शब्दधन - हास्य लहरी - विनोदी कथा लेखन स्पर्धा

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

hasya lahari.jpg
---
रामराम मंडळी!
कसे आहात? आम्ही बाकी मज्जेत! Happy
गणेशोत्सवाची तयारी तर जोरदार चालू दिसतेय सगळीकडे. मायबोलीवरही गणेशोत्सवाचा उत्साह काही कमी नाही! कित्तीतरी स्पर्धा आणि उपक्रम आयोजित झालेत. मग, तुम्ही घेताय की नाही भाग स्पर्धांत आणि उपक्रमांमध्ये?

आपल्या धावपळीच्या जीवनात, सर्व थकवा, टेंशन विसरून आपल्या ओठांवर हसू आणेल असे लेखन म्हणजे विनोदी कथा. आणि या कथा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, नाही? पण आम्ही विचार केला की, "नेहमी दुसऱ्याने बनवलेल्या डिशवरच का ताव मारायचा, आपणही काही बनवायला हवं की नको?"
म्हणूनच खास तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत एक अशी स्पर्धा ज्याने केवळ तुमचेच नाही तर तुमच्यासोबत सर्वांचे मनोरंजन होईल. आणि दुसऱ्यांच्या ओठांवरील हास्याचे काही श्रेय तुमचेही असेल. तर घेताय ना भाग या स्पर्धेत जिचे नाव आहे, विनोदी कथा लेखन स्पर्धा!

या स्पर्धेत विषय आणि शब्द मर्यादा यांना काहीच बंधन नाहीये. मुक्तपणे होऊन जाऊ द्या तुमच्यातल्या विनोदी व्यक्तिमत्त्वाचा उलगडा सर्व मायबोलीकरांसमोर...

पण या स्पर्धेदरम्यान आपल्याला सर्वांना फक्त आणि फक्त आनंदच वाटता यावा यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल -
१. कोणत्याही व्यक्तीला वाईट वाटेल असे विनोद करू नका. (म्हणजेच, कुणाचा अनादर व्हायला नको.)
२. कृपया अश्लील विनोद करू नयेत.
३. कथा स्वरचित असावी.
४. कृपया पूर्वप्रकाशित कथा वापरू नये.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - {हास्य लहरी} - {प्रवेशिकेचं नाव} - {तुमचा आयडी}"
५. प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील. (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाण वेळ)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users