दहशतवाद आता पुण्यातही

Submitted by महेश on 13 February, 2010 - 11:54

पुण्यात कोरेगाव पार्क येथे बॉम्बस्फोट ...

http://ibnlive.in.com/news/8-dead-in-pune-explosion-cops-suspect-bomb-bl...

http://www.cnn.com/2010/WORLD/asiapcf/02/13/india.explosion/index.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात जर्मनबेकरीत बॉम्बस्फोट
पुण्याच्या कोरेगांव पार्कातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला आहे. स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
नेमका स्फोट कशाचा झाला हे सुरूवातीला समजू शकलेलं नसल्याने स्फोटामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे एटीएस पथक घटनास्थळी रवाना झालं आहे.
एटीएसने जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात स्फोटकांचा समावेश आहे. हा सिलेंडरचा स्फोट नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आपले पुण्यातील सर्व मायबोलीकर सुखरुप असावेत हि इच्छा.
सगळ्या पुणेकर मायबोलीकरांनो, आपली काळजी घ्या.

कोरेगाव पार्कात परदेशी लोकांचा मुक्त सुळसुळाट असतो.
तिकडे रेग्युलर चेकीन्ग तरी होत असेल की नाही शंकाच आहे.
संशयास्पद लोकांचे चेकिन्ग होत असेलही,
पण आजकाल ~!@#$%^&*()_+|{}:"<>? हे दहशतवादी कसला संशय पण येऊ देत नसतील.

जरी दहशतवादी पकडले गेले तरी आपले सरकार सक्षम आहेत त्यांना पोसण्यासाठी Angry
त्यासाठीच तर निवडुन देतोय ना आपण. किती मेले किती जखमी ह्याची कसली आलीय काळजी त्यांना.

पुण्यात ससूनला AB+, व जहांगीरला O- या रक्तगटांच्या रक्ताची आवश्यकता आहे, अशी बातमी आहे.
कृपया शक्य असल्यास मदत करावी.

उद्धव ठाकरे यांचा अशोक चव्हाणांवर आरोप ...
खानाला पुरवली सुरक्षा व्यवस्था, त्यामुळे बाकी ठिकाणी झाले दुर्लक्ष ...

http://www.samaylive.com/news/uddhav-thackeray-blames-ashok-chavan-for-p...

मीनू कैच्या कैच Happy
ज्या रस्त्यावर हा स्फोट झाला, तो माझा रोजचा रस्ता होता जवळ जवळ दीड वर्षे.
हेच जर वर्किन्ग डे ला गर्दिच्या वेळात झाले असते तर आणखी हानी झाली असती.
कारण कल्याणीनगर मधे असणार्‍या कंपन्यांमधल्या लोकांमुळे सकाळी / संध्याकाळी खुप ट्रॅफिक जॅम असते.

मुसलमानांचे लाड करा (स्थानिक मदत हेच करतात)
दह्शतवाद्यांना पोसा (अफझल गुरु, कसाब)
हे करणार्‍या 'लोकप्रतिनिधींना' निवडून द्या.
आणि भो.आ.क.फ !

टिल्लू, १३ आणि २६ च का ? >> तस तर प्रत्येक दिवशी काळजी घ्यावी लागेल.
तरी पॅटर्न पाहीला तर १० - १३ व २२ - २६ तारखेस जास्त ब्लास्ट झालेत. अस माझ एक मत.
23 November 2007 Uttar Pradesh serial blasts
13 May 2008 Jaipur bombings
25 July 2008 Bangalore serial blasts
26 July 2008 Ahmedabad serial blasts
13 September 2008 Delhi serial blasts
२६/११ मूंबई
आता १३ फेब २०१०.

हम्म, कठीण आहे. जसं कसाबला FBI च्या ताब्यात दिलं जाणार नाही, त्याने अमेरीकन नागरीकांना ठार मारलं असलं तरीही.

पण कसाबशी बोलायला, त्याची चैकशी विचारपुस करायला FBI चे पथक मुंबईत आले होते. आपल्या पथकाला साधी चौकशी न करताच परतावे लागल्याचे वाचले होते. ताब्यात देणे फार दुरची गोष्ट.

हेडलीला इकडची बिर्याणी अजुन खायचीय का की त्याला आपल्या ताब्यात घ्यायची मागणी चाललीय?? कसाबचे लाड चाललेत ते पुरेसे नाहीयेत का?????

<< मुसलमानांचे लाड करा (स्थानिक मदत हेच करतात)
दह्शतवाद्यांना पोसा (अफझल गुरु, कसाब) >>
अरे पण आपले खरे शत्रु कोण ते लिहिलय की माबोवर Proud

रैना.. Sad
हेच जर वर्किन्ग डे ला गर्दिच्या वेळात झाले असते तर आणखी हानी झाली असती.
>> अशा स्फोटांचा उद्देश फक्त हानी नसतो. ग्तर भिती पसरवणे हा देखील असतोच.. याहीवेळेला नरिमन हाऊससारखेच ज्यु लोकाना टार्गेट करायचा प्रयत्न केलाय. हा फक्त पाकिस्तान आणि भारताचा प्रश्न नाहिये. फार मोठ्या स्तरावर या कटाची योजना आणि अंमलबजावणी केली जातेय. आणि याचकडे डआमचे मूर्ख राजकारणी कायम दुर्लक्ष करत आहेत. आणि त्याना साथ देणारे त्याहून मूर्ख ईलेक्ट्रॉनिक मिडीया..

रक्त, प्रेत, उडालेले शरीराचे तुकडे इत्यादि गोष्टी टीव्हीवरून दाखवू नयेत.. असा खरंतर कायदाच करायला हवा.

निदान १०-१५ वर्षांपूर्वी तरी अजिबात दाखवत नसत. एक पोलीस टाईम्स वगैरे वगळता. आता जरा भारदस्त वेब साईट्स वर सुद्धा जखमींचे फोटो येत आहेत.

खर तर काहिच दाखवु नये.
त्या पेक्ष दहशत वाद्यानि बेकरित व्हॉलेन्टाइन दिना निमित्त फुले वाटलि असे दाखवावे
म्हणजे सर्वाना छान वाटेल

अहो काहि डझन लोक मेले तर एवढे काय झाले .
एवढा मुबै चा मोठा हल्ल पचवनु सुध्द ढेकर न देणारे आम्हि
या बेकरि चि काय मोठि पत्रास.

आता निळा फेटेवाला याचा एक जोर् दार निशेध करेल. व साडिवालि गोरि बाइ त्या पेक्षा मोठा निषेध् करेल. व आम्हि भारतिय या कडे दुर्लक्ष करुन "खान"बघायला जावु
यात खाना चा काहि दोष नाहि कारण अम्हा ला च आता या स्फोटाचे काहि वाटत नाहि
या चा फायदा तो घे घेणारच.

अम्हाला खान बॉलिवुड हेच जास्त मह्त्वाचे लोक मेले काय आणि जिवंत राहिले आपल्याला त्याचे काय.

आता सुध्दा टि.व्हि. वर पण बॉम्ब स्फोट , किंवा कश्मिर मधे जवांनंचि अतिरेक्याशि झटपट या पेक्षा
क्रिकेट व खाना चि चर्चा जास्त जोरात आहे.
यात मिडिया चा दोश नाहि लोकांना च त्याचे गांभिर्य नाहि व त्यांना त्यात इन्ट्रेस्ट नाहि.
१० लोक काय पण १० लाख लोक जरि अतिरेक्यानि ठार मारलि तरि
या मुर्दाड लोकांना त्याचे काहि वाटणार नाहि.

Pages