प्रेमी - प्रेम मोठं की मित्र ( भाग २)

Submitted by Akash S Rewle on 19 November, 2018 - 11:14

टॉवेल मध्ये असलेली व्यक्ती जान्हवीच्या ओरडल्याने तो चांगलाच घाबरला होता . तो जाग्यावर थांबला आणि मागे मागे सरकू लागला . जान्हवीच्या आवाजाने आतल्या खोलीत असलेली प्रिया बाहेर येवून विचारू लागली.
" माफ करा आमच्या चुकीमुळे तुमची ही अवस्था झाली ??"
जान्हवी ने सुटकेचा श्वास सोडला व पाणी मागितले . पाणी पिऊन ती म्हणू लागली .
" मी आहे कुठे ?? माझे कपडे कोणी बदलले ?? काय झालं होत ?? "
प्रश्नाच्या उत्तरात प्रिया म्हणली  ...
" ताई मी तुमचे कपडे बदललेले ते माझे कपडे आहेत , तुम्ही दोन दिवसापासून बेशुद्ध आहात . तुमच्या मोबाईल मध्ये चार्ज पण कमी होती ती लावली पण कोणाचे कॉन्टॅक्ट नव्हते , एक नंबर तुम्ही वारंवार लावला होता त्यावर आम्ही प्रयत्न केला पण ' हा नंबर अस्तित्वात नाही असं ' उत्तर मिळत होत . तुम्ही कुठे राहता आम्ही सोडून येवू तुम्हाला !!!"
हे ऐकुन जान्हवीला धक्काच बसला तिने मोबाईल बघितला पण त्यावर एकही कॉल नव्हता . तिला स्वतःवरच राग येवू लागला होता . या वेगळ्या अनोळखी शहरात यांनी तिची मदत केली होती म्हणून ती आपली आपबिती त्यांना सांगू लागली .

**---------- जान्हवीचा वाढदिवस ----------**

जान्हवी रोजप्रमाणे कॉलेज मध्ये निघाली . सगळीकडे वेगळंच वातावरण वाटत होत . पहिल्यांदा कॉलेज मद्धे खूप कमी विद्यार्थी दिसू लागले होते . तिने वर्गात प्रवेश केलाच होता तोवर वर्गातून दोन पार्टी पॉपर फोडले गेले . सर्व जण " हॅप्पी बर्थडे टू यू जान्हवी " ओरडून विश करू लागले होते . यात वर्गात सर कुठेच दिसत नव्हते आणि पार्टी पॉपर चा कचरा सगळीकडे पसरला होता . सर्व प्रकार बघून जान्हवी चांगलीच गोंधळली होती . टेबल वर केक ठेवला होता संपूर्ण वर्गाला सजवल होत , केक वर जानू लिहले होते . हे बघितल्यावर मात्र जान्हवीचा पारा चढला , अविनाश पाठीमागे हात करून उभा होता , तो हातात असलेलं गिफ्ट लपवून स्तब्ध उभा होता . तेवढ्यात ती तावातावात अविनाश जवळ गेली . तिने अविनशच्या मुस्काडीत मारली , फडकान आवाज झाला सर्व त्या आवाजाकडे बघू लागले होते .
" कधी आपल्या आई - वडिलांसाठी एवढा खर्च केला आहेस का ? ...
तुला काय वाटत दोन डायलॉग मारून , खर्च करून कोणत्याही मुलीचं मन जिंकता येत ??
हा तुझा गैरसमज आहे !!! "
जान्हवी अजून पुढे बोलणार होतीच पण पूनम
तिला थांबवत म्हणाली .
" वेडा बाई त्याने नाही मी केली आहे तय्यारी , विचार तरी आधी !!!"
अविनाशने पवन च्या कानाखाली वाजवून आपला राग बाहेर काडला व रागात तिथून निघून गेला.
जान्हवी नाईलाजाने काहीच न म्हणता तिथून निघून गेली .

