मायबोली वरील झणझणीत अनुभव

Submitted by Swamini Chougule on 18 November, 2019 - 12:48

प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले

मायबोली वासीयांना नमस्कार ,

मी सौ स्वामिनी चौगुले ,

मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .

गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.

मी केलेले लिखाण अशुद्ध असून ते सुधारा असे सांगून माझे डोळे उघडले व तुमचा प्रतिसाद मिळाला त्या मुळे मी माझ्या लिखाणात सुधारणा करू शकले तसेच स्वतःच्याच लिखाना बाबद प्रगल्भ झाले . म्हणून तुमचे आभार इथे बऱ्याच जणांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले .ते मी विसरू शकणार नाही

आता तिखट अनुभव मांडते . माझं लिखाण अशुद्ध आहे असे बरेच ताशेरे ओढून मला काही लोकांनी बेशुद्ध व्हायची वेळ आणली तर त्या बाबद; मराठी टाइपिंग करत असताना बऱ्याच वेळा नकळतपणे खूप चूका होतात तर काही वेळेस आपल्या ही न कळत की

बोर्ड आपण टाइप केलेले अनेक शब्द बदलतो .मायबोलीवर एका सदस्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला तो असा

" मराठी टाइपिंग करत असताना अनेक वेळा एरर येतो तसेच बरेच शब्द बदलतात . बऱ्याचदा लेखक बोलत असलेल्या भाषेचा परिणाम लिखाणावर होतो . पण तो इतका मोठा मुद्दा नाहीच लेखकाने लिहलेले आपल्याला समजले की झाले "

मला हा प्रतिसाद खूप आवडला पण याचा अर्थ असा नाही की मी केलेले अशुद्ध लेखन बरोबर आहे मी माझ्या लेखनात सुधारणा करत आहे आणि करत राहणार .

पण काही महाभाग असतात त्यांना दुसर्याच्या चुका दाखवून व त्यांना कुचकट बोलून आत्मिक समाधान मिळते. अहो ज्यांना अंडर रेस्टिंमेंट हा शब्द नीट लिहिता येत नाहीत ते निघाले दुसर्याचे लेखन सुधारायला. माझ्या सासुरवास या विषयावरील लेखाच्या प्रतिसाद या सदरात काही लोकांनी इतकी घाण केली की माझा लेखच माननिय अडमीन यांना हाटवावा लागला. काहींच्या संगणक प्रणालीने तर चक्क त्यांना सांगितले म्हणे की हा लेख वाचू नका कारण तो खूप अशुद्ध आहे तुझ्या डोक्याला मुंग्या येतील .माझ्या कडे ही लॅपटॉप आहे तो मला असं कधी सांगत नाही हो बालबुद्धी ची किव करावी तेव्हढी कमी आहे

काही लोक मराठीचे पाईक बनून जर माझे लेखन नाही सुधारले तर मराठी भाषा लुप्त होइल अश्या अविर्भावात असलेले मी पाहिले .बर सोशल मीडिया चा पहिला व अलिखित रुल हा आहे की पटल तर घ्या नाही तर सोडून द्या .

माझ्या शुद्ध लेखनावरून खूप कुचकट बोलणं पाहिल . बऱ्याच लोकांना वाटत की मायबोलीवर काय लिहल जात? काय प्रतिसाद दिला जातो या कडे मायबोलीच्या व्यवस्थापकांचे किंवा admin चे लक्ष नसते पण तसे नाही . कालच मला व्यवस्थापणा कडून इ मेल आला की तुम्ही चांगले लिहता लिहत रहा इथे कुचकट शेरे मारणारे खूप भेटतील इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते ( विश्वास नसल्यास कोना ला हवे असल्यास मेल चा स्क्रीन शॉट मारून पाठवला जाईल) फक्त लिखाणात सुधारणा करा .हीच मी माझा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे याची पावती समजते.

आता ब्लॉग च्या लिंक विषयी मी इथे अर्धवट कथा व लेख लिहून लिंक देते अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे मी माझ्या ब्लॉग चे views वाढावेत म्हणून मी अस करते अस काही जणांना वाटते. काहीं ना तर असे वाटते की मी बेरोजगार आहे त्या मुळे मी ब्लॉग मधून पैसे कमावण्याचा प्रयत्न करते .खर तर इतकं व्यक्तिगत होण्याची गरज होती का ?

काय म्हणे निराशेच्या गर्तेत वगैरे वगैरे आणि एक तर माझ्या ब्लॉग प्रोफेशनल नाही .मला त्यातून सध्या तरी आर्थिक काहीच फायदा नाही.

