प्रेम

Submitted by VB on 21 October, 2018 - 03:05

पाहता क्षणी वाटे कुणी आपलं
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपत
हसताना रुसत
सरल्यावर उरत… प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध… प्रेम हे

प्रिया सकाळपासून हेच गाणे गुणगुणत होती. आज ती खूप आनंदी होती कारण आज तिने तिच्या अमितसाठी एक सरप्राईज प्लॅन केले होते. तिने स्वतः अमितसाठी एक ग्रिटींग कार्ड बनविले होते, अन त्यात तिच्या त्याच्याविषयीच्या भावना देखील उतरवल्या होत्या, पण स्पष्टपणे नाही. तरी तिला खात्री होती की अमित ते नक्की ओळखेल. त्याआधी त्याला थोडे सतावू या असा विचार करून तिने तिचा मोबाईल बंद केला अन मुद्दाम रोजच्या वेळेपेक्षा थोडी आधीच निघाली.
पण तिच्या अपेक्षेप्रमाणे काहीच झाले नाही. म्हणजे तिला वाटलेले की अमित नेहमीप्रमाणे तिला फोन करेल, तो लागत नाही म्हटल्यावर घाईघाईने रोजच्या बसस्टॉपवर येईल. प्रिया रोजच्या बसला देखील नाही अन अजूनही तिचा फोन बंद असल्याने काही वेळ वाट बघून नंतरच्या बसने ऑफिस मध्ये येईल अन मग तिला आधीच तिथे पाहून तिच्यावर चिडेल. अन जेव्हा प्रिया त्याला तिने स्वतः त्याच्यासाठी बनविलेले ग्रिटींग कार्ड देईल तेव्हा तो सगळा राग विसरून मस्त दिलखुलास हसेल. त्याच्या ह्या सुंदर निरागस हसुच्याच प्रेमात होती प्रिया.
पण असे काहीच झाले नाही, अमित ऑफिसला आलाच नाही. तिच्या एका कलीगने तिला अमितला फोन करायला सांगितले, म्हणून थोड्याश्या नाराजीनेच तिने त्याला फोन केला तर कळाले की ऑफिसच्या काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्याला अगदी पहाटे बंगलोरला जावे लागले, हे तिला कळविण्यासाठी तो तिला फोन करत होता पण प्रियाने तो बंद केल्यामुळे नाही जमले. प्रिया खूप हिरमुसली पण आता तिचा नाईलाज होता अन काम तितकेच महत्त्वाचे असेल नाहीतर अमित असा जाणार नाही हेही तिला माहीत होते.
बस्स अमित येणार नाही म्हटल्यावर प्रिया अगदी शांत झाली, जेवलीपण नाही. आजचा दिवस खूप खास होता तिच्यासाठी कारण आज अमितचा वाढदिवस होता. ५ सप्टेंबर, सगळ्यांसाठी शिक्षक दिन , पण प्रियासाठी फक्त अन फक्त तिच्या अमितचा वाढदिवस. म्हणून तर सरप्राईज प्लॅन केले होते तिने त्याच्यासाठी. त्याच्या आवडीचा गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, गुलाबी बांगड्या, गुलाबी कानातले, गळ्यात अगदी नाजूकसी चैन अन त्यात तिचा गोरा गुलाबी रंग. प्रिया एखाद्या परीसारखीच दिसत होती, खुप सुंदर, पण सगळे जणू व्यर्थच कारण ज्याच्यासाठी ती इतकी नटली होती तो अमितच नव्हता तिच्याजवळ. त्यात त्याला तिथे किती दिवस लागणार हेही माहीत नव्हते. त्यामुळे खूप नाराज झाली होती ती.
कसाबसा संपला दिवस एकदाचा, जड पाऊल अन मनाने प्रिया बसस्टॉपवर आली तर तिथे अमित होता. आधी तिला विश्वास बसलाच नाही, वाटले जणू उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतीये. पण जेव्हा अमितने तिचा हात धरला तेव्हा ती भानावर आली. तो खरेच आला होता, त्याचे सगळे काम शिल्लक ठेवून , फक्त काही तासांसाठी, बंगलोरहून मुंबईला, तेही फक्त अन फक्त प्रियाला भेटायला. प्रिया काय सरप्राईज देणार त्याला, नेहमी प्रमाणे त्यानेच सरप्राईज दिले होते तिला. प्रियासाठी कुठेही तिने न सांगता न बोलावता येणे जणू सवयच बनली होती त्याची.
दिवसभराचा सगळा रुसवा कुठल्या कुठे निघून गेला प्रियाचा. तरीही थोडेसे लटके रागावणे, रुसवे फुगवे झाल्यावर दोघेही नेहमीच्या ठिकाणी फिरायला गेले अन मग नंतर जेवून निरोप घेतला एकमेकांचा. प्रिया तिच्या घरी आली तर अमित नेक्स्ट फ्लाईटने बंगलोरला परत गेला.
पण घरी येताना प्रिया सातव्या आसमानावर होती, कारण परत एकदा अमितने त्याच्या कृतीतून हे दाखवून दिले होते की तोही खूप खूप प्रेम करतो तिच्यावर, कदाचित ती जेवढे त्याच्यावर करते त्यापेक्षा कैक पटीने जास्त. शेवटी प्रेम म्हणजे असते तरी काय, प्रत्येक परिस्थितीत न मागता एकमेकांना दिलेली साथ अन मी आहे तुझ्यासाठी हा विश्वास, हो न.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

