पुणेरी

पुणेरी

Submitted by Sameer Jirankalgikar on 29 September, 2020 - 08:43

ही गझल असली तरी एक उपहासात्मक हास्य गझल आहे. वाचकांनी केवळ विनोद बुद्धीने वाचावी.

साऱ्या जगात भारी माझेच गाव आहे.
अभिमान हा पुणेरी आम्हास राव आहे.

तासोन तास आम्ही गाड्या धुवूत अमुच्या.
धरणामधे जलाचा जरिही अभाव आहे.

घेऊ जरा दुपारी ही झोप पेशवाई.
आम्हावरी तयांचा अजुनी प्रभाव आहे.

लिहितो अशाच पाट्या, चर्चा करा कितीही.
आज्ञेवरून तेथे अमुचेच नाव आहे.

दडपून मांडतो रे आम्ही मते कुठेही.
ज्ञानी अम्हीच आम्हा सारेच ठाव आहे.

साधेच बोलणेही तिरके तुम्हास वाटे.
असलेच बोलणे हा अमुचा स्वभाव आहे.

- समीर.

विषय: 
शब्दखुणा: 

पुण्याचं हे न ते: भाषा

Submitted by नीधप on 20 October, 2019 - 23:57

हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.

शब्दखुणा: 

पुणेरी वाघाच्या काही दिलखेचक अदा !!!!!

Submitted by भालचन्द्र on 11 December, 2013 - 03:50

आमच्या (मी, विशाल कुलकर्णी, अशोक गायकवाड आणि शैलेंद्र साठे उर्फ टवाळ) ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरच्या पुणे फेरफटक्यात कात्रज येथे टिपलेल्या वाघांच्या काही दिलखेचक अदा !!!!

IMG_5614-1.JPGIMG_0014-1.JPGIMG_0015-1.JPGIMG_0016-1.JPG

Subscribe to RSS - पुणेरी