**--------- प्रियाचे घर ----------**

सुरवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रकार प्रियाला सांगितला व म्हणाली..
" बदल्यापोटी अविनाशने हे सर्व केला असावं "
जान्हवी धयधया रडू लागली होती , प्रियाने तिला सावरले , प्रियाला तिचा भूतकाळ आठवत होता .
प्रिया आपल्या प्रियकर अमित सोबत राहत होती . काही नालायक युवकांनी कामाच्या नावाने बिहार मधून मुंबई मध्ये आणून तिच्यावर अमानुष अत्याचार केले होते . येवढ्या मोठ्या शहरात ती एकटी पडली होती तेव्हा तिला डान्सबार मध्ये काम मिळालं आणि तिथलाच वेटर अमित तिच्या प्रेमात पडला होता . दोघांच्या कमाईतून नुकतीच त्यांनी सेकण्ड हॅण्ड कार विकत घेतली होती , त्याचं कार समोर जान्हवी आली होती .
प्रियाला एकटेपणाच दुःख माहिती होत , मुंबई जेवढी सुंदर तेवढी भयंकर आहे हेही माहिती होत म्हणून ती जान्हवीला म्हणाली ..
"जोवर तू स्वत्याच्या पायावर उभी नाही होत तोत पर्यंत तू येथे राहू शकतेस ... "
प्रथम तर जान्हवीने नकार दिला पण प्रियाच्या विनवण्यावरून व इथून कुठे जाणार या विचाराने ती तेथेच राहिली.
प्रियाने तिला तिचे काही कपडे दिले , व काही दिवस घरीच राहण्यासाठी सांगितले .
जान्हवी घरची सर्व काम संपल्यावर कंटाळायची व सायंकाळी एकटीच असल्याने ती बाजूला असलेल्या गार्डन मध्ये जायची पण तेथेही तिला घरची आठवत यायची , व चेहरा पडका ठेऊन कोपऱ्यातील बाकावर बसायची , महिनाभर तिची हीच दिनचर्या होती . मात्र दर शुक्रवारी एक व्यक्ती तेथे यायचा व तिला बघत रहायचा . पण जान्हवीच त्यावर लक्ष नसे .
प्रियाच्या मदतीने अमितला आपला नवरा दाखवून आपलं गर्भपात केलं होत . ती या सर्व गष्टींमुळे खूपच निराश होती .
जान्हवी आता घरी एकटी राहून कंटाळू लागली होती तिने प्रिया जवळ नोकरी साठी विचारले ... पण अधुर शिक्षण व सोबत नसलेल्या डॉक्युमेंट्स मुळे तिला कोणतंही काम मिळणं शक्य नव्हत , तिच्या जवळ एकच पर्याय होता प्रिया सोबत डान्सबार मद्धे काम करायचा !!! तिने नाईलाजाने होकार दर्शवला .

जान्हवीने प्रियाचे चमकदार कपडे घातले , प्रिया ने बार मालकाला जान्हवी बद्दल पहिलेच कळवले. पहिल्या दिवशी जान्हवी बार मध्ये पोहचली , तेथे १५-१६ खूप सुंदर मुली उभ्या होत्या त्यांच्या बाजूला उभी राहण्यास सांगितले . दारू पिणाऱ्या व्यक्तीची नजर सर्व सुंदर मुलींच्या शरीराच्या वेगवेगळ्या हिश्यांवर जाऊ लागली . त्याच्या अश्या नजरेने जान्हवीच्या मनात आक्रोश निर्माण होत होता पण ती काहीच करू शकत नव्हती .
तिला तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने बोलावलं तिथे गेली , त्या व्यक्तीने तिला शंभर रुपयांची नोट दिली आणि कान जवळ आणण्यासाठी सांगितला , तिने कान त्याच्या जवळ केला .. त्याने तिच्या कानात सांगीतले
" तू खूपच कडक दिसतेस "
तिने न ऐकल्यासारख केलं आणि तेथून निघून तिच्या जाग्यावर गेली .
त्या दिवशी तिच्या जवळ १०,००० रुपये जमले त्यातून बार चे ४०% देवून ६,००० घेवून घरी आली . पण तिच्या चेहऱ्यावर आक्रोश जाणवतं होता . प्रिया म्हणाली..
" मला आता पर्यंत कधी ३००० पेक्षा जास्त नाही मिळाले , तू सर्वांचा रेकॉर्ड तोडला आहेस ."
पण या गोष्टीवर तिने दुर्लक्ष केले , ती मनावर दगड ठेवून तेथे काम करू लागली होती .

एके दिवशी बार मद्धे मोठी व्यक्ती आली होती त्याला खुश करण्यासाठी बार मालकाने रेगुलर मुली दाखवल्या पण त्याला त्यातली कोणच पसंद नाही आली . दारू पिताना त्याला जान्हवी पसंत पडली मालकाला सांगून त्याने तिला रूम वर पाठवायला सांगितले . बार मालकाला माहिती होत ती कोणत्याही शर्तीवर तेथे जाणार नाही म्हणून त्याने तिला बहाण्याने वर पाठवले . आत गेल्यावर तिच्या लक्षात सर्व आलं पण तोवर कोणीतरी बाहेरून दार बंद केलं होत .
जान्हवी दार वाजवत होती पण कोणीच दरवाजा उघडायला तय्यार नव्हत , तिला हा काहीच प्रकार समजत नव्हता पण मनातल्या भीती तिला सर्व काही सांगू लागली होती .
त्या राक्षसी माणसाच्या चेहऱ्यावर तिला वासना दिसू लागली होती . तो तिच्या जवळ जवळ येवू लागला होता . ती मागे मागे सरकुन हात जोडून तिच्या इज्जतीची भीक मागू लागली होती . पण त्याचा इरादा काही दुसराच होता त्याने तिला आपल्या पापी हाताने तिला पकडले , ती त्याचा विरोध करू लागली होती पण तिची शक्ती त्याच्या पुढे कमी पडली शेवटी त्या वासनेने भरलेल्या राक्षसाने तिला उचलून बेड वर आदळले .

**---------- पुढील भाग लवकरच ----------**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad
पण छान चालू आहे कथा..
बागेतली व्यक्ती कोण होती?
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.