दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.
आजच श्री सदानंद देशमुख लिखीत 'बारोमास' कादंबरी वाचली.
दिनेशदादांनी अगोदरच सांगितल्या प्रमाणे डिस्टर्ब झालो. हे सगळं अगदी माझ्या अवती भवती घडतेय असे वाटले..माझ्या ही गावात काही घतना झाल्याच होत्या... ती कुटुंब पुन्हा डोळ्यासमोर आली..
संवेदनशील माणसानं कधीही वाचु नये अशी ही कथा! 
इडा पिडा टळो
बळी चे राज्य येओ!
इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. 
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117
भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील?
इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.