विटंबना मराठीची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 June, 2019 - 03:25

विंटबणा मराठीची
( कविवर्य कुसुमाग्रज यांची एक कविता वाचनात आली तीच्या सुरुवातीच्या ओळी अशा होत्या
होय, तुमची खानदानी प्रवचन
छानच आहेत, त्यावरून मायबोलीवर गेले काही महिने चालू असलेल्या गलिच्छ प्रकारांबद्दल लिहावेसे वाटले. जोवर असे प्रकार होत राहतील तो वर हा धागा वर काढेल . )

होय,
तुमची हीनकस भांडण
घाणच आहेत
तुमचे रक्तपिपासू वादविवाद
कान किटवणारे, डोळे मिटवणारे
साक्षर का झाला असं विचारणारे?
शब्दांना रक्तबंबाळ करणारे
अन् संवेदनेला मुर्छा आणणारे
मित्रांनो प्रश्न पडलाय
मी माणूसच आहे काय?
मी माणसातच आहे का?
मायबोलीच्या शब्दांनी अर्थ दिला
तुमच्या, माझ्या अस्तित्वाला
त्यांनीच क्रांतीचा पोवाडा केला
प्रियेला चांदणशेला दिला
मायबोलीला साज दिला
संस्कृतीला सभ्यतेचा बाज दिला
अन्
माणसाला माज दिला
शब्द असतात रंगहीन,गंधहीन, मुके, बहीरे, आंधळे
आपण बोलेल तेच बोलतात
गुलामच ते आपले
म्हणतात क्या हुकुम मेरे आका
घायाळ त्यांना करु नका
सुविचाराने ते बहरतात
शिव्यांनी गुदमरतात
मी देवाला काहीच मागत नाही
पण तुम्हाला मागतो काही
मातृभाषेची विटंबना आता
पहावत नाही

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरं.. पण काही वाईट लोकांसाठी चांगल्या लोकांची इथे मिळाणारी संगत सोडुन द्यायची इच्छा होत नाही.

सुंदर.
सद्यस्तिथी वर प्रकाश टाकलात.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
पण खरंच आपण अभागी आहोत..माबोच कशाला आजकालची मुलं/मुली सुद्धा सहच बोलावे तसे शिवी वगैरे बोलण्यात वापरतात..एकदा अलंकारात वाक्य राहूद्या एखादी म्हण पण येत नसते बोलण्यात पण विवक्षित शब्द नक्की असतात