प्रेमी - प्रेम मोठं की मित्र ( भाग १ )

Submitted by Akash S Rewle on 19 November, 2018 - 05:24

" आपण घरच्यांना समजवून लग्न नाही करू शकत का ?" जान्हवी अविनाशला विचारू लागली .
" शक्य असतं तर पळून लग्न करायचा विचार सुद्धा केला नसता , माझ्या घरात समजल तर ... माझं लग्न माझ्या जातीतील कोणत्याही मुलीशी करतील ... पण मला माझं आयुष्य फक्त तुझ्याच सोबत घालवायच आहे " अविनाश रागात उत्तराला .
" ठीक आहे तर मी घरातून काही पैसे घेते उद्या कॉलेजच्या वेळेवर निघते पण घाई तर होत नाही ना ? " जान्हवी म्हणाली.
" आपल्या एका चुकीमुळे घाई होतेय , आणि ती चूक माहिती आहे तुला ..." असं म्हणत अविनशने जान्हवीला मिठीत घेतले आणि पुढे बोलू लागला .
" गावात जर आपल्याला कोणी बघितला तर गावाबाहेर पडता देखील येणार नाही , आपण सरळ वसई मध्ये भेटुयात तेथे माझा मित्र राहतो काही काळजी नाही "...
तेवढ्यात अविनाशला फोन येतो आणि तो जान्हवीला म्हणतो बघ त्याचाच फोन आला अस म्हणत त्यांना तो सांगू लागला " भावा उद्या निघणार आहे रात्री १० पर्यंत पोहचेन तू बस स्थानक वर घ्यायला ये ."
बोलण संपवून फोन ठेवला ... अविनाश व जान्हवीने गोड निरोप घेतला आणि आपल्या आपल्या घरी जाण्यास निघाले .
सकाळी जान्हवी कॉलेजच्या नावाने घराबाहेर पडली ... कॉलेज मध्ये न जाता ९.०० ची अंबाजोगाई वसई बस मध्ये चडली . अविनाश दुसऱ्या बस ने येणार होता म्हणून तिने तिकीट काढून कानात इअर फोन टाकून गाणे ऐकत राहिली . पूर्ण रात्र झोपली नसल्याने बस मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही . माळशेज घाटात जेवणासाठी बस थांबली तेंव्हा तिची झोप तुटली . बाजूला असलेल्या स्त्रीला विचारले कुठे पोहचलो ???
तिने उत्तर दिल " माळशेज घाट जेवणासाठी थांबली आहे ."
तिने बॅगेत असलेला डब्बा कडला आणि खाऊ लागली होती . खाताना तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली होती आणि डब्बा खाता खाता डोळ्यातून अश्रु खाली पडू लागले होते . डब्बा खाऊन अविनाशला फोन लावायचा होता पण मोबाईल मद्धे नेटवर्क नव्हत . खूप वेळ होवून गेला होता म्हणून आपल जून सिमकार्ड काडल आणि अविनाशने दिलेलं नवीन सिमकार्ड मोबाईल मद्धे टाकला .
बस सुरू झाली होती आणि जान्हवी आपल्या जुन्या आठवणी आठवत होती .

