मन माझे हळवेसे गीत आहे...

Submitted by ___akshata___ on 17 April, 2019 - 01:12

मन माझे हळवेसे गीत आहे,
आनंदाचे सुरेल संगीत आहे,
हळुवार भावनांची नाजुकशी प्रीत आहे,
जीवन जगण्याची सुंदरशी रीत आहे,
स्वप्नांच्या झऱ्याचा निरंतर सा स्रोत आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...

मन माझे कोकिळेची तान आहे,
सुरांचे संमिश्र मधुरसे गान आहे,
बेधुंद वाऱ्याचा वेग बेभान आहे,
जपून ठेवावे असे पिंपळाचे पान आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...

मन माझे पाण्याचा शांत नाद आहे,
स्वतःनेच स्वतःला दिलेला प्रतिसाद आहे,
जीवनाच्या मैफिलीला दिलेली दिलखुलास दाद आहे,
विचारांच्या दरीचा एकांत अगाध आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...

विचारांच्या जंगलात हरवलेलं मूल आहे,
भावनांच्या बागेत खुललेलं फुल आहे,
पहिल्या पावसाच्या ओल्या मातीची भूल आहे,
मन माझे वेडे असे ज्याला आता सगळं कबूल आहे,
कारण,मन माझे हळवेसे गीत आहे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users