मनोरंजन

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

Submitted by अनन्त्_यात्री on 9 September, 2025 - 10:22

कविता रतीचे | विभ्रम अनंत
त्यांचे मी गणित | कैसे करू? || १ ||

तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये Happy ||२ ||
~~~~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास

कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना ज्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते

गणिताच्या मर्यादांचा
ज्या कुणी(@) लाविला शोध
तो कवी नसावा हृदयी
याचा नच उरतो खेद

विषय: 

(π)वाट

Submitted by अनन्त्_यात्री on 4 September, 2025 - 03:40

स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरतो तत्त्वता

वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा #
व्यास बनुनी राहते

(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो

वर्तुळाच्या गारुडाने
भूल कसली टाकली
तत्त्वज्ञानाची कवाडे
(π ) करितो किलकिली

परीघ, त्रिज्या दोन्हीही
परिमेय असती पण तरी
(π ) का मज वेड लावी
अपरिमेयाचे परी
~~~~~~~~~~~~~

# जीवा = chord of a circle

विषय: 

शशक=३- वरणभाताचा फंडा.- केशव्कूल

Submitted by केशवकूल on 29 August, 2025 - 10:26

माबोवाडीतील पांडू नावाचा आयडी. गणपतीचे दिवस.
तो घरी येत असता जंगलात त्याला संयोजकदेवाने दर्शन दिले.
पांडूची भीतीने बोबडी वळली. हात जोडून तो म्हणाला,“जय देवामहाराजा,चाहे तो जिया मेरा लेलो पण आयडी नका घेऊ.”
“पांडोबा, आयडी घेत नाही पण माझा जठराग्नी भडकला आहे. काहीतरी खायला दे.”
हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?
“हे कोण बोलले?”
“मी नाही, मी नाही. वाचक बोलले असणार. पण देवा. माझ्याकडे फक्त दोन अंडी आहेत. नॉनवेज चालेल?“
“चालतील.” संयोजकांनी अंडी पोटाशी धरली. जठराग्नीने अंडी उकडली.

लिहाया गेलो शशक...

Submitted by केशवकूल on 27 August, 2025 - 16:03

तर पांडगो, “सांगा आजची गोष्ट”
“ऐका रे पोरांनो.
मी यस्टीच्या थांब्यावर कोल्हापूरच्या यस्टीची वाट बघत होतो.अमावाश्याची रात, मी यकटाच उभा, एव्हढ्यात ती आली,”
“अरे बाप रे. तुम्हाला भ्या नाही वाटले?”
“आपुन घाबरत नाय.आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.”
“आता “तो” कोण?”
“सांगणार सांगणार, तुम्ही लोक मधेच मला आडवू नका बरका. तेन काय व्हत की माझी कंटीन्युटी? ती “ही” होते,”
“बर बुवा सांगा. नाही डिस्टर्ब करत.”

स्ट्रिंग थिअरीचा पाया

Submitted by अनन्त्_यात्री on 25 August, 2025 - 08:07

FunUवादी लेखनाची
FunAतनी कोलांट्यांची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का सो मि वर?

बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)

"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?

ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?

असिधारा व्रत माझे
FunUवादी लेखनाचे
भर्कटणे क्रमप्राप्त
लोड नका घेऊ त्याचे !

विषय: 

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली..

Submitted by अनन्त्_यात्री on 23 August, 2025 - 07:25

केस पांढरे म्हणून
डाय लावतो हिरवा
"पाखरांनो" सावधान
घुमे टेचात पारवा

केस पांढरे म्हणून
डाय गुलाबी लावतो
"पाखरांनो" उडलात
तरी पिसे हा मोजतो

केस पांढरे म्हणून
काळा कलप लावतो
"पाखरांनो" सावध ! हा
दाणे दुरून टाकतो

केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
"पाखरांनो" नका भिऊ
विषहीन याची नांगी

विषय: 

पोस्टकार्ड

Submitted by निमिष_सोनार on 6 August, 2025 - 06:08

पहिले महायुद्ध सुरू होते. धुक्यात लपलेल्या ट्रेंचेस, गोळ्यांचा मारा, आणि तोफांच्या आवाजाने क्षणाक्षणाला पृथ्वी हादरू लागली होती. पहिल्या महायुद्धाच्या धगधगत्या रणभूमीवर, फ्रेंच सैनिक पियरे आणि जर्मन सैनिक हान्स हे दोन शत्रू एकमेकांच्या विरुद्ध उभे होते.

पियरे एका लहानशा खंदकात लपला होता. त्याच्या हातात रायफल होती, पण मनात भीती आणि द्विधा मनस्थिती होती. दोन दिवसांपासून त्याने आपल्या घरून आलेले पत्र उघडले नव्हते. त्याच्या लहानग्या मुलीचा वाढदिवस होता, आणि त्या पत्रात तिचं चित्र असणार होतं. पण युद्धाच्या भीषणतेत, तो पत्र उघडण्याची हिम्मत करत नव्हता!

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

Submitted by मार्गी on 4 August, 2025 - 23:52

नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.

शब्दखुणा: 

.... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 August, 2025 - 06:06

& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!

... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!

चित्रपट जवान Happy

बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...

एक अनोळखी कॉल

Submitted by प्रथमेश काटे on 29 July, 2025 - 12:39

एक अनोळखी कॉल

मीनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर, ऑफिसचं काम करत बसली होती. रात्रीचे साधारण अकरा वाजले होते. आसपास पूर्ण शांतता होती. मधेच बाहेर रस्त्यावरून, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. तिने उत्सुकतेने फोन उचलला.

"हॅलो?" ती म्हणाली.

पलीकडून काही उत्तर आलं नाही. फक्त मंद श्वासोच्छ्वास ऐकू येत होता. मीनल पुन्हा "हॅलो?" म्हणाली, पण पुन्हा तेच. रॉंग नंबर समजून, तिने फोन कट केला.

पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला. त्याच नंबरवरून. पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला‌ ; पण समोरून काहीच उत्तर आलं नाही.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन