गजल

गझल - अक्षरे

Submitted by शिवशंकर गोंड on 10 September, 2026 - 13:23

वृत्त : स्त्रग्विणी

कागदावर जरा उतरली अक्षरे
भावनांच्या सवे खेळली अक्षरे

फार केली जगाने प्रशंसा अशी
लाव काजळ म्हणू लागली अक्षरे

ती म्हणू लागली थांब आता इथे
पण तरीही पुन्हा जन्मली अक्षरे

स्पर्श झाला तुझा थांबली वेळ ही
मौन मी अन् इथे लाजली अक्षरे

ऐक माझे शिवा संपली ही कथा
शेवटी एकदा बोलली अक्षरे

           - शिवशंकर सू. गोंड

ऋण

Submitted by निखिल मोडक on 2 May, 2023 - 09:11

वेदनादायी क्षणांना सण म्हणावे लागले
सलत्या जखमांस हसुनी व्रण म्हणावे लागले ॥

विखरून गेले दान जे झोळीत होते घेतले
राहिल्या काही कणांना धन म्हणावे लागले ॥

मानले मी रूख त्यांच्या सावल्या करपून गेल्या
पेटत्या उरल्या उन्हाला वन म्हणावे लागले ॥

केला तयांनी यत्न वेडा मूर्त ही घडवावयाचा
राहिल्या दगडास मजला मन म्हणावे लागले॥

द्यायचे आता न मजला राहिले कोणास काही
राहिल्या हास्यास तरिही ऋण म्हणावे लागले ॥

©निखिल मोडक

शब्दखुणा: 

एक तरी गज़ल अनुभवावी # ०२

Submitted by अमर विश्वास on 22 October, 2020 - 04:59

गालिब - गुलज़ार - जगजितसिंग
या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
होगा कोई ऐसा भी कि 'ग़ालिब' को न जाने
शाइर तो वो अच्छा है पर बदनाम बहुत है

विषय: 
शब्दखुणा: 

एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

Submitted by अमर विश्वास on 21 October, 2020 - 03:32

या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
___________________________________________________________________________________________________________________________

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है

इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के

इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने

विषय: 
शब्दखुणा: 

चाल दैवाची

Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 May, 2020 - 02:52

चाल दैवाची कुणा कळली कधी
वाट ही दुःखाकडे वळली कधी

का दुरावा मागते मज रात्र ही
सांगना तृष्णा तिची शमली कधी

मी न झालो वृक्ष वाटे बाजूचा
तू न त्याखाली तरी रमली कधी

पापणी ओली कशी होते तुझी
चाल ही नाही मला जमली कधी

ही कहाणी आपुली नाही जरी
ती मला नाही कशी कळली कधी
©प्रतिक सोमवंशी

कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत

Submitted by प्रतिक सोमवंशी on 19 June, 2019 - 13:31

कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत
माझ्या गजलेचे काही शेर मुद्दाम चुकले आहेत

आम्हा भुकेचे व्याकरण भूक लागल्यावर कळत नाही
भुकेल्या पोटापुढे पोरं अक्षरांना मुकले आहेत

बागेमध्ये बसलेली कित्येक पाखरं प्रेम करतात
त्यांच्या अमर नावांमुळे कित्येक खोडं दुखले आहेत

मी काय म्हणतो, तुम्हाला कश्याला तो गुलाब हवा?
त्याच गुलाबाच्या नादात किती काटे रुतले आहेत?

स्वप्न सारी दाखवून ते मत घेऊन गेले होते
सांगा तर निवडून आल्यावर ते कुठे खपले आहेत?
©प्रतिक सोमवंशी

दिलातील जळजळ

Submitted by प्रतिक सोमवंशी on 14 June, 2019 - 08:25

घेऊन चला जिथे नभांची हळहळ आहे
ओकायची तिथे दिलातील जळजळ आहे

बरसायचे आहे मुक्त माझ्या जाणिवांना
माझ्या उरात दाटली त्यांची वळवळ आहे

खूप दाटले आहे हे धुके उन्हाळ्यात
वाटते सावलीत माजली खळबळ आहे

दाही दिशात पळती हे रुधिराचे घोडे
नसानसांत भरली त्यांची चळवळ आहे

नसेल उदयाच्या वेशीला तिमिराचे तोरण
लावलेल्या तिथे दिवट्या ही बळबळ आहे

अथांग सागराला का विचारतात प्रश्न
उत्तरात लपलेली त्याची कळकळ आहे
©प्रतिक सोमवंशी

काल मंदिरात एक करार झाला

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 May, 2019 - 08:42

काल मंदिरात एक करार झाला
रात्रीस एक कैदी फरार झाला

अंकुरलेल्या जमिनीत भेग पडली
नवाच हा मला साक्षात्कार झाला

तो, मी, वगैरे वगैरे रोजचे
नवा माणुसकीचा प्रकार झाला

निघाले म्हणे खड्ग म्यानातून
गल्लीबोळात इथे थरार झाला

सापडतो आहे कैद्याला मीच
तो बाबा महंत पण पसार झाला

©प्रतिक सोमवंशी
Instagram @shabdalay

शब्दखुणा: 

तुझ्या घराला सये दारे अनेक

Submitted by प्रतिक सोमवंशी on 1 May, 2019 - 08:23

तुझ्या घराला सये दारे अनेक
किती मोजशील ते तारे अनेक

रास शिंपल्यांची पडली रेतीवर
सांजेस मोत्यांचे किनारे अनेक

ऐकशील का ओठांवरली गाणी
तोंडावर खर बोलणारे अनेक

उगा नाही सये येशू रडतो
त्याला कृसास ठोकणारे अनेक

उलटूनही डाव तसा मांडला
नव्याने परत खेळणारे अनेक
©प्रतिक सोमवंशी
insta @shabdalay

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गजल