गद्य

तुझ घर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 30 April, 2019 - 01:48

जेंव्हा हातात काही उरत नाही माणूस घर शोधायला लागतो. ते चार भिंतीच असावाच, त्याला कौलारू छप्पर असावाच, त्यात एखाद्या बाथटब मध्ये गरम पाण्यात शांत निजाव वा शॉवर मधून पडणाऱ्या पाण्याच्या सरीला पाऊस मानून त्यात मोकळ व्हाव अस काही नसत. त्याला फक्त घर हव असत, जे त्याला जवळ करेल, मायेने विचारपूस करेल, कितीही कटकट केली तरी शेवटी त्याची सांत्वना करेल. त्याला नेहमी समजून घेऊन फक्त न फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहील. कुणा परक्याला दारातून आत घेऊन त्याला इनसेक्यूअर फील नाही होऊ देणार. त्याच्या होणाऱ्या सगळ्या मूड स्विंगस ला आपलस करेल पण त्याला कधीच तो बेघर असल्याच जाणवू देणार नाही.

शब्दखुणा: 

कोन मारी त्याला देव तारी - पंधराशे हॅरिसन

Submitted by Barcelona on 25 February, 2019 - 00:59

जेनीला, माझ्या भावी सुनेला, मरी कोंडोने जणू पछाडलं होतं. वर्ष सुरू होऊन ८ आठवडे झाले होते आणि पैकी तिने ६ “कोनमारी” पद्धतीने घर लावण्यात घालवले. राज, माझा मुलगा, एरवी जेनीच्या उपक्रमात आणि उपद्व्यापात तसा समरसून सहभागी होतो. पण ह्या वेळी मात्र त्याने अगदी लाज आणली. अगदी भर डायनिंग टेबलवर त्याने जाहीर केले की त्याला कोनमारी पद्धत किचकट वाटते आणि ऑर्गनायझिंग मध्ये त्याला अजिबात रस नाही. आता प्रकरण माझ्या “अपब्रिनगिंग” वर शेकणार असं दिसताच मी म्हणाले “ जेनी, देअर इज an इंडियन मेथड, इट्स कॉल्ड “आवराआवारी”.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गद्य