तुम्हाला सांगतो इंजिनीरिंगच्या दिवसात माझा मित्र बबन हा फारच इन्टरेस्टिंग माणूस होता. "हमसे दिलचस्प कभी सच्चे नहीं होते है अच्छे लगते है मगर अच्छे नहीं होते है…" ही जावेद अख्तरची मी तोंडपाठ केलेली कविता बबन मला भेटला की हमखास म्हणायला लावायचा. ती म्हणे त्याला कुठे तरी आत भिडायची. खर म्हणजे बबन्या देखील अजिबात सच्चा वगैरे नव्हता किंबहुना चतुर लबाड होता. सगळयांना सुबक शेंड्या लावणारा बबन मला मात्र कधी मधी चहा पाजायचा.
महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात, असं विकिपिडीयावर वाचलं आणि थक्क झालो.
पण त्याचवेळी मनाला बरेच प्रश्न पडले.
खरंच एवढे अंक कुणी वाचते का? की उगाच जाहिराती मिळतात म्हणून दिवाळी अंक काढतात लोक?
खरोखर वाचले जाणारे लोकप्रिय आणि दर्जेदार अंक किती आणि कोणते?
या चांगल्या अंकांचा किती खप होत असेल?
लायब्ररीमध्ये दिवाळी अंकांच्या स्कीम्स(उदा.. दीडशे रुपयात दीडशे अंक) जाहीर होतात, त्याला कितपत प्रतिसाद मिळतो का?
मायबोलीवर दिवाळी अंकांचा एक धागा पाहिला. पण त्यात कुणीच फारसं लिहिताना दिसत नाही. लोक अंक वाचत नाही की लिहायचा आळस करतात?
मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .
" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "
" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "
" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "
आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा . एवढी माणस वाढली तेवढया लोकल नाही वाढल्या .
बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.
तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?
तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..
लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:
चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.
लक्षात ठेवा ...
फक्त दहाच !!!
संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)
हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)
प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
निशाला सायकलच भारी वेड . लहानपणी तिची तीन
चाकांची सायकल घेऊन ती फार दूर पर्यत जात
होती .इकडे मंजूचा जीव मात्र टांगणीला लागत असे व
तिला नेहमी वाटे कि कुठून
दुर्बुद्धी झाली आणि हिला सायकल घेऊन दिली .
थोडी मोठी झाल्यानंतर तिला दोन चाकी सायकल
दिली .त्यानंतर तर तिला सीमाच
उरल्या नव्हत्या .ती लांब लांब सायकल घेऊन जात
असे.आणि हो महत्त्वाच इतकी सायकल चालवूनही तिच
सायकलवरून पडन काही थांबत नव्हतं .सायकल
खाली आणि त्यावर
निशा अशापेक्षा निशा खाली आणि सायकल तिच्या अंगावर
पडलेली किंवा सायकल
आणि निशा दोघीही एकमेकींशेजारी पडलेल्या असच जास्त
व्हायचं .तिला लागायचं फार नाही पण आज जरा जास्तच