नमस्कार VB,
मी नवीनच आलो आहे "मायबोली" वर, मी एक व्हॉईस आर्टिस्ट आहे. तुम्ही लिहिलेली "प्रेम" ही कथा आवडली आणि ती मला एका ठिकाणी सादर करायची इच्छा आहे, पण हिंदी भाषेतून.
तर तुमची परवानगी मिळू शकेल का त्यासाठी?
अधिक माहिती साठी माझा e mail id आहे jvaibhav2004@gmail. com, तिथे संपर्क साधू शकता किंवा तुमचा e mail id दिलात तर मी संपर्क साधेन.

ही गोष्ट जास्त पटणेबल होण्यासाठी अमित फार तर पुण्याला गेला किंवा कुठे गेलाच नव्हता आणि ऑफिशियल टूअर वर आहे सांगून संध्याकाळी स्वीट सरप्राईज दिलं तरी चालेल.

घर ते मुंबई एअरपोर्ट, मग दीड तास फ्लाइट, मग कमीत कमी दीड तास बेंगलोर एअरपोर्ट ते सिटी, मग ऑफिस काम, मग परत 1 ते दीड तास सिटी ते एअरपोर्ट, मग दीड तास फ्लाइट मग मुंबई आरायव्हल नंतर अगदी जवळात जवळ तरी अर्धा तास तो बस स्टॉप प्रियाला गाठायला..... यात चेक इन, सेक्युरिटी चेक्स इ इ वेळ धरलेलाच नाही.

बिचारा अमित जर खरच बंगलोरला गेला आणि मुंबईला येऊन डिनर करून परत गेला असेल तर ते माझ्या दृष्टीने फार उच्च कोटींच प्रेम झालं. सगळ्या फेमस लव जोडयांपेक्षा याच्या प्रेमाला अधिक 8 मार्क देईन मी.

तिटकारा आहे मला मुंबई/पुणे - बेंगलोर प्रवासाचा. फ्लाइट टाइम पेक्षा एअरपोर्टवर पोचण्याचा वेळ जास्त असतो. त्या सगळ्या अनुभवातून वरच कॅल्क्युलेशन केलं आणि गोष्ट झेपली नाही. पण प्रेमात काय अस दिव्य पण करत असतील लोक तर खरच ते महान

पुन्हा एकदा मीरा +1
मला तर अशा अती रोमँटिक लोकांचा लै वैताग येतो, प्रॅक्टिकल विचार करा की..
त्या फ्लाईट तिकिटापेक्षा त्या किंमतीचं गिफ्ट पाठवायचं , डिनरपेक्षा ते बरं Proud

मीरा अन रिया, तुमच्या मतांचा आदर आहेच पण एक सांगू इच्छिते कोणी कुठल्या प्रसंगी कसे वागावे किंवा काय करावे हे व्यक्तिसापेक्ष बदलत नाही का?

