
श्रुतीला मी ती प्राथमिक शाळेत असल्यापासून ओळखते. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. 'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमाबद्दल मैत्रिणीशी बोलत असताना ती सहज म्हणून गेली की श्रुती यानिमित्ताने काहीतरी लिहू शकेल. श्रुती एवढी मोठी झाली हे तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली कश्या प्रकारचं लेखन हवं, Serious, stat-oriented, or whimsical, personal-oriented?
थोडं 'हलकंफुलकं' असलं तर बरं अस मी कळवल्यानंतर पुन्हा आठवण करुन देण्याआधीच आठवड्याभरात लेख माझ्याकडे आलासुद्धा!
महिला दिनानिमित्त 'संयुक्ता' तर्फे या आठवड्यात सादर होणार्या कार्यक्रमातला हा पहिला लेख-

८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.
मुंबईपुढचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लक्षिला गेलेला प्रश्न कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. मुंबईपुढचे पाणीटंचाईचे संकट दरवर्षी उग्र स्वरुप धारण करत आहे. पावसाळ्यात तानसा,वैतरणा,विहार्,मोडकसागर तलाव भरुन वाहू लागल्याच्या बातम्या एकेकाळी वर्तमानपत्रांमधे आल्या की आता उन्हाळ्यापर्यंत पाणी नक्की पुरणार असं समजून मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडायचा.
मागील ४२ वर्षांपासुन बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील प्रकल्पात तरूणांचा श्रमसंस्कार शिबिर भरत आलेला आहे. या वर्षी हा शिबिर प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे दि. १५ ते २२ मे दरम्यान भरणार आहे.
या शिबिरात संपुर्ण भारतातुन तरुण मंडळी हजेरी लावत असतात. आधी कसलाच गाजावाजा नसुन सुद्धा लोकांची प्रचंड गर्दी होत असे. पण आज विविध वाहिण्यामुळे आमटेंच्या प्रकल्पाबद्दल फार सांगायची गरज पड्त नाही. प्रत्येकाला त्यांच्या कार्याबद्दल थोडीफार तरी माहीती आहेच.
मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं 