Submitted by शुभम खडसे on 13 March, 2025 - 07:48
तिच्या नजरेनं काय जादू केली काही
एक तिचा ध्यास बाकी भान रात नाही
झुरतोया रात दिस तिच्या प्रेमा पायी
माझ्या या प्रेमाची तिला जान नाही
वेढ्यावानी फिरतोय देह हा रिकामा
तिच्या ओढणीला जीव बांधला , नांद लागला
तिचा नांद लागला
हरवली भूक तहान बघता चहरा तिचा
या तिच्याच चहऱ्याचा नांद लागला
जातोय मनाचा तोल सावरू आता कसा
या मनाला हा तिचाच नांद लागला
तिच्यात जाई ही रात पहाट तिच्यात होई
या जीवाचा हा अंत सुरुवात तिच्यात होई
धीर दे या मनाला प्रेमाची छाव दे
भिरभिर या वेड्याला काळजात ठाव दे
मनातल प्रेम नाही पडलं बाहेर
नाही बोलताना शब्द सुचला , नांद लागला
तिचा नांद लागला
Written by
SHUBHAM
KHADSE
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाद लागला की नांद लागला?
नाद लागला की नांद लागला?