असो
इथे मी इतकेच सांगेन, खरेतर ते लिहायचे गरज नाही तरीही. एखादे महागडे गिफ्ट द्यावे की इतके सारे ( तुमच्या शब्दातले ) दिव्य करून एखादा आंनदी अन आयुष्यभर पुरणारा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. अर्थात हे जरी तेव्हा लक्षात येत नसले तरी शेवटी अश्याच छोट्या मोठ्या प्रसंगातून आठवणी बनतात. अन कदाचित तुम्हाला कळणार /पटणार नाही, पण तरी थोडी कल्पना करून पहा, अचानक अमितला बघून प्रियाला जो आंनद झाला त्याचे मोल काय? आता हे कुणाला अति रोमँटिक नक्कीच वाटू शकते पण मला ते त्याने तिची केलेली काळजी अन तिच्याप्रति असलेली ओढ वाटते.

सॉरी जर हा प्रतिसाद नाही पटला, पण तरी माझ्या मते तरी, प्रेमात कधीच काही ठरवून किंवा व्यावहारिक विचार करून केले जात नाही ☺️

पण तरी माझ्या मते तरी, प्रेमात कधीच काही ठरवून किंवा व्यावहारिक विचार करून केले जात नाही. >>>>> हो नक्कीच, पण तरीही घड्याळ (वेळ) आपलया वेळेनुसारच चालतं. बाकी कथा स्वीट आहे फक्त टाइम कॅल्क्युलेशन जमत नाही एवढंच सुचवायचं होतं.

हे डपो काय असतं?

पण तरी माझ्या मते तरी, प्रेमात कधीच काही ठरवून किंवा व्यावहारिक विचार करून केले जात नाही.
>>>
हे ही प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. माझ्यासाठी कोणी एवढ्या लांबून फक्त डिनर साठी आलं असतं तर मी भडकलेच असते.
हे तू कथेचं स्पष्टीकरण दिलंस म्हणून लिहिलं आहे (मी वयानुरूप बदलले आहे हे मी ही मान्य करतेच, 7 वर्षांपूर्वी च्या मला ही कथा वाचून 'अय्या किती छान' असं वाटेल)
माझ्या लेखनात पण एक अशीच (अति) गोड कथा आहे .
मी फक्त वाचक म्हणून मत दिलं( जे आला आता माझ्या त्या ललिताबद्दल पण वाटतं) , तुझ्या कल्पनेतल्या रोमांसाबद्दल काहीच मत नाही, प्रत्येक लेखकाला स्वताला हवं त्या प्रकारे कथा लिहिण्याचा अधिकार असतोच आणि प्रत्येक वाचकाला तो खुष करू शकत नाहीच Happy

बाकी गंमत अशी की मला पण माझ्या मित्र वर्तुळात (:P) प्रिया म्हणूनच ओळखतात आणि माझ्या एक्स चं नाव पण अमित , त्यामुळे जास्तच मन लावून वाचली Lol

हो नक्कीच, पण तरीही घड्याळ (वेळ) आपलया वेळेनुसारच चालतं. बाकी कथा स्वीट आहे फक्त टाइम कॅल्क्युलेशन जमत नाही एवढंच सुचवायचं होतं. >>> मीरा मला खरेच वेळेच गणित कळत नाही, पण ही गोष्ट अगदी खरी आहे, असे घडलेय हेही खरे आहे.

हे डपो काय असतं? >> हो डबल पोस्ट

रीया , मलाही हेच तर म्हणायचे आहे की बरेचदा गोष्टी घडुन जातात अन त्या त्या वेळेला ते पटते , आपण ते एन्जॉय देखिल करतो अन मग भविष्यात ते आठवुन हसतो देखिल आपल्याच वेडेपणावर Happy