एकांत

Submitted by ishwar vasant borude on 29 April, 2019 - 09:17
ठिकाण/पत्ता: 
शिरुर 9604613987

पायदळी वाट काटेरी होती
ति काटेरी वाट चालताना
अनवाणी माझ्या पायाची
वहाण बनुन साथ दिली

रडताना चेहर्‍यावरचे अश्रु
ओघळत गालावर यायचे
आले तरी अलगद पुसताना
हसवुन साथ दिली

उपाशी भटकंती भरकटताना
खळगी पोटाची भरण्या-
इतपत साथ दिली

थंडीत कुडकुडत असताना
स्वतः थंडीच्या कचाट्यात
आणि मला कवटाळत
साथ दिली

कपडे मळलेलं अंगावरचं
केसास्नि तेल नाही
पाय अनवाणी, पोट निकामी
अशात भिकारी म्हणत
साथ दिली

उन्हाची घामाद्वारे
पावसाची चिंबवुन
थंडीची कूडकूडण्यात
साथ दिली

असताना मि एकटा
भावनांना माझ्या, शब्दांत
भावनिक डोळ्यांच्या पाण्यात
कागदाच्या पानावर टिपत
साथ दिली, कवितेद्वारे

माहितीचा स्रोत: 
डोळ्यातिल पाणी
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, April 29, 2019 - 09:02
Group content visibility: 
Public - accessible to all site users