प्रेम

दिशा प्रेमरंगांनी खुलल्या

Submitted by प्रणय. on 25 September, 2017 - 10:05

ती आवडणारी मैत्रिण
सोबत माझ्या वावरली
प्रपोज केल्यावर ठरवून
थोडं घाबरून बावरली ॥धृ॥

सौंदर्य उधळते बघून
प्रेमात पडलो होतो
घायाळ तिच्या नजरेनं
अलगद फसलो होतो ॥१॥

मनी ध्यानी नसताना
मैत्री जुळवूनी आणली
काळ हळू लोटताना
बहरून किती आली ॥२॥

कोमल हळव्या क्षणांनी
अगणित आठवणी दिल्या
सांजवेळी हात गुंफूनी
दिशा प्रेमरंगांनी खुलल्या ॥३॥

घरी दोघांनी सांगताना
धांदल आमुची उडाली
घरी प्रेमासाठी भांडताना
दिशा दोघांनी ठरवली ॥४॥

शब्दखुणा: 

प्रेमगंध

Submitted by प्रणय. on 20 September, 2017 - 12:57

गोठविणारी हवा मंतरलेली
सांजवेळ आजची बहरलेली
उधळूया का आज प्रणयरंग
पहा मनांत उठती प्रेम तरंग

भिजल्या ओठी चुंबन घेण्याची
वाट बघितली तुझ्या मिलनाची
वाटत आहे छेडावे, होऊनी धुंद
आज उधळावे, उधळूदे प्रेम गंध

तुझ्या श्वासांनी हलकेच फुलावे
माझ्या श्वासांनी अलगद फसावे
आज जडावा, जडू दे प्रणयछंद
घट्ट होतील गतजन्मांचे प्रेमबंध

―प्रणय

शब्दखुणा: 

मायबोली आणि प्रेम

Submitted by mr.pandit on 20 September, 2017 - 03:21

मायबोली वर झाली भेट
विपु मुळे झाली ओळख
जितक्या लवकर जुळल प्रेम
तितक्याच लवकर झाल ब्रेकअप

प्रेमावरची तुमची कविता
खरच खुप भारी होती
तिने पहिल्यांदा केलेली ही विपु
मी अजुन जपुन ठेवली होती

गप्पांच्या धाग्यावर आमची प्रिती
वाहत्या पानासारखी वाहत गेली
भारंभार निघणाऱ्या धाग्यासारखी
दिवसेंदिवस अजुन वाढत गेली

मी लिहिलेल्या प्रत्येक कवितेला
ती हमखास प्रतिसाद द्यायची
मी दिलेल्या धन्यवादामुळे
तिची विपुही भरुन वाहायची

तुझ्या सोबतीनं―भाग-२ (ह्रदयी वसंत फुलताना)

Submitted by र।हुल on 19 August, 2017 - 10:57

तुझ्या सोबतीनं―भाग-२ [ह्रदयी वसंत फुलताना]

भाग१

निसटलेले क्षण

Submitted by र।हुल on 18 August, 2017 - 15:58

नजरखेळांचा जडला छंद
भावभावनांचे उठती तरंग
मंतरलेला सहवास धुंद
उजळून टाकीत अंतरंग

एकांती रंगल्या गप्पांना
सर कशाची येईल ना
ओठां वरल्या बोलांना
समजूनी कोणी घेईल ना

गोड अनामिक नात्यांना
ओढ मिलनाची मनांना
निसटल्या त्या क्षणांना
आठवून पहा आठवांना

―₹!हुल / १९.८.१७

शब्दखुणा: 

ती सध्या काय करते

Submitted by अनाहुत on 3 August, 2017 - 23:05

संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ?
*********************************************************************************

नशिबवान

Submitted by अंकि on 29 July, 2017 - 06:14

नमस्कार मायबोलीकर,
मी मायबोलीवर नवीन असून हा माझा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्याकडून प्रतिसादांची अपेक्षा आहे. कथा आवडली नाही तरी कृपया मनमोकळेपणाने कळवावे.
**********************************************************************************************************

शब्दखुणा: 

स्मृतीत साठवून जाती

Submitted by र।हुल on 24 July, 2017 - 14:29

स्मृतीत साठवून जाती

पावसांत भिजलो आम्ही
चोरपावलानं उन्हं येती
चिंब भिजल्या क्षणांना
स्मृतीत साठवून जाती ॥१॥

धुक्यात हरवलो आम्ही
उगवतीचे किरणं येती
स्पर्श उबदार बाहूंचा
स्मृतीत साठवून जाती ॥२॥

प्रेमात पडलो आम्ही
स्वप्नं उद्याचे पडती
कोमल हळव्या मनांना
स्मृतीत साठवून जाती ॥३॥

विरहात तगमगलो आम्ही
आठवणी सोबतीस येती
नयनी ओल्या आसवांना
स्मृतीत साठवून जाती ॥४॥

―₹!हुल /२४.०७.१७

शब्दखुणा: 

पाप असे का पुण्य ?

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 July, 2017 - 13:57

पाप असे का पुण्य ते सारे
सोड असले प्रश्न खुळे रे
घेवून गंध श्वास भर रे
अन आनंदे मस्त जग रे |

फुल कुणाचे प्रश्न असले
सांग कश्यास तुज पडले
रंग देखणे मनी भरले
स्पर्श हळवे तृप्त जाहले

ओठावरती पाऊस पडता
थेंब इवला अमृत होतो
रान हिरवे हाक मारता
जन्म मरणातून सुटतो

शब्द सजती भाव बोलती
नाती जुळती मनी सजती
ओंजळीत या सुख भरती
दे उधळूनी तू त्या जगती

ऐक मनाचे अडल्याविना
जा ओलांडून या दुनियेला
गंध येवू दे तव गाण्याला
राधा भेटते मग कृष्णाला

शब्दखुणा: 

तुझ्या प्रीतीसाठी ....!!!

Submitted by प्रकाशसाळवी on 21 June, 2017 - 07:47

तुझ्या प्रीतीसाठी.....!

तुझ्या प्रीतीसाठी किती मी झुरावे?
तुझ्या प्रीतीचे मी किती इतिहास गावे?,

तुझे ते मोकळे केस श्वास हा आश्वासक
तुझ्या कौतुकाचे किती गोडवे मी गावे?

तुझी "प्रेम पत्रे" उराशी मी जपावी,
किती अर्थ त्यांचे, कुठे मी लपावे?

तुझे गीत माझ्या हृदयी का सळावे?
गीतास साथ माझी अन मला ना कळावे

तुझे गोड शब्द कधी सत्य व्हावे?
तुझे प्रेम सत्यात -हास्यात यावे,

तुझी हास्यमुद्रा मनी कोंदणी ठसावी
तुझे अंग - अंतरंग सर्व माझेच व्हावे,

श्री प्रकाश साळवी दि. १८ मार्च २०१४ सकाळी ११.१० मी.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रेम