आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता कशी जपावी?

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2010 - 03:12

मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे काही मुद्दे:
१) कुणी नवखा व्यक्ती जर प्र-साद सारखा करत असेल तर त्याला आत घेऊ नये Happy
२) शक्य असल्यास घरामधे कुत्रा अवश्य पाळावा. खूप फायदा होतो. कुत्रा नुस्ता वासानी देखील भुंकायला लागतो.
३) शक्यतोवर बाहेरील दरवाज्यांचे कुलुप digitized असावे. म्हणजे फक्त आपल्यालाच नंबर माहिती असतो. चोराला देखील अशी कुलुपे उघडण्यात लवकर यश येत नाही.

पण digitized कुलपे परवडतातच असे नाही. त्यामुळे गोदरेजचे नवीन computerized पद्धतीने बनवलेले कुलूप आणि चावी (म्हणजे दुसरी कुठलीही चावी लागत नाही त्याला) असे घेतले तर?

* शक्यतो ग्रील असावे घराला, म्हणजे, नविन माणसाला दरवाजा उघडल्या उघडल्या अ‍ॅक्सेस मिळणार नाही घरात.
* दरवाज्यात येणार्‍यांना अवास्तव माहिती देऊ नये. गरजेपुरते बोलून कटवून टाकावे.
* घरी एकटे असताना शक्यतो शेजार्‍यांना मोठ्याने आपण एकटे असल्याचे सांगू नये. कोणजाणे कोणी नजर ठेवुन असेल तर?
* कामवाली, माळी यांना कामावर ठेवण्यापुर्वी त्यांची पुर्ण माहिती घेऊन त्याची नोंद आपल्याकडे करून ठेवावी, नुसती ठेवु नये तर त्याची शहानिशा करून घ्यावी.
वेळात वेळ काढुन एखाद्या दिवशी ती व्यक्ती नक्की तिथेच राहते ह्याची खात्री करून घ्यावी. शिवाय त्यांच्या योग्यतेची खात्री पटेपर्यंत त्यांच्यावर घराची जबाबदारी सोपवू नये.
* शक्यतो ओळखीतून आलेल्या बायकांनाच कामावर ठेवावे. अचानक काम द्या म्हणून समोर येणार्‍या व्यक्तीला काम देऊ नये.
*ड्रायव्हर, माळी, झाडुवाला अशा पुरूष कामगारांशी स्त्रियांनी कामापुरते बोलावे, जास्ती बोलणे आणि माहितीची देवाण्-घेवाण हानिकारक ठरू शकेल.

मी तर केबलवाला, पेपरवाला बिल मागायला आला की फक्त दरवाजा उघडून ग्रिलमधूनच पैसे आणि रिसिट घेते.. कुणालाच घरात घेत नाही. केबल आणि पेपर वाला गेली ५ वर्ष सेम आहे तरिही..

कुरीयरवाले, पत्ता विचारायला येणारे, सेल्समन ई. पासुन पण सावध रहावे... शकयतो जाळीचा / लोखंडी दरवाजा उघडु नये.
अनोळखी व्यक्तीनी फोन केला तर.. घरात कोणी नाही असं सांगु नये

हल्ली बर्‍याचश्या मोठ्या शहरात कामवाल्या बायका वैगरेंसाठी पोलिस व्हेरिफिकेशन करुन घेता येते. इथे दिल्लीमध्ये तर पोलिस नेहेमी याबद्दल सांगत असतात.

मुख्य म्हणजे ४-५ दिवसांसाठी गावाला जात असल्यास फार गाजावाजा करु नये. अशा बातम्या लवकर पसरतात. अगदी जवळच्या शेजार्‍याला सांगून ठेवावे. शक्यतो पेपर वाल्याला सांगून ठेवावे. बाहेर पेपर पडलेले पाहून संशय येतो.

चोर हे वाचून आला तर?

