लेखन

६५ क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु, हायगेट, लंडन.

Submitted by पद्मावति on 14 August, 2015 - 16:31

लंडन च्या आर्चवे ट्यूब स्टेशन च्या बाहेर येताच हायगेट हिल रोड ने सरळ सरळ चालत आलं की उजव्या हाताला एक रस्ता वळतो. हा रस्ता आहे क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु. एका मध्यमवर्गीय वसाहतीतला हा साधारणसा रस्ता. मुख्य रहदारीपासून जरा आतल्या भागाला असल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा कमीच असतो. या रस्त्याला वळून उजवीकडे आठ-दहा घरे सोडली की आपण उभे राहतो अगदी साध्या सुध्या रूपाच्या एका विक्टोरियन पद्धतीच्या घरासमोर. हे सर्वसामान्य दिसणारे घर मात्र इथल्या बाकीच्या घरांपेक्षा फार वेगळं आहे. या घराला इतिहास आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढयाचा.

विषय: 
शब्दखुणा: 

सोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी)

Submitted by shantanuo on 28 November, 2014 - 08:41

माझा "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन" हा लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना मराठीत स्पेल चेक, अ‍ॅटो करेक्ट वगैरे कसे वापरायचे ते लक्षात आलेच असेल.

http://www.maayboli.com/node/39752

पण त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.

विषय क्रमांक २ - 'राव आजोबा '

Submitted by जाई. on 29 June, 2014 - 18:00

" आईला आठवडयापुर्वीचा टाइम्स ऑफ़ इंडिया हवा आहे " एका भिजलेल्या सशीणीचा आवाज.

" दोन मिनिट थांब , देतो काढून " खणखणीत स्वरातील आवाज

" हं! , हा घे पेपर , नीट व्यवस्थित घेऊन जा, एक लक्षात ठेव पेपरची घड़ी मोड़ायची नाही , त्यावर काही लिहायचं नाही , डाग पाडायचे नाहीत आणि मुख्य म्हणजे काम झाल्यावर लग्गेच पेपर परत करायचा . काय समजलं का ? "

यावर भिजलेली सशीण ( पक्षी :: अस्मादिक ) काय बोलणार ! तिला तर कधी एकदा पेपर हातात पडतोय आणि पळून जातेय अस झालेलं. निवृत्त सैन्याधिकारी श्री दिनकर राव उर्फ़ राव आजोबा यांच्याशी झालेला हा अस्मादिकांचा पहिला आणि शेवटचा संवाद (?)

प्रतिमा-प्रचीती

Submitted by शर्मिला फडके on 14 June, 2014 - 14:06

प्रतिमा-प्रचीती
नितीन दादरावाला
लोकवाङ्मय गृह

छायाचित्रकारांवर लिहिले गेलेले पुस्तक वाचताना तुमच्या मनात काय अपेक्षा असतात? असाव्यात?

मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे?

Submitted by बोबो निलेश on 25 April, 2014 - 23:11

मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाचायला आवडेल?
केवळ लेखकासाठीच नव्हे, तर विक्रेते, प्रकाशक लेखक वाचक या सर्वांसाठी हा प्रश्न विचारला आहे.

वाचकांना नक्की काय वाचायला आवडेल यामध्ये कुठले विषय आवडतील? कूठल्या घटनांवर लिहिलेलं आवडेल? कुठला जॉनर आवडेल.

खरं तर हा नंदिनी यांनी विचारलेला हा प्रश्न.
http://www.maayboli.com/node/48005?page=1

शब्दखुणा: 

कादंबरी लेखन- तंत्र, मंत्र.

Submitted by शर्मिला फडके on 10 December, 2013 - 05:53

'कादंबरी' हा साहित्य प्रकार ज्यांना वाचायला आवडतो आणि लिहायलाही आवडतो त्यांच्याकरता हा धागा.

मातीचा किल्ला : भाग एक

Submitted by अंकुरादित्य on 31 October, 2013 - 00:45

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात

Submitted by Discoverसह्याद्री on 21 October, 2013 - 14:59

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास

00Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस

Submitted by Discoverसह्याद्री on 6 October, 2013 - 10:53

..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.

...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...

...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:

डॉक्टरचे दुखणे

Submitted by अंकुरादित्य on 20 September, 2013 - 11:41

डॉक्टर म्हणून काम करत असताना , मला अनेकदा धन्वंतरी सोबत संजयाचा सुद्धा रोल पार पाडवा लागतो . . मला जे पाहतात त्यांना मी डॉक्टर आहे हे सांगून पटत नाही , त्यांना मी स्वतःला धन्वंतरी द ग्रेट आणि संजय द ग्रेट यांची उपमा लाऊन घेत आहे समजल्यावर भोवळच आली असेल . . चिंता नको . . या माझ्याकडे मोफत इलाज करून देतो . . असो तर सांगायचा मुद्दा असा की होऊ घातलेल्या कवीला चंद्राच्या चांदण्यात आकाशी रंगाची साडी घातलेली गव्हाळ रंगाच्या मुलीचे लाल चुटूक ओठ किती सुंदर दिसतील यावर कल्पनाशक्ती खरवढून काढून हाती पडलेली खरपुड कागदावर उतरवावी लागते , तसेच काहीसे माझ्या बाबतीत होते . . .

Pages

Subscribe to RSS - लेखन