प्रेम फुल

Submitted by विनोद. on 22 January, 2019 - 22:00

प्रेम फुल

सोडताना हात तुझा मनी काहूर दाटे
नजरेआड करताना आयुष्य क्षणभंगुर वाटे
हवालदिल मी तुझ्या कडे एकटक पाही
पाहता पाहता तुला, तुझाच होऊन राही

अगं वेड लावलास मला वेडा मी झालो
तू नेशील त्या वाटेवर पाठीमागे आलो
दुरावलो सगळ्यांपासून हरवलं मी मला
आता परत जा म्हणतेस पटत का तुला

पाऊलखुणा ही पुसल्या मी, प्रेमवेडे चाळे
मनो मनी बांधले स्वप्नांचे एकावर एक माळे
रमलो ग मी तुझ्यात मंत्रमुग्ध झालो
क्षणो क्षणी हृदयात तुला साठवत आलो

गायब झालीस अचानक अंधार दाटला
नयनी माझ्या भावनांचा पूर साठला
अश्रू थेंब नव्हते ते प्रेम उतू गेलं
जीव पाड जपलेलं प्रेमफुल मेलं...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users