मुंबई पुणे मुंबई हा माझा अत्यन्त आवडता चित्रपट आहे. फ्रेश, विनोदी, एव्हरग्रीन असा मूव्ही आणि त्यात स्वप्नील मुक्ताची केमिस्ट्री! याचा दुसरा भाग आला होता तोही छानच होता.
पहिल्या भागात फक्त गौतम आणि गौरी होते, दुसऱ्या भागात त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, गौरीचा प्रियकर अर्णव हे भेटले.
मराठी मुव्हीची फ्रॅंचायजी होणे आणि त्याच कथेचा पुढचा टप्पा तिसऱ्या भागात येणे हे फारच अभिनंदनीय यश म्हणावे लागेल.
नुकताच मुंबई पुणे मुंबई भाग 3 बघितला. सर्वप्रथम, चित्रपट चांगलाच आहे. विशेषतः सध्या जितके वाईट चित्रपट बनतात त्या मानाने हा एकदा नक्कीच बघू शकतो.
आपल्याकडे मराठी बोलताना मध्ये हिंदी शब्द वापरले की ते कानांना खड्यासारखे टोचतात. काय तर आपल्याला त्याची सवय नसते. पण तेच ईंग्रजी या परकीय भाषेतील शब्द वापरले तर ते कानांना गोड वाटतात. काय तर सर्वांनाच आता त्या भाषेची सवय झाली आहे.
पण पिढी दर पिढी आपल्या मराठीतील ईंग्रजी शब्दांची टक्केवारी वाढू लागली आहे. येत्या पिढीत जी मुलेही ईंग्रजी माध्यमात शिकली आहेत आणि ज्यांच्या गेल्या तीन पिढ्याही ईंग्रजी माध्यमातच शिकल्या आहेत अश्यांच्या मराठी शब्दकोषावर ईंग्रजीचे अतिक्रमण वाढतच जाणार.
क्षण
घड्याळाची टिकटिक वाजते आहे न माझ्या हातातून निसटणार्या वेळेची मला आठवण करून देत आहे. टिक टिक म्हणता म्हणता मुठीत घट्ट धरून ठेवलेला तो क्षण टिकता टिकत नाही, न आयुष्य पुढे सरकत राहतं.अश्याच छोट्या छोट्या क्षणांनी ते घडत राहतं, आकार घेत राहतं.
किती छोट्या छोट्या तुकड्यानी बनलेलं हे आपलं जगणं, क्षणांच्या कुपितून दरवळणाऱ्या आठवणींवर तर तग धरून असतं.
महाराष्ट्रदेशा
भाषा मराठीचा डौल
विलक्षण गहिरासा
ओवी अभंग ओठात
अंतरात भक्तिठसा
डफ पोवाड्यांनी गर्जे
इतिहास मराठ्यांचा
तलवारीसंगे साजे
दिमाख तो भगव्याचा
शब्द रांगडे कोमल
दिले माय मराठीने
भान जगण्याचे उरी
महाराष्ट्राच्या मातीने
भाषा मराठी वसते
नित्य मुखी अंतरात
नाही लाभणार माय
शोधू जाता दुनियेत
किती जन्म झाले इथे
पांग फिटेना कधीच
लेकराची ताटातूट
माय करीना मुळीच...
जय महाराष्ट्र
जय मराठी
काही बोलायाचे आहे
गीतकार - कुसुमाग्रज
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही
तीन मराठी मित्र एकत्र येऊन बूक माय हॉटेलच्या धर्तीवर महाराष्ट्रात फिरायला जाणार्यांसाठी छोट्यामोठ्या छानश्या घरगुती हॉटेलची व्यवस्था करून देण्याचा व्यवसाय सुरु करत आहेत.
मला त्यांनी अत्यंत घाईघाईत ईतकीच रूपरेषा सांगितली आहे.
पण त्यांना माझ्याकडून पटकन एखादे छानसे मराठी नाव हवे आहे.
आता माझ्याकडूनच का? तर आहेत काही गैरसमज..
पण मला दिवसभरात फार फार तर "विसावा" असेच एखादे हलकेफुलके पण जुनेपुराणे नाव सुचले.
प्लीज तुम्हाला कोणाला या प्रकारच्या उद्योगाला आणखी काही छानसे नावीन्यपुर्ण पण चटकन आवडणारे नाव सुचत असेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सुचवा...
" बापू "
कुणी हाक मारली ? वळून पाहिलं , ' अरे हि इथे कशी आणि कशाला हाक मारतेय आपल्याला , ' चवचाल ' आणि कायकाय शब्द ऐकलेत हिच्याबद्दल . उगाच कुणी पाहिलं आपल्याला इथं तिच्या सोबत तर काय बोलतील ? पण आता समोरून न बोलता जाऊ तरी कस ? शेवटी पर्याय नसल्यामुळे तिला समोर जाण्याशिवाय पर्याय नव्हता .
"अरे बापू इकड कूठ ? " .... ती
" नाही जरा काम निघालं होत म्हणून आलो होतो , पण तू इकडे इतक्या लांब कशीकाय ? "... मी
" काय सांगू आणि काय नाही ? चल तिथं चहा घेऊ मग बोलूया कि . "... ती
" नाही नको म्हणजे ... " मी
मराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे.
जर आज मराठी शाळांचे भविष्य धोक्यात आहे तर उद्या मराठी संकेतस्थळांचेही भविष्य धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.
संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ?
*********************************************************************************