१) सर्व कामवाल्या स्टाफ चे फोटो असावेत.
२) इमर्जन्सी फोन नं ठळक अक्षरात सर्वांना समजतील असे लिहलेले असावेत.
पोलिस, हॉस्पिटल, अ‍ॅम्ब्युलन्स, गावातील खात्रीशीर नातेवाइक.
३) घरात बहुमुल्य दागिने वगैरे ठेवू नये. घरात हॉटेल सारखा डि़जिटल सेफ असावा.
४) एक टॉर्च, ( भरलेली ब्याट्री सहीत) रिचार्जेबल इमर्जन्सी लॅम्प घरात हवा.
५) अनोळखी चेहर्‍यास घरात घेऊ नये.
६) कुत्रे मस्ट
७) घरातील गॅस रात्री बंद करून झोपावे/ बाहेरगावी जावे.
८) पैशाची चर्चा नोकरांसमोर करू नये
९) नवे दागिने वगैरे मोलकरणींच्या समोर काढू नये.
१०) तिखट पूड, स्प्रे, सेफ्टी पिन बायकांनी नेहमी ब्यागेत ठेवावी, व स्वसंरक्षणात्मक डावपेच शिकून घ्यावेत.

मला तर एक विचित्र अनुभव आलाय, एक बाई ३-४ आठवड्याच्या अंतराने कायम १६ सोमवाराचं उद्यापन करायचंय पैसे द्या म्हणत येते. पर्वा मी तिला खूप प्रश्न विचारले... ती म्हणाली नको पैसे, आणि पळून गेली...

हाकलून दिले तीस>>>मामी हाकलुनच द्यायच होत तर तीस रूपये तरी का द्यायचे? Wink

जोक्स अपार्ट पण बर्‍याच वेळा खरा गरजु कोण आणि ढोंगी कोण हे कळत नाही अगदी साध्या गोष्टींसाठी मदत मागत असेल तरी. उदाहरणार्थ आमच्या घरी टॉयलेट वापरायला मिळेल का अस विचारत अजुनही कधी कधी लोक विशेषतः बायका येतात. कोणाचा काय भरवसा द्यावा म्हणुन आम्ही सरळ समोर सुलभ शौचालय आहे अस सांगतो. पाणी व. ग्रील मधुनच देतो. कुरियर, पोस्टमन, पेपर बील व. सर्व व्यवहार ग्रील न उघडता करतो.

माझ्या आईला एकदा एका बाईने लहान मुलीला बरोबर घेऊन येऊन असच गंडवल होत (भावाची ओळख व्.सांगुन, खोटा सेल नंबर देऊन) आईने नंतर तिला बरोबर रस्त्यात अडवुन लोकांसमोर तिचा खोटेपणा उघडकीस आणुन पैसे वसुल केले. कोणाच्याही भुलथापांना बळी पडु नये. मदत देखील योग्य संस्थे मार्फत द्यावी.

खटके वाल लॉक (त्याला काय म्हणतात) ते पण बसवुन घ्याव शक्य असेल तर.

या संदर्भात एक हकिगत आठवली," १९७५-८० या दरम्यान घडलेली. गावाकडे माझे मोठे काका घरची गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय असल्याने कायम टूरवर असायचे. घरात आजी, मोठी काकू आणी माझी ६ चुलत भावंड... ! सगळे अंगणात झोपायचे. आजीने एकदा रात्री उठल्यावर चौकाच्या पलिकडल्या घराच्या आवारात काही तोंड बांधलेले लोक दरोड्याच्या हेतुने आलेले पाहिले...(तेव्हा फोन/ टीवी घरात घेतलेला नव्हता) घरात पुरुष मंडळी कोणी नाही अशा स्थितीत आजीने प्रसंगावधान राखुन हळुच काकूला उठवले व भराभर झोपलेल्या या लहान मुलांना घरात फेकले ( हो फेकलेच म्हणायचे) आणि नंतर घरात आतुन सर्व कड्या वगैरे लावल्यानंतर खुशाल खिडक्या उघडल्या मग रेडीओचा आवाज मोठा करुन, घरात कोणी पुरुष मंडळी असल्यासारखे दोघींनी बोलणे सुरु केले ( काय रे बापु, काय रे अप्पा असे).... !
असो...प्रसंगी काय करायचे ते यावरुन लक्षात येइल...काळानुसार बदल होइल पण एकूण काय प्रसंगावधान राखणे महत्वाचे!

