सांग ना

सांग ना

Submitted by ashishcrane on 12 September, 2013 - 03:38

सांग ना

मनाचेच आहेत हे खेळ सारे,
क्षणात जाणले मी, तरी तुला इतका वेळ का रे?

झोंबले मला अन् तुला स्पर्शतही नाहीत हे वारे?
एकटीच सोसू का मी हे शहाऱ्याचे भारे?

गणित सारखे आपुले, तरी आकडे वेगळे का रे?
होता धरलास हात जेव्हा, तेव्हाच हिशोब जुळले ना रे?

मिटल्या पापण्या की दिसे आपल्या स्वप्नांची दुनिया,
तू कसा परका स्वप्नांना? खरंच झोपतोस ना रे?

धृतराष्ट्र होता अंध खरा, पण तू बनलास गांधारी का रे?
माझ्या प्रश्नांचं उत्तर म्हणुनी तरी तू माझाच ना रे?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सांग ना