मी पूर्ण कथा टाकण्यास सुरवात केली आहे .पण ब्लॉग लिंक दिल्यास काय हरकत आहे असे माझे मत आहे .कारण मायबोली वर शेअर केलेल्या ब्लॉग लिंक वरून मी नितांत सुंदर ब्लॉग पाहिला इथे जर लिंक नसती तर मला त्या ब्लॉग बद्दल कधीच कळलं नसत अस मला वाटते.

बेरोजगारी वाढली म्हणून लोक आज काल यु ट्यूब व ब्लॉग लिहले जातात सरकारने काही तरी केले पाहिजे यालाच म्हणतात ' अधजल गगरी छलकत जाए ' कारण भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलम १९(१) अस आहे .मग सरकारने यांना रोखण्यासाठी काही करावे अस म्हणणे शुद्ध वेडेपणा आहे . आणि यु ट्यूब आणि ब्लॉगिंग हे बेरोजगार लोक करत नसून अनेक डॉक्टर, वकील , इंजिनिअर, शिक्षक असे अनेक लोक ज्ञान दानाचे काम करत आहेत ते ही मोफत तसेच आजची तरुण पिढी दुसर्याची चाकरी करण्यात धन्यता न मानता आपल्या जवळ असलेल्या गुणांचा वापर करून पैसे कमावत आहे त्या मुळे मोठ्या प्रमाणात भारतात परकीय चलन येेेत आहे.

जर मी जास्त काही लिहल असेन किंव्हा माझ्या मुळेच कोणी दुखावलं गेले असेल तर क्षमा करावी ही विनंती

दूसरों की गलती पर ऊँगलियाँ उठाना आसान हैं।
ख़ुद की गिरेबान को झाक कर देखना नही आता।
दूसरों को गिराने में मशरूक हैं लोग आज कल ।
गिरे हुए को उठाने का हुनर आज किसी को नही आता।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती अशुद्ध लिहिता हो तुम्ही! जरा वाचून, सुधारणा करून पोस्ट करत जावा की.. एवढा मनस्ताप करण्यापेक्षा नक्कीच सोपं आहे ते.

Google indic keyboard download करा, त्यात मराठी व्यवस्थित लिहिता येतं आणि शब्द बदलत देखील नाहीत. बाकी लिंकच्या बाबतीत admin म्हणतील ते खरे! खाली लिंक देतो आहे तुमच्या सोयीसाठी. शुद्ध लिहायला लागणार असाल तर लिहीत रहा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.in...

Google indic keyboard download करा
>>>
मी हेच वापरतो
कारण मी लिहितो मराठी, वाचतो मराठी, बोलतो मराठी, अरे मी तर जगतो मराठी

लॅपटॉपवर लिहायचे झाल्यास बराहा नोटपॅड झिंदाबाद.
पण गेले दिड वर्षे लॅपटॉप उघडला नाहीये.

किती तो आटपिटा...प्रसिद्धीच्या मागे नका धाऊ...
स्वतःसाठी लिहा...छंद म्हणून जोपासा..तुमचे विचार छान आहेत पटणारे आहेत..पण खरं सांगू का आपण जेव्हा बरोबर असतो ना तेव्हा बाजू मांडण सोडून द्यावं माणसानं..कारण ज्यांना कधी तुमचं पटणारचं नाही त्यांना सांगत सुटणं माफ करा पण हा मूर्खपणा आहे..

आणि काही लोकांनी खरे तेच सांगितलं तुम्हाला..पद्धती वेगळ्या होत्या पण त्यांच्या प्रतिक्रिया प्रामाणिक होत्या..
निंदक असतील तरच मजा आहे..त्यांच्याशी भांडण करत बसण्यापेक्षा किंवा त्यांच बोलणं मनाला लाऊन घेण्यापेक्षा स्वतःत बदल करा..
निंदकांना चाहते होणं भाग पडा..ती खरी कसोटी आहे..ते खरं यश आहे..

लिहताय..जमेल तसं लिहताय...कौतुक आहे त्याचं...कुणीही आभाळातून शिकून येत नाही पण तुम्ही शिकण्यासाठी स्वतःला वेळ द्या..तो कमी पडतोय असं मला वाटतं... शुद्धलेखन ही खुप क्षुल्लक बाब कधीही सुधारा शकता..वेळ द्या ..होईल बद्दल..

आणखी एक गोष्ट मैदानात उतरत असताना खासकरून एकसे एक महारथी असताना ..फुल्ल तयारी असणं महत्वाचं.. किमान चिलखत तरी..

बघा पटतय का?

