पद्मभुषण माननीय श्री बाळासाहेब विखे पाटील

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला.

हार्दिक अभिनंदन! Happy

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=43013:2...

लोणीत जल्लोष!
राहाता - पद्मभूषण पुरस्काराने विखेंना सन्मानित केल्याचे वृत्त येताच लोणीसह शिर्डी, राहाता भागात मोठा जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी झाली. लोणीत विखेंच्या अभिनंदनास कार्यकर्त्यांची रीघ लागली.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच श्री. विखे यांनी वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी माझ्यापेक्षाही क्रांतिकारी काम केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. समाजाने माझ्यावर प्रेम करून आमच्या झालेल्या चुका पदरात घेतल्याचे सांगून श्री. विखे म्हणाले की, आदिवासी, गरीब, दलित, अल्पसंख्याक, शेतमजूर यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न आपण सातत्याने सोडवत असून, यापुढेही अखंड आपले काम चालू ठेवणार आहोत. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय शक्ती व ताकदीला महत्त्व येत असल्याने देशात विचारांची मोठी पोकळी निर्माण होत आहे. सत्तेसाठी निवडणुका होत आहेत. लोकशाही प्रक्रिया सुधारण्याची गरज आहे. आपण मिळविण्यासाठी काहीही केले नाही. समाजाने प्रेम केले. मिळाले ते समाजाचे आहे. यश समाजाचे आहे व अपयश माझे असे सांगत साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीसह सर्व संत, महात्म्यांचे आशीर्वाद आपणास असल्याचेही श्री. विखे यांनी नमूद केले.
आपल्याला अध्यात्मात रूची आहे. त्याचाही या सन्मानात वाटा असल्याचे श्री. विखे यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशात गुंडगिरी, भ्रष्टाचार वाढतो आहे. राजकीय क्षेत्रालाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. ते थांबवण्याचाच आपला प्रयत्न सुरू आहे. सर्वच क्षेत्रांत राजकीय, सामाजिक, आर्थिक विचारांची होत असलेली मोडतोड दुखदायक आहे. गरिबांबद्दल दुरावा वाढतो आहे. आनंदाच्या क्षणात गरिबांची आठवण आवर्जून ठेवली पाहिजे. याच वर्गासाठी यापुढेही लढत राहू.

प्रकार: 

मी इथे एक पोस्ट केले होते. त्यानन्तर ते मायबोलीवर नवीन मध्येही दिसत होते, तसे ते निरुपद्रवीही होते. मग ते कसे उडाले? Uhoh

मी स्वत: बाळासाहेबांना अनेकदा भेटलेलो आहे. अनेकदा ते आमच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असत. लढत ह्या पद्मश्री विखे पाटलांच्या चरित्रा मध्ये बाळासाहेबांच्या लहाणपणीच्या जीवनाचा थोडक्यात आढावा आहे. चौथी पास झालेला माणुस काय करु शकतो? ह्या चमत्काराचे प्रत्यक्ष रुप म्हंजे मा. बाळासाहेब. प्रचंड वाचन अन माणसांचा सहवास ऑक्सीजन पेक्षा ही जास्त गरजेचा भासणारा हा नेता! नेत्यांच्या वाहणांमध्ये वाचणीय पुस्तके सापडणारा हा एक दुर्मीळ नेता! त्यांनी स्वतः वाचलेली अन नंतर आमच्या महाविद्यालयाला भेट दिलेली अनेक पुस्तके आम्हा विद्यार्थ्यांना ग्रंथालयात वाचायला मिळाली. आमच्या महाविद्यालयावर त्यांचे विषेश प्रेम! दर रविवारी, लोणी मध्ये असतील तर ते आमच्या महाविद्यालयात स्थापन केलेल्या प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळाला भेट देत.

पहिल्या पिढीने घडवलेले, दुसरी पिढी बिघडवते अशी अनेक उदाहरणे आसपास असताना, सलग तीन पिढ्या विकासाचा समृद्ध वारसा चालवणार्या पिढीचे नेतृत्व करणे सोपे नसते!

असे समर्थ नेतृत्व लाभलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो अन त्यामुळे विखे पाटलांचा सहवास लाभला, हे माझे भाग्यच म्हणायचे! Happy

.:स्मित: