मायबोली

Submitted by सागर सावंत on 18 June, 2019 - 09:58

मायबोली
माय मराठी, आई मराठी
वाढलो आम्ही बोलत मराठी
नाव मराठी, गाव मराठी
अनं हावभाव आमचे ते बी मराठी.

संतांची वाणी मराठी,
सहयाद्रीची गाणी मराठी
शिवशंभूंचे राज्य मराठी
अनं भगवे आमुचे रक्त ते बी मराठीचं

शिरकाव झाला परभाषेचा
कोनीच न उरला वाली
पेचात पडली आमुची मायबोली

धुंद झाली आमुची मती
आमचीचं आम्ही केली माती
सांगावे लागेल जगाला
आमची मराठी काय होती

वेळ गेली वेडा पाई
विनवणी आमची तुमच्या ठाई
बोला मराठी वागा मराठी
टिकवा मराठी शिकवा मराठी
अरे वाचली मराठी तरचं
वाचेल माणूस मराठी

----------- सागर किसन सावंत

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users