" मराठी टाइपिंग करत असताना अनेक वेळा एरर येतो तसेच बरेच शब्द बदलतात . बऱ्याचदा लेखक बोलत असलेल्या भाषेचा परिणाम लिखाणावर होतो . पण तो इतका मोठा मुद्दा नाहीच लेखकाने लिहलेले आपल्याला समजले की झाले " >> ह्या माननीय सदस्यांना १०००% अनुमोदन.
पण काय असते ना, एक प्रमाण भाषा असते ती आपण लिहिली की सगळ्यांना आपल्याला अभिप्रेत असलेले तेच आणि तसेच समजते. आपण आपल्याला हवे तसे शुद्ध, अशुद्ध, भेसळ, टायपो, शहरी, गावराण लिहिले तर ते सुद्धा १००% चालते पण ते प्रमाण नसल्याने त्याचा अर्थ समोरच्याला कसा समजेल आणि तो आपल्याला काय बोलेल ते आपल्या हातात ऊरत नाही. असो.

कालच मला व्यवस्थापणा कडून इ मेल आला की तुम्ही चांगले लिहता लिहत रहा इथे कुचकट शेरे मारणारे खूप भेटतील इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते ( विश्वास नसल्यास कोना ला हवे असल्यास मेल चा स्क्रीन शॉट मारून पाठवला जाईल) फक्त लिखाणात सुधारणा करा . >>> This is damn Interesting!
कृपया ईथे सगळ्यांनाच बघायला द्याल का ह्या ईमेल चा स्क्रीनशॉट.

मेला वातला अदि की ही काई रेसिपी आहे की के पन वचले टर बलटेच काई निघले
छन आहे
असाच लिहत रवा

लिहीत रहा. लोकांकडे लक्ष देऊ नये. लोक शुद्ध लिहीले तर इग्नोर मारतात, टायपो झाले तर त्यावर मुद्दामून प्रतिसाद देतात. इथे कित्येक विनाटायपो धागे असतील जे प्रतिसादाविना लुप्त झाले आहेत. तुमच्यात एक महान लेखिका दडलेली आहे. ती बाहेर येऊ पाहते आहे. हे टायपो आणि अशुद्धलेखन तिला थांबवू शकत नाहीत. तद्वतच हे बिब्बा घालणारे लोकही तुमच्या आणि तुमच्या होऊ घातलेल्या वाचकांमधे अडसर आणू शकत नाहीत. मला तर तुमच्यात मराठीतल्या जे के रोलिंग दिसू लागल्या आहेत.
शुभेच्छा !
(तुमच्या लिखाणाचे अपडेट्स मिळावेत म्हणून मी तुमचा चाहता झालो आहे)

@भिकाजी
@ पुरोगामी गाढव
खूप खूप आभार

मला वाटले की तुमचा तो धागा तुम्ही पूर्ण लेख इथे न देता केवळ थोडी सुरवात लिहून लिंक दिली त्यामुळे उडवल्या गेला.
पूर्ण कथा/ लेख पोस्ट करून मग लिंक देण्यास हरकत नसावी (व्यवस्थपनाकडून कन्फर्म करून घ्या).

शुद्धलेखना बाबत वर हाब यांनी लिहिले याच्याशी सहमत.
भावना पोचल्या की बस, हे गप्पांच्या पानावर वगैरे ठीक आहे. कथा, लेख लिहिताना त्यात जी भाषा वापरायची आहे (मराठी प्रमाण, कोल्हापूरी, वऱ्हाडी, इतर कुठली ग्रामीण) त्या भाषे नुसार शुद्धलेखन अपेक्षीत आहे.

"इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते"
असं मायबोली व्यवस्थापकांनी लिहिलं असेल यावर माझा विश्वास नाही. कृपया इकडे स्क्रीनशॉट पोस्ट करा
'व्यवस्थापण' बनून कोणी तुम्हाला फसवत तर नाहीये ना हे तपासून पहा.

पटलं नाही म्हणून बाकी सर्व सोडून देतोय.

हर्पेन +१
इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते>>>>>. असं मायबोली व्यवस्थापकांनी लिहिलेला स्क्रीनशॉट द्या प्लीजच.

१. लेख नेहमीच पूर्ण टाका. लगेच खाली लिंक टाकली तरी चालेल. तुमच्या लेखनाचे चाहते आवर्जून लिंकवर क्लिक करतील.
२. लेख शहरी भाषेतला असो वा गावरान बोलीभाषेतला, त्या त्या भाषेनुसार व्याकरण योग्य आहे की नाही हे पोस्ट करण्याआधीच तपासा. पोस्ट करण्याआधी किमान दोन वेळा लेख संपुर्ण वाचा.
३. लोक मौल्यवान वेळ काढून आपले लेख वाचतात तेव्हा वाचताना तो सहजरीत्या, सलग वाचता आला पाहिजे असा अट्टाहास ठेवा.
४. मायबोलीकर अजिबात कुजकट नाहीत. जर ते पुन्हा पुन्हा तुम्हाला काही सांगत असतील तर त्यात काहीतरी तथ्य नक्की आहे. खिलाडूवृत्तीने स्विकारा आणि आवश्यक बदल घडवा.
५. जिद्द सोडू नका. आज ज्या मायबोलीकरांचा तुम्हाला राग येतोय, उद्या तेच मायबोलीकर तुमचं तोंडभरून कौतुक करायला पुढे मागे बघणार नाहीत हे लक्षात ठेवा. पुढील लेखनास शुभेच्छा.

मशरूक म्हणजे काय? "मैं पल दो पल का शायर हूँ" मध्ये "मसरूफ जमाना मेरे लिए क्यूँ वख्त अपना बरबाद करे" ऐकले होते... आणि उत्तर माहिती असल्यागत राखी लिहीता लिहीता नजर उचलून बघते. अभिताभचा साधा साधा प्रश्न की राखीची कौतुकाची नजर पण एकूणातच मसरूफ विसरता येत नाही.
मायबोलीवर सुरूवातीला टायपिंग सोपे नाही. पण मायबोलीकर तसे प्रेमळ आहेत. लेखाच्या विषयावर पकड असेल तर वाचतात ही आवडीने. क्वचित "अमुक ढमुक बदल करतेस" अशा सूचना येतात. नि मग करायचा बदल (किंवा जाऊ द्यायचं). इथं कोणते असं शालिवाहनाचे शिलालेख आहेत की बदल करता येणार नाहीत.

इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते>>>>>. असं मायबोली व्यवस्थापकांनी लिहिलेला स्क्रीनशॉट द्या प्लीजच.
>>>>त्या बहुतेक तरी विपु बद्दल बोलत आहेत,पण तसे लिहिणाऱ्या संबंधित id ला स्वामिनी व्यवस्थापक का म्हणत आहेत ????

@आदू : तसेच असावे. कुणी विपु केली की notify@maayboli.com आयडी वरून इमेल येतो.
तो यांना व्यवस्थापनाचा इमेल वाटला असावा.

गाढवाला गुळाची चव काय, ही म्हण आजपासून रद्दबातल होत आहे. (पुरोगामी) गाढवाला एकट्यालाच काय ती लिखाणाची खरी चव कळली. उगीच नाही काही चाहते झालेले Wink

कीबोर्डने शब्द बदलले तर प्रकाशित करण्यापूर्वी एकदा वाचून पहात नाही का? मी लेखिका नाही पण प्रतिसाद सुद्धा दुसऱ्यांदा वाचून मगच सेव्ह करते. ज्यांचे लिखाण हजारो वाचक वाचणार आहेत, त्या लेखकाकडून किमान तेवढी अपेक्षा असते.

बऱ्याचदा लेखक बोलत असलेल्या भाषेचा परिणाम लिखाणावर होतो . पण तो इतका मोठा मुद्दा नाहीच लेखकाने लिहलेले आपल्याला समजले की झाले >>>>> अशी स्वतःच स्वतःची समजूत करून घ्यायची का? आणि हे इंग्लिश शब्दांना पण लागू आहे का ते ही कळवून टाका. आधीच्या लेखातही धडधडीत चुकीचे इंग्लिश शब्द आत्मविश्वासाने घुसवले होते. त्याला पण बोलीभाषेचा नियम लागू आहे का?

अहो ज्यांना अंडर रेस्टिंमेंट हा शब्द नीट लिहिता येत नाहीत ते निघाले दुसर्याचे लेखन सुधारायला. >>>>> ताई तुम्हाला पण तो शब्द लिहिता येत नाही हो. कालच्या लेखात आणि इथे वर पण तो चुकीचा लिहिला आहे. तो शब्द underestimate - अंडरएस्टीमेट असा आहे (तुम्ही तरी त्या अर्थांने तो दोन्हीकडे वापरला आहे). कधी कधी मराठी कीबोर्ड इंग्लिश शब्द नीट टाईप करून देत नाही तेव्हा सरळ इंग्लीशमधेच टाईप करावा.

जाता जाता अजून एक टोमणा Wink - या लेखातही खूप अशुद्ध लेखन आहे.

Pages