माबोवरचं निवडक लेखन..

Submitted by mi manasi on 27 November, 2019 - 00:54

माबोवरचं काही वर्षांपुर्वीचं निवडक लेखन....सगळ्याना खुप आवडलेलं कुठे वाचता येईल?
मला माबोवरच्या सभासदांकडूनच त्यांना आवडलेलं लेखन सांगणं अपेक्षित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जावेद खान , धन्यवाद !
मला माबोवरच्या सभासदांकडूनच त्यांना आवडलेलं लेखन सांगणं अपेक्षित आहे.

मला दाद आयडीचं सगळं लिखाण आवडतं, बागेश्रीचं लिखाण तर माझं ऑल टाईम फेवरेट.
भुंग्याची एक कविता ' तू अशक्य आहेस' माझी ऑल टाईम फेवरेट आहे.

तुम्हाला कुठल्या टाईपचं लेखन आवडतं त्यावरही उत्तर ठरतं.
कथा हव्या असतील तर त्यात ही प्रकार आहेत. हॉरर सस्पेन्स साठी विशाल कुलकर्णी, कवठी चाफा, कौतुक शिरोडकर वगैरे
कौटुंबिक जिव्हाळ्याचे विषय हवे असतील तर विद्या भुतकर, मोहना, बासुरी,दाद वगैरे
टाईमपास हसवणुक हवी असेल तर कवठीचाफा, धुंद रवी, मुंगेरीलाल , किरण्यके, भुंगा, मी अनु वगैरे
प्रेमकथा म्हणलं की माझ्यापुढे नंदिनी शिवाय दुसरं नाव येत नाही. आता तिचं लिखाण माबोवर आहे का ते ही माहित नाही
मृण्मयीचं लिखाण ही छान आहे
फारेण्ड आणि श्रद्धाच्या हसवणुकीचा प्रकार वेगळा
शालीच्या लेखनाचा प्रकार वेगळा

हे माझ्या टाईपचे काही गेल्या ५ वर्षातले लिखाण....

त्या आधी मायबोली वर आणखी सकस लिखाण होतं ते अजुन माझं ही वाचुन झालेलं नाहीये.

आणि हे एकदम पटकन डोक्यात आलेले लेखक आहेत, यांच्या खेरीज माबोवर आणखी सुंदर साहित्ये आहेत

रीया, हाँरर, सस्पेन्स सोडून सगळं हवय मला...कथा, कविता, लेख, विनोदी, बालसाहित्य ..
तुम्ही जे सांगताय त्याची लिंक देऊ शकता का?..नेमकं शोधण्यात खुप वेळ जातो.
छान प्रतिसाद दिलात..धन्यवाद !

किती आणि कोणत्या कोणत्या लिंका देउ हा पण प्रशन आहे की Happy

एक काम करा, ज्या लेखकाचं लेखन वाचायचंय त्याचं नाव सर्च मधे द्या... त्याचं कोणतंही लेखन किंवा प्रतिसाद मिळवा आणि मग लेखकाच्या नावावर जाउन त्याच्या लेखनातुन हवं ते वाचायला घ्या...

मी नेहमी असंच करते Happy

रीया ok तसं करते.
रीया, अँमी, वावे . पुरोगामी गाढव ...सगळ्यांची खुप आभारी आहे.
पुरोगामी गाढव....कोणाची होती ती कथा?

वरदा यांचं एका आर्कियॉलॉजिस्टची डायरी ,
अर्निका यांचं लेखन.

मायबोली दिवाळी अंक वाचून पहा. मायबोली विशेषमध्ये दिसतील.

कुठे लिहू कळेना... पण सांगावसं वाटतंय.
आपली मायबोलीकर अर्निका हिची मुलाखत आहे आवाहन iph ह्या तुनळीवर. खूप छान वाटतेय. मी रात्री सवडीने बघणार आहे.
https://youtu.be/DmOM21OLfTI

<<कुठे लिहू कळेना... पण सांगावसं वाटतंय.
आपली मायबोलीकर अर्निका हिची मुलाखत आहे आवाहन iph ह्या तुनळीवर. <<
https://www.maayboli.com/node/22566 इथे एक धागा काढुन टाकु शकता.

मायबोलीकर धुंद रवी लेखक /कवी / गीतकार / पटकथा लेखक /नाटककार हे टप्पे पार पाडत आता चित्रपट निर्माता झाले आहे. त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. अभिनंदन रवी!

अर्निका चे इथले लेख आणि तिचा वृत्तावरचा युट्युब चॅनल खूप गोड आहे.नक्की वाचा आणि पहा.

धुंद रवींचा पिक्चरही पाहणार.