>>>> घरी एकटे असताना शक्यतो शेजार्‍यांना मोठ्याने आपण एकटे असल्याचे सांगू नये. कोणजाणे कोणी नजर ठेवुन असेल तर?
याच चालीवर, (खास करुन घरातील कर्ता पुरुष माणुस असाल तर) आपले बाहेर जायचे-यायचे वेळापत्रक अगदी दुसर्‍याने घड्याळ लावुन घ्यावे इतके अचूक ठेवू नये, अधे मधे दान्डी मारुन अचानक घरी परतणे, वा थोडे उशिराच जाणे हे केव्हाही चान्गले! Happy

याव्यतिरिक्तही तुलनेत "टगे व वेळेस चार हात करु शकतील" अशा मण्डळीन्ना घर राखण्यासाठी करता येऊ शकेल असा उपाय म्हणजे
दिवाळीत जास्तीचे अ‍ॅटमबॉम्ब्/बाण/भुईनळे आणून ठेवावेत, पुढील वर्षी ते वाजवुन पुन्हा नविन स्टॉक भरुन ठेवावा! माचिस्/सिगारेट लायटर इत्यादी सहज सापडेल असेच दोन चार ठिकाणी ठेवावे
धुणी वाळत घालायची काठी, नारळ फोडायचा कोयता, भाजी चिरायची विळी/सुरी, मिसळणावळातील तिखटाची भुकटी ही नित्य कामाव्यतिरिक्त, केव्हाही गरज लागल्यास सहज सापडेल असे पण झाकुन ठेवावे, व मुले मोठी असल्यास त्यान्ना कार्यकारणभाव समजावुन सान्गावा! Happy
मी म्हणजे राजा, बायको म्हणजे राणी, पोरे म्हणजे राजकुमार्/राजकन्या, अन माझे घर म्हणजे माझे राज्य, हे असे वागताना, तुमच्या राज्यात, तुमच्या माहितीच्या पाहुण्यान्ची वेळीअवेळीची वर्दळ जरुर असु द्यावी, टेहेळणी करणार्‍यांस याचा वचक बसु शकतो.
रात्री झोपताना, उशाखाली सन्रक्षणास आवश्यक असे वाटतील व सहज हाताळता येतिल अशा सर्व वस्तू बाळगाव्यात.
जमल्यास, शेजारच्या दोनचार घरान्चे मिळून एक असे "रॅकेट" करावे की एखाद्याच्या घरातील विशिष्ट बटण दाबताच बाकिच्यान्च्या घरात बेल्/सायरन वा तत्सम ऐकू जाईल, याकरता हल्ली बहुतेक ठिकाणी इन्व्हर्टर अस्तातच, तेव्हा वीज खन्डीत होण्याचा प्रश्न पडू नये, तसे असल्यास चार्जेबल ब्याटर्‍यान्वर ही योजना करावी.
अगदी काहीच न जमल्यास फ्लॅटमधे शेजारच्याच्या भितीला भोक पाडून दोरीने घण्टा बान्धावी! Proud
वर्षाचे बारामहिने बत्तीस काळ, कोणत्याही क्षणी चोर्/लुटारू/दरोडेखोर यान्चा हल्ला "अनपेक्षितरित्याच" होईल हे "गृहित" धरुन वागावे, म्हणजे त्या "अनपेक्षित" पणाचा धक्का न बसता वेळेस नेमक्या कृती हातुन घडतील.

जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा, घरातील अन्तर्गत सामानाची माण्डणी बदलत रहावे!
चोर्/दरोडेखोर घरात घुसू लागल्यास्/घुसल्यास, जेवढे तुम्ही घाबरलेले असू शकता, त्याहून दसपटीने जास्त ते घाबरलेले अस्तात, तसेच, डिस्कव्हरीवर बघितले असेल की "चित्ता" या व्याघ्र जातीस, शिकार करताना अतिशय साम्भाळून करावी लागते कारण त्याची शरिररचना नाजुक असून, "जखमी" झाल्यास त्याला ते परवडणारे नसते. चोर्/दरोडेखोरान्चे देखिल असेच आहे हे मनी ठसवावे.

आशू, बीबी घरासन्दर्भात आहे म्हणून, नाहीतर "रोजच्या जाण्यायेण्याचा एकच एक रस्ता/मार्ग/साधन ठेवू नये" ही अ‍ॅडीशन टाकली अस्ती! Happy

जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा, घरातील अन्तर्गत सामानाची माण्डणी बदलत रहावे!
चोर्/दरोडेखोर घरात घुसू लागल्यास्/घुसल्यास, जेवढे तुम्ही घाबरलेले असू शकता, त्याहून दसपटीने जास्त ते घाबरलेले अस्तात, तसेच, डिस्कव्हरीवर बघितले असेल की "चित्ता" या व्याघ्र जातीस, शिकार करताना अतिशय साम्भाळून करावी लागते कारण त्याची शरिररचना नाजुक असून, "जखमी" झाल्यास त्याला ते परवडणारे नसते. चोर्/दरोडेखोरान्चे देखिल असेच आहे हे मनी ठसवावे.

