 06:11

सौर ऊर्जा निर्मिती (सोलर एनर्जी)
ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून आपण आपला खारीचा वाटा म्हणून हातभार लावावा व विजेची राष्ट्रीय बचत व्हावी केवळ या बहुउद्देशानेच मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या “ सौर ऊर्जा निर्मिती “ चा वापर करायचे ठरवले
 सोलर पॅनेल्स xxx.jpg

आमचे पर्यावरण रक्षणाचे उपक्रम व इतर मुलूखावेगळे छंद

Submitted by प्रमोद् ताम्बे on 27 March, 2014 - 12:23

मी ७३ वर्षांचा निवृत्त स्थापत्य सल्लागार अभियंता असून निवृत्तिनंतर स्वेछेने गेल्या काही वर्षापासून मी व माझी पत्नी दोघांनी मिळून आमच्या घरी पर्यावरण रक्षणाचे खालील छंद अत्यंत आवडीने जोपासले आहेत.
१) सौर वॉटर हिटर २४.०१.२००१ ला बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून २४x७x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. एकूण खर्च २३,५०५/-(दरमहाची बचत किमान ५००/- पेक्षा जास्त होत आहे)

चित्रबलाकावर ‘अवकळा’

Submitted by ferfatka on 14 March, 2014 - 07:29

दोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले. मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले.

शब्दखुणा: 

"आदिवासी जोडप्याने साजरा केला प्रेमाचा दिवस हेलिकॉप्टरमध्ये"

Submitted by निलेश भाऊ on 18 February, 2014 - 02:26

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.

Submitted by निलेश भाऊ on 14 February, 2014 - 03:21

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
DSCN5454.JPG

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन

Submitted by निलेश भाऊ on 13 February, 2014 - 04:54

पुणेकरांची आवडती ‘पर्वती’

Submitted by ferfatka on 13 February, 2014 - 04:34

पुण्यात राहून पर्वतीला गेला नाही असा पुणेकर सापडणे अवघडच. सिमेंट क्राँकिटच्या वाढल्या जंगलामुळे पर्वती टेकडी लांबून दिसणे जरा अवघडच बनली. पूर्वी लांबून सहजरित्या दिसणारी पर्वती बांधकामांमुळे दिसेनाशी होत आहे. संध्याकाळी व्यायामासाठी येणारे असंख्य पुणेकर व पर्यटकांमुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पर्वती गजबजलेली असते. टेकड्यांवरील अवैध बांधकामांचा मध्यंतरी प्रश्न उभा राहिला होता. या टेकडीला सुद्धा हा प्रश्न सतावू लागला आहे. अशा या पर्वती टेकडीवर केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत.

शब्दखुणा: 

पद्मदुर्ग श्रमदान व् दुर्गदर्शन मोहिम १२-१-१४

Submitted by मी दुर्गवीर on 23 January, 2014 - 12:02

जय शिवराय ,
१२-१-१४ रोजी दुर्गवीर आयोजित पद्मदुर्ग दुर्गदर्शन व श्रमदान मोहीम नेहमी प्रमाणेच हि मोहीम यशस्वी ठरली ……
पद्मदुर्ग किल्ल्याची लोकान मध्ये असणारा गैरसमज दूर व्हावा व स्थानिकांना एक रोजगार मिळावा या हेतूने दुर्गवीर प्रतिष्ठान दर वर्षी पद्मदुर्ग वर मोहिमा राबवत आहे .

या मोहिमेत मुबई -पुणे मिळून ६० च्या वर दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला . या मध्ये १३ महिला , शाळकरी लहान मुले यांनीही आवर्जून सहभाग घेतला .

शब्दखुणा: 

चिंता करितो वृष्टीची

Submitted by वरदा on 14 January, 2014 - 09:39

१८१८ साली मराठेशाहीचा अंत झाला आणि टोपीकराचा अंमल दख्खनदेशी सुरू झाला. या भूमीवर राज्य करायचे तर इथले लोक, ही भूमी, इथली समाजव्यवस्था समजून घेतली पाहिजे हे उघड होतं. नव्याने आर्थिक घडी बसवायची तर जमीन मोजणीपासून आणि नव्याने करपद्धती घालून देण्यापासून सुरूवात करणं नवीन राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं. राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा हा या शेतसार्‍यापासून आणि जमीनविषयक इतर करांमधून येणार असल्याने साहाजिकच इथली ग्रामीण अर्थव्यवस्था ब्रिटिशांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय बनली. भारतात इतरत्रही हेच होत होतं.

सह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड

Submitted by Discoverसह्याद्री on 8 January, 2014 - 08:48

(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)

...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण