शब्दधन - कथा स्पर्धा - चंद्र अर्धा राहिला

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59


---
२० मार्च २०१९. समांतर विश्वातला (Parallel universe) एक अंतराळवीर (Astronaut), त्यांच्या विश्वातल्या चंद्रावर संशोधन करण्यासाठी गेलेला आहे. त्यांच्या चंद्रावर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर प्राथमिक स्वरूपाची Wormhole मधून प्रवास शक्य करू शकणारी यंत्रणा बसवलेली आहे.

पण २० मार्च २०१९ ही विशेष तारीख आहे. या दिवशी, एकोणीस वर्षातून एकदाच होणारा March Equinox चा SuperMoon आहे. या विशेष दिवशी, अशा खास SuperMoon मुळे त्याच्या संशोधन यंत्रात बिघाड होतो व संशोधन यंत्रात बिघाड झाल्यामुळे, त्या दुसऱ्या समांतर विश्वातला अंतराळवीर संशोधक, एका विशिष्ट Wormhole मधून, आपल्या विश्वातल्या चंद्रावर येतो.

पुढच्या एकोणीस वर्षांनी जेव्हा तशीच परिस्थिती परत होईल, तेव्हाच तो त्याच्या स्वतःच्या विश्वात परत जाऊ शकतो. पण त्यासाठी त्याला एका विशिष्ट उपकरणाची गरज असते. तेव्हाच मोहिमेसाठी चंद्रावर गेलेल्या, इस्रोच्या शास्त्रज्ञांना तो अंतराळवीर भेटतो व त्याची कैफियत सांगतो.

त्यावेळी इस्रोची आणखी एका नव्या चंद्र मोहिमेची तयारी चालू असते.
इस्रोचे हुशार शास्त्रज्ञ, हे शोधून काढतात की, पूर्ण १९ वर्षे वाट बघायची गरज नाही. त्या विशिष्ट उपकरणामध्ये विशिष्ट बदल केल्यास, अगदी लगेच होणाऱ्या पुढच्या सुपरमुनला म्हणजेच २३ सप्टेंबर २०१९लाच तो अंतराळवीर त्याच्या विश्वात जाऊ शकतो. भारत सरकार स्वखर्चाने नवे रॉकेट पाठवून ते विशिष्ट उपकरण चंद्रावर पाठवायला तयार होते.

दुसऱ्या समांतर विश्वातून आलेला अंतराळवीर त्यावेळी चंद्रावर उपस्थित असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना कसा भेटतो?
शास्त्रज्ञांचा व त्याचा संवाद कसा होतो?
या बदल केलेल्या उपकरणाच्या मदतीने, तो अंतराळवीर २३ सप्टेंबर २०१९ला त्याच्या विश्वात परत जाऊ शकेल का?
***
लवकर कथा लिहायला घ्या नाहीतर तो आपल्याच विश्वात अडकून पडेल पुढची एकोणीस वर्षे!

नियम:
१. ही स्पर्धा आहे.
२. दिलेल्या विषयावरून कल्पनाविस्तार करून नवी काल्पनिक कथा लिहायची आहे.
३. शब्द मर्यादा नाही.
४. कथेचा मूळ गाभा हाच ठेवून त्यात हवे ते बदल करता येतील.
५. मूळ गाभा काल्पनिक कथा आहे. वैज्ञानिक व तांत्रिक बाबतीत हवे तेवढे व हवे तसे स्वातंत्र्य घेऊ शकता.
६. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरिता २ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७. 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
९. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - {कथा स्पर्धा} - {प्रवेशिकेचं नाव} - {तुमचा आयडी}"
१०. प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.
११. या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

संदर्भ:
Supermoon: https://en.wikipedia.org/wiki/Supermoon
March Equinox: https://en.wikipedia.org/wiki/March_equinox
Parallel Universe: https://en.wikipedia.org/wiki/Parallel_universes_in_fiction
Wormhole: https://en.wikipedia.org/wiki/Wormhole

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्त साय-फाय विषय आणि कल्पना!
मायबोलीवर साय-फाय कथा लिहिणारे अ‍ॅस्ट्रोनॉट-विनय आहेत, ते नक्कीच लिहू शकतील ह्या विषयावर एक मस्त कथा.
चित्र मस्त आहे, रहस्यमय विषयाला अगदी साजेसं.

इंटरेस्टिंग !

>>>मायबोलीवर साय-फाय कथा लिहिणारे अॅस्ट्रोनॉट-विनय आहेत, ते नक्कीच लिहू शकतील ह्या विषयावर एक मस्त कथा.>>>
+७८६
अगदी हेच नाव डोळ्यासमोर आलेलं. विनयजींना विपू करायला हवी. Happy

नियम:
१. ही स्पर्धा आहे.

>>> बरे झाले सांगीतले Happy