>> मनाने खंबिर जरुर असावे पण, प्रसंग पाहुनच हे करावे. भुरट चोरे असतिल तर ठिक पण, काहिवेळा हे लोक आपल्या अंदाजापेक्षा जास्त सक्षम असुन कुठल्याही थराला (शारिरिक ईजा वैगरे)जावु शकतात अशावेळी पैशा-अडक्याचा मोह ठेवु नये,"सर सलामत तो पगडी पचास".

अधे मधे दान्डी मारुन अचानक घरी परतणे
>> ह्ये बाकी सगळ्यात बेष्ट! Wink
विनोदाचा भाग सोडा. पण एकदा मी आणि नवरा साडेनऊला ऑफिसला गेलो. जाताना मला अचानक वाटायला लागलं की आपण इस्त्रीचा प्लगच काढला नाहिये. माझं टेंशन इतकं वाढलं की आम्ही ११ ला परत घरी आलो. आणि येऊन बघतो तर आमच्या घराचं दार फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला कुणीतरी.
त्या दिवशी आमच्या बिल्डिंगमध्ये जवळपास ६ घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झालेला!
घरासमोरचा मुलगा १० वाजता ऑफिसला गेलेला.. त्याचही घर ह्या १० ते ११ दरम्यानच्या काळात फोडलेलं!

मला आणखी एक सुचलं. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत असे अनेक लोक टेडी बेअर व तत्सम सोफ्ट टॉइज गाडीच्या मागे डिकीत काचेतून आरामत दिसू शकतील अशा प्रकारे ठेवलेले असतात. खेळण्यासाठी जरुर बरोबर बाळगावीत, पण अशी खेळणी सहज दिसू शकतील अशी ठेऊ नयेत, कारण त्यामुळे घरात लहान मुले आहेत ह्या गोष्टीची रस्त्यावरून येता जाता आपसूक जाहिरात होते. शिवाय असे वाहन महागडे असेल तर "पार्टी मालदार आहे" असा (बरोबर अथवा गैर) समज करून गुन्हेगार अपहरणाची योजना बनवू शकतात.

ही गोष्ट कदाचित अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकेल, पण गुन्हेगार कसा विचार करू शकतात ह्याचा आपण विचार केला तर अशा अनेक गोष्टी सुचू शकतात.

>>>> मनाने खंबिर जरुर असावे पण, प्रसंग पाहुनच हे करावे
अगदी बरोबर! आपली कुवत, आवाका ओळखुनच हे करावे! जे मुळात "टगे" आहेत, हाणामारीची खुमखुमी आहे, ज्यान्ची पोरे सोळासतरावर्षाची तरणीबाण्ड आहेत, अशान्नीच या उपायान्च्या मागे लागावे, त्यासाठी पोरान्ना जिमला जरुर घालावे

>> आशू, बीबी घरासन्दर्भात आहे म्हणून, नाहीतर "रोजच्या जाण्यायेण्याचा एकच एक रस्ता/मार्ग/साधन ठेवू नये" ही अ‍ॅडीशन टाकली अस्ती!

शीर्षक बदलले आहे Happy

>> अगदी दुसर्‍याने घड्याळ लावुन घ्यावे इतके अचूक ठेवू नये

अनुमोदन लिंबूटिंबू!

मी एकदा हापिसात जायला उशीर झाला म्हणून बस ऐवजी बस थांब्याच्या शेजारी असलेल्या रिक्षा स्टँड वर गेलो तर पहिलाच रिक्षावाला मला म्हणाला "काय साहेब, आज उशीर?"

तेव्हापासून मी माझं सगळं वेळापत्रक आणि बस पकडण्याची ठिकाणं बदलून टाकली.

मला घरी एकटं रहावं लागणार असेल तर अशावेळी मी धुण्याची काठी, कात्री असं गादीखाली घेऊन झोपते. दरवाज्याच्या सर्व कड्या लावते, खिडक्या सुद्धा पुर्ण बंद असतात. अगदी टॉयलेट बाथरूमच्या दरवाज्याना ही कड्या लावते. न जाणो या लोकांचं डोकं कुठे चालेल आणि कुठुन प्रवेश करते होतील.

>>>> शीर्षक बदलले आहे
बरोब्बर, अधिक व्यापक झाल आता
वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सना सहसा हा प्रॉब्लेम नस्तो कारण जे काय रक्षण करायचे ते एकाच दरवाजाचे! पण जमिनीलगतचे फ्लॅट, बन्गले इत्यादिन्च्या खिडक्या हल्ली अल्युमिनियमच्या सरकत्या दरवाज्यान्च्या (स्लायडिन्ग डोअरच्या) अस्तात. या खिडक्यान्बाहेरुन अत्यन्त पक्केपणाने लोखण्डी जाळी बसवणे आवश्यक ठरते अन्यथा या खिडक्या सहज उचकटता येतिल इतक्या नाजुक अस्तात
आमच्याइकडे चोरान्ची नवि शक्कल म्हणजे खिडकीतून दहा बारा फुटी बाम्बु घालुन दरवाज्याची कडी उघडली जाते व आत प्रवेश करुन वेळेस धाक वा भुलीची औषधे वापरुन मग बिनबोभाट चोरी उरकली जाते, खिडकीतुन काठी/हुकाद्वारे कपडे/सामान काढून घेणे ही नित्याची बाब होऊन बसली आहे. तेव्हा या बाबत काळजी घेतली जावी
उन्च बिल्डिन्गमधे रहाणार्‍यान्करता, रस्ता-पार्किन्ग व प्रत्यक्ष सदनिका या दरम्यानचे जाण्यायेण्याचे मार्ग, अन्य सुरक्षा व्यवस्था नसल्यास, कायमच धोकादायक असू शकते हे लक्षात घ्यावे.

घराला ओपन बाल्कनी असेल तर त्याला ग्रील जरूर लावावे.
तसे आवडत नसल्यास, बाल्कनीत फक्त अशा वस्तू ठेवाव्यात ज्यांच्या जाण्याने
आपल्याला मानसिक त्रास होणार नाही. (चोराला होईल याची काळजी जरूर घ्या. :फिदी:)

>> उन्च बिल्डिन्गमधे रहाणार्‍यान्करता, रस्ता-पार्किन्ग व प्रत्यक्ष सदनिका या दरम्यानचे जाण्यायेण्याचे मार्ग, अन्य सुरक्षा व्यवस्था नसल्यास, कायमच धोकादायक असू शकते हे लक्षात घ्यावे.

अनुमोदन Happy

दक्षे, चोराला कस्ला डोम्बलाचा मानसिक त्रास?
आमच्या इकडे, साले हरामखोर अन्गणापरसातले काहीही म्हणजे काहीही चोरुन नेतात
चूलीवरचि ताम्ब्या पितळेची भाण्डी पातेली गेली, तर मी हिन्डालियमची पातेली ठेवली, ती देखिल गेली, शेवटी तेलाचे मोठे पत्र्याचे डबे एकीकडुन कापुन ठेवले, शिन्च्यान्नी ते पण चोरुन नेले!
तेव्हा आमच्यात खुप मुले रहायला असायची शिक्षणाकरता, त्या सगळ्यान्च्या चपलाबुट बाहेर होते, ते रात्रीतुन (बहुधा पोत भरुन) चोरुन नेले! दुसर्‍या दिवशी कुणालाच पायात घालायला एकही तोडकी मोडकी वाहाण देखिल शिल्लक राहिली नाही! आता बोल, त्यान्ना कस्ला त्रास होणारे?

आम्ही वाड्यात रहायचो त्यावेळेस बाहेर वाळत घातलेले कपडे चोरीला गेले, आणखी काही लोकांचे पण गेले आजुबाजुच्या वाड्यातले. पण आम्ही रहायचो तो एरिया मुळातच खतरनाक असल्याने ही असली मामुली चोरी आजुबाजुच्या ढालगज बायकांनी कशी कोण जाणे शोधून काढली. मग मी आणि आई कपड्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस चौकीत गेलो होतो. तेव्हा पोलिस त्या चोराला चोपून काढत होते.
तात्पर्य : कपडे देखील चोरीस जाऊ शकतात, योग्य ठिकाणी कपडे घालावेत (वाळत).

Pages