**--------दोन वर्षांपूर्वी--------**

कॉलेजचा आज पहिला दिवस होता , उशीर होत होता आणि पहिल्याच दिवशी उशीर होवु नये म्हणून जान्हवी कॉलेजच्या दिशेने धावू लागली होती .
तेवढ्यात कॉलेजच्या बाहेर असलेल्या पानपट्टी कडून सिगरेटचा भपकरा तिच्या चेहऱ्यावर आला . सिगरेटच्या वासाने तिला ठसका लागला . बाजूने एक हात तिच्या दिशेने आला त्या हातात पाण्याची बॉटल होती . जान्हवी रागाच्या भरात असल्याने त्या मुलाच्या कानाखाली एक वाजवली . तिला स्वतःचाच पश्र्चाताप झाला कारण सिगरेट ओढत असलेला मुलगा वेगळा आणि पाणी देणारा मुलगा वेगळा होता . शेवटी काही न सांगता ती तिथून निघून गेली .
ती वर्गात वेळेवर पोहचली होती . सरांनी वर्गात प्रवेश केला सर्वांना आपले नाव आणि मागील वर्षाचे टक्के विचारत होते . सर्वांनी आपली ओळख करून दिली होती पुढे सर काही म्हणतील तेवढ्यात वर्गाच्या बाहेरून आवाज आला
" मी अविनाश पाटील आज पर्यंत कधी प्रेमात पडलो नाही पण आज मात्र कानाखाली खाऊन प्रेमात पडण्याचं कारण सापडल ..."
सरांनी त्याला काहीच म्हटले नाही , त्याला आणि त्याच्या नालायक मित्राला आत घेतले .
" आता मात्र कानाखाली मारल्याचा पश्र्चाताप
जान्हवीला होत नव्हता " तिने बाजूच्या मुलीला विचारले हा कोण नवीन टपोरी ?
बाजूला असलेली पुनम म्हणाली " हा खासदारांचा मुलगा , त्याचे वडील या कॉलेज चे ट्रस्टी आहेत ."
हे ऐकुन जान्हविला चांगलाच घाम फुटला होता .
आणि तो अविनाश जान्हवी जवळचं बघत होता .
जान्हवीच लक्ष कुठेच लागत नव्हत , अविनाश तिला एकटक पाहताच होता . शेवटी तिने त्याच्या जवळ बघितल आणि चेहरा रागाने दुसरीकडे फिरवल .
पहिला दिवस असाच गेला .
दुसऱ्या दिवशी जान्हवी पुनम सोबत कॉलेज मद्धे येवू लागली होती पानपट्टीवर तिचं मुल होती . जान्हवीने मुद्दामून पूनला हे सांगितलं
" पुनम मला ना सिगरेट पिणारे मुल अजिबात नाही आवडत... " अस म्हणून हसत तिथून निघून जाऊ लागली .
हे ऐकताच अविनाश ने बाजूला असलेल्या मित्राची सिगरेट घेतली , भिंतीला विजून कचऱ्यात टाकली .
हे सर्व बघून पुनम तिला विचारू लागली " तू हे सगळं का केलंस ??? ... याला त्याने प्रेम समजलं तर ?? "
यावर जान्हवी म्हणाली " माझ्या बोलण्याने कोणाची सिगरेट सुटत असेल तर मला आवडेल बाकी त्याने काहीही समजो "
पण पुनम ला सर्व समजलं होत की जान्हवी सुद्धा अविनाशच्या प्रेमात पडली आहे .

**---------- वसई स्थानक ---------**

विचारात कधी वसई आली कळलेच नाही शेवटी ती बस मधून उतरली . आपला सिम तोडून कचऱ्यात टाकला . आणि नवीन नंबर ने अविनाशला फोन करू लागली पण " आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करू इच्छित आहात ती आता कव्हरेज शेत्राच्या बाहेर आहे किवा बंद आहे कृपया काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा " जान्हवीने १० फोन केले पण हेच ऐकू येत होत . तिने विचार केला बसमध्ये नेटवर्क नसेल म्हणून ती वाट पाहू लागली पण त्याचा मित्र ही कुठे दिसत नव्हता आणि त्याचा फोन ही लागत नव्हता . साधारण तास भरानंतर तिने पुन्हा फोन करायला सुरुवात केली पण सारखाच उत्तर मिळत होत . १०० कॉल नंतर मात्र तिचा धीर सुटला होता . पोटाला हात लाऊन ती फक्त रडू लागली होती . एक महिन्याच् अविनाशच बाळ तिच्या पोटात होत . या अवस्थेत व घरातून पैसे चोरून पळून आली होती परत घरी पण जाता येणार नव्हते .
तिच्या पुढे फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे आत्महत्येचा !!!!!
ती मारण्याचे उपाय शोधात होती . पण तिला काहीच सुचत नव्हत पहिल्यांदा मरण ही तिला अवघड दिसत होत . विचार करता करता ती रस्त्यावर चालू लागली होती आणि अचानक एक कार समोर आली बघता बघता कार तिला येऊन आदळली . हळू हळू तिचे डोळे बंद होत होते समोर सर्व अंधुक दिसत होत . शेवटी तिच्या समोर पूर्ण अंधार पडला .

जान्हवीने हळू हळू डोळे उघडले तिला सगळी कडे अंधुक अंधुक दिसू लागलं होत . डोळे चोळून बघितले तर ती एका खोलीत बेड वर झोपून होती . तिचे कपडे बदललेले होते , तिला बरेच प्रश्न पडले होते. मला या खोलीत कोणी आणले ??? कपडे कोणी बदलले .??? तेवढ्यात फक्त टॉवेल मध्ये असलेल्या अवस्थेत एक व्यक्ती तिच्या दिशेने येवू लागला होता . ती त्याला बघून घाबरली , ओरडू लागली चिरखू लागली .
जवळ येवू नकोस ............
जवळ येवू नकोस .............
वाचवा ...!!!.........वाचवा .....!!!

**--------- पुढील भाग लवकरच ---------**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! पुढील भागाच्या प्रतीक्षेत .. >> +११११११११११
किती अशुध्द >> +१११११११११११
थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष असू द्या.. बाकी कथा मस्तच आहे.