आमच्याकडे मी नास्तिक आहे.
आई वडिल बायको तिघेही आस्तिक आणि रीतसर देवधर्म सांभाळणारे आहेत.
पण एक गोष्ट चांगली आहे की जेव्हापासून मला कळायला लागले आहे माझ्या नास्तिकत्वात माझ्या आईवडिलांनी कधी लुडबूड केली नाही.
तसेच जेव्हा मलाही प्रगल्भता आली तेव्हापासून मी देखील त्यांच्या आस्तिकत्वाला काय तो मुर्खपणा अश्या नजरेने बघितले नाहीये.
मुलांचे भाव विश्व इतके निरागस असते ना, अगदी पारदर्शक.. आपण कल्पनाही नाही करू शकत त्याबद्दल. आपल्याला कल्पना नसते, जाणीव नसते, पण त्यांचे आपल्या बोलण्याकडे, वर्तणुकीकडे खूप बारकाईने लक्ष असते. त्यावर त्यांच्या चिमुकल्या मेंदूत काही विचारमंथन पण चालू असते.
नमस्कार मंडळी,
ही यादी अतिच लांब असल्याने रुनी potter या आय डी ने स्वतंत्र धागा काढावा ही विनंती केली, आणखी काही जणांना पण बुकमार्क करणे सोपे होईल म्हणून वेगळा धागा काढला आहे.
सध्या या सगळ्या लिंक्स मोफत उपलब्ध आहेत, नंतर मात्र काही काहीच रहातील. पण पालकांना नंतरही उपयोग होईल.
तुम्हाला ही यापेक्षा वेगळे काही सापडले तर प्रतिसादात शेअर करा. पिलवंडांची काळजी घ्या. Hugs and kisses to your kiddos. .
“सर, मी शिक्षिका होऊ? कुठला विषय शिकवू?”
“जरूर. काहीही शिकव; मीही येऊन बसेन वर्गात. पण इतक्यात नको.”
बारावीनंतर काय करायचं याबद्दल गणिताच्या मॅकिन्टॉश सरांशी गप्पा चालल्या होत्या. आपापल्या निवडीबद्दल प्रत्येकाला सरांकडून खात्रीचे चार शब्द ऐकायचे होते. शिक्षिका व्हायला सांगून “इतक्यात नको” असं का म्हणाले असतील सर?
“मंदीच्या काळात सबंध घराला जग दाखवायला बाहेर घेऊन जाणं परवडत नाही, पण जगभरातून माणसं आमच्याकडे येणार असतील तर आम्ही त्यांचा पाहुणचार आनंदाने करू”. दीमित्रा म्हणाली होती.
विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. हा जुना मिपावरचा लेख आहे. थोडा बदलून इथे प्रकाशित करत आहे.
मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम ह्या विषयाच्या अनुषंगाने होणार्या चर्चांमध्ये प्रामुख्याने खालील दोन मुद्दे असतात.:
१. इंग्रजी समर्थकांचे सगळे मुद्दे इंग्रजी ही व्यवहार-भाषा, संपर्कभाषा, ज्ञानभाषा आहे म्हणून तीच शालेय शिक्षणाचे माध्यम असली पाहिजे यावर बेतलेले आहेत.
आज सकाळी घडलेली घटना. दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात किशोरवयीन मुलांचं टोळकं उभं होतं. ओळखीची नव्हतीच. होळीची वर्गणी मागायला आली होती. ‘ शाळा नाही का रे? शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय?’ असं विचारलं तर शाळेला सुट्टी आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अशी मध्येच कशी असेल सुट्टी?
खरं तर हा मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. अभ्यासाचे दिवस. ते सोडून होळीची वर्गणी मागत मुलं फिरत होती. आणि समजा सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.
आन्याला स्केटिंग क्लासहून घरी सोडून आणि दूध बिस्किट देऊन टिव्ही लावून देऊन आजोबा त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर येऊन बसले.
या कट्ट्यावरुन बसल्या बसल्या सर्व सोसायटीतल्या घडामोडी कळत. तसा आज उशिरच झाला होता कट्ट्यावर यायला. नेहमीचे लोक जेवायला घरी गेले होते डोक्यावर डास घोंघावायला चालू झाले होते. अनिलचा दुपारीच फोन आला होता "बाबा आन्या आज शाळेतून थेट स्केटिंग क्लास समोर उतरेल.तुम्ही सहा ला घेऊन याल का तिला शेजारच्या सोसायटीतून? उद्या परवा रुद्राचे बाबा घेऊन येणार आहेत. नंतर रस्ता कळला की मुलं स्वतः येतीलच."