✪ "प्लॅनेट परेडची" सत्य स्थिती
✪ आत्ताचे ग्रह कसे व कुठे बघता येतील?
✪ सूर्य मावळल्यानंतर तेजस्वी शुक्र दिसेल
✪ शुक्र, शनि व तेजस्वी गुरू हे तीन ग्रह सहजपणे बघता येतील
✪ पुढचे दोन- तीन दिवस नितांत स्वच्छ आकाश
✪ नितळ निळा रंग- आकाशाचा रंग निळा का असतो?
✪ ३ मार्चला चंद्रग्रहण- पण चंद्र उगवताना ग्रहण संपत असेल
✪ पायथागोरसचे प्रमेय आणि तमिळ गणितज्ञाचं निरीक्षण
✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं!
✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती"
✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद"
✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं!
✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं
✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत?
गणित शिकलंच आहेस तू,
©️ चन्द्रहास शास्त्री
गणित शिकलंच आहेस तू,
तर बेरीज वजाबाकी करू.
त्या क्षणांची फक्त बेरीज करू
अन या क्षणांची वजाबाकी करू.
चन्द्रासमोरच्या ढगांना जरासे
प्राजक्ती कळ्यांनी बाजूला करू
दिव्यावरच्या या काजळीला
गुलाबी पाकळ्यांनी बाजूला करू.
आंदोलने विसरून जाऊ सारी
अन क्रांतीचा मार्ग प्रशस्त करू
शहारल्या कमलदलांना या
दवांनीच आता निर्धास्त करू.
चल सखे, पुन्हा एकदा जगू या
चंद्र-चांदण्यांशी गप्पा करू.
अन या लखलखत्या चंद्राला
त्या कोजागरीची आठवण करू.
माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला.
मला पण ... चिंट्याने सूर मिसळला. नेहा आणि सॅमीच्या मनातही हेच होत, पण स्वभावामुळे बोलले नाही इतकेच.
**************************
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाकडे जायला निघाले...
13 मे रोजी दु. 12:31 वा. पुण्यात तुमची सावली "गायब" होईल!
Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे ती बघा.
**************************
To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते...
**************************
गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा
**************************
नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना?
**************************
गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा
**************************
“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते... काय करायचं आहे आपल्याला? ...
घाबरलेली मुलं एकमेकांना बिलंगुनच उभी होती. आजूबाजूला बघून कानोसा घेत होती. भिंतीवरची अक्षरं दिसत होती पण कोणी वाचत नव्हते...
*************************
गोष्टीचा आधीचा भाग ... इथे टिचकी मारा
*************************
गणितं..
आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली
उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला