माझ्या ऐकेरी जीवनातील तु दुहेरी किरण,
आज पुन्हा झाले मला तुझे गं स्मरण...
स्मरणात होती तु आणी तुझ्या त्या आठवणी,
सांग ना सखे का केलीस तु मला शिकवणी..
तुझ्या शिकवणीत शिकतांना स्वतः ला विसरुन गेलो,
सांग ना सखे कशामुळे मि तुझा नाही झालो...
कितीही केला मि प्रयत्न तरी तुझा नकार,
का नाही समजला सखे तुला माझ्या जगन्याचा होकर..
आज पुन्हा आठवलीस वर्गात झुरतांना,
खुप एकट वाटत होत गं मंदिरासमोर फिरतांना...
आज मंदिरासमोरच्यांना पण अश्चर्य झाल होत,
घरटं बनण्याआधी आपलं तुटत होत...
कातरवेळ..
अंबरात नाना रंगाची
उधळण होते तेव्हा
अंतरी अनामिक अशी
चाहुल लागते
क्षणाक्षणाला मन
हिंदोळ्यापरी झुलते
तुझ्या आठवांनी
डोळा आसवांची गर्दी होते
रोज कातरवेळी
मना याद तुझी येते
तुझ्या आठवणींत
मन असे विरु लागते
मन माझे वेडे
तुझ्या स्वप्नी रंगते
तु दुर असला तरी
तुजपाशीच विसावते
(Dipti Bhagat)
“काल तू प्रॉन्झ खायला गेला होतास ?”
“ हो , तुला कसं कळलं ? “
“That is not important ..रिया बरोबर गेला होतास ? ”
“ ए नाही ए , काहीही काय , मी ताईकडे जेवायला गेलो होतो , तिचा फोन आलेला मला “
“हो ? ताईला काय अचानक स्वप्न पडलं होतं का ? तुला प्रॉन्झ खायचे आहेत म्हणून ? “
“अगं नाही , तिला माहितीये मला आवडतात .तुला खोटं वाटत असेल तर ताईला फोन लावून देतो हे बघ आत्ता लगेच बोल ”
“काही नको , तुला माहितीये मी ताईला अजुन भेटले नाहीये , आणि असलं काही मी चुकूनही विचारणार नाही , “
“अगं पण मी नाही गेलो रिया बरोबर “
श्रेया च्या मनमोकळ्या स्वभावामुळे वेदांत आणि त्याच्या नवीन झालेल्या मित्रांमध्ये लगेच मैत्री झाली.. जसजसे दिवस जात होते, त्यांचा खूप छान ग्रुप बनत होता... सोबतच श्रेया आणि सार्थक चीही मैत्री फुलत होती...
श्रेयाला वाटला होता तसा सार्थक अजिबात नव्हता... तो खूप समंजस, आणि साधा भोळा होता... दिसायला जरी जेमतेम असला तरी त्याच्या मध्ये एक charm होता... पण श्रेया चा स्वभाव आणि सार्थक चा स्वभाव ह्यांच्यामध्ये जमीन असमान चा फरक होता...त्यामुळे त्यांच्याकध्ये तसे वारंवार खटके ही उडायचे... पण तेही हे सगळं enjoy करायचेत..
त्या लग्नसोहळ्यात गेल्यापासून सारंगची नजर भिरभिरत होती. त्याला माहित होते की संगीता या लग्नाला नक्की येईल. काॅलेज ग्रूप मधल्या एका मित्राच्या मुलीचे लग्न होते. संगीता ह्या ग्रूपमधे सक्रीय आहे हे त्याला माहित होते. ग्रूपच्या एकदोनदा भेटीगाठी, संमेलन वगैरे झाले होते. पण तेव्हा तो जाऊ शकला नव्हता. पण आजच्या ह्या सोहळ्यात तिची भेट होणे जवळजवळ नक्की होते. आणि अचानक ती त्याच्या समोर आली. अठ्ठावीस वर्षांनंतर. एकेकाळच्या अनुपम सौंदर्याच्या खाणाखुणा अजुनही तिच्या चेहर्यावर दिसत होत्या. तेच सुंदर, भावपूर्ण डोळे. तेच लोभस हास्य. तीच खळाळती ऊर्जा व आत्मविश्वास.
"कुठे भेटतोय? मला उद्या दुपारी जमेल. अगदी थोडा वेळ."
त्याच्या इ-मेलला जवळपास दोन आठवड्यांनी आलेला तिचा रिप्लाय वाचून त्याच्या मनात चाललेली चलबिचल थोडी कमी झाली.
"ट्रॅव्हल कॅफे. एस बी रोड. दुपारी तीन ?"
"मी आलेय."
त्यानं धावत रस्ता क्रॉस केला आणि तो आत शिरला. एका कोपऱ्यातल्या बेंचवर ती पाठमोरी बसली होती. तो तिच्या समोर जाऊन बसला.
"का बोलावलंयस मला ?"
"मी बोलावलं, आणि तू आलीस.. का आलीस?"
"काय बोलायचंय तुला?"
तुझी आठवण
किती विलक्षण
मजला सोडून
जात नाही ॥
मनी भरलेले
झुकलेले डोळे
स्मरणी भिजले
येत राही ॥
तुझे बोलावणे
तुझे थांबवणे
तुझे ओढावणे
मुग्ध किती ॥
धुक्यात दडले
दवात सजले
अर्थ नसले
वेडे गाणे ॥
तरीही म्हटले
देही आसावले
अतृप्ती सजले
पुन्हा पुन्हा ॥
जरी आता नाही
घेणे गाठी भेटी
मन तळवटी
फुलांची तू ॥
००००००
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
. . .ना चि
**********
त्याचे प्रश्न तिला
तिचे प्रश्न त्याला
उत्तर कोणाला
सुचेनाचि
आवडला खेळ
निसटली वेळ
परी ताळमेळ
लागेनाचि
काही देहावरी
काही मनावरही
सुखाच्या लहरी
थांबेनाचि
कळेल जगाला
घराला दाराला
शब्द बोलण्याला
धजेनाचि
इतकाच काळ
इतकाच वेळ
मन रानोमाळ
थांबेनाचि
निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि
आजचा उद्याला
देऊन हवाला
प्रश्न जडावला
मिटेनाचि
द्वंद्व..(सुधारित)
द्वंद्व..
www.maayboli.com/node/71219
होकार नकाराच्या
खेळात; नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात; बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
होते घुसमट
या मनाची
कोणी ठेवेल का
कधी जाण याची?
अपेक्षांचा बोजवारा
वाहताना
किती द्यायची ती
उत्तरे त्या छळणार्या
विखारी नजरांना
द्वंद्व..
होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..
(Dipti Bhagat)