हितगुज ग्रूप

हरिश्चंद्रगड - नाईट ट्रेक

Submitted by DJ. on 31 October, 2018 - 11:18

ट्रेकची आवड आहे पण ट्रेकची आवड असणारा परिवार, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीणी नसल्यामुळे ट्रेकला जाऊ न शकणार्‍या अनेकांपैकी मी एक. ठकाला ठक भेटतोच या ऊक्तीप्रमाणे मलाही ट्रेकची आवड असणारी आमच्या ऑफिसमधील मिलन भेटल्यामुळे या वर्षी २ ट्रेक करता आले. इतकी वर्षं आम्ही दोघे एकाच ऑफिस मधे एकाच बसने जातो पण दोघांनाही ट्रेकची आवड आहे हे आम्हाला माहितच नव्हते. मिलनने जानेवारीत २६-२७-२८ चा लाँग वीकेंड बघुन एका ट्रेकिंग ग्रुप सोबत मला 'कळसुबाई'ला ट्रेकवुन आणले होते. त्यानंतर तिने आत्ता २७-२८ ऑक्टोबरच्या वीकेंडला "हरिश्चंद्रगड साठी नाईट ट्रेकला जायचं का?" विचारलं.

वर्क फ्रॉम होम बद्दल माहिती हवी आहे

Submitted by स्मितस्वप्न on 19 October, 2018 - 04:31

नमस्कार,
मी मायबोलीवर नवीन आहे. सध्या वर्क फ्रॉम होम चा option शोधत आहे. तरी याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कळवावी.
काम genuine असावे, कारण पेपर मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि नेटवर दाखवणार्या जाहिरातींवर खूप पैसे खर्च झाले आहेत, पण सगळे पैसे वाया गेलेत. कधी टार्गेट पूर्ण होत नाही तर कधी खूप चुका काढून पैसे मिळत नाहीत.
कोणाला genuine वर्क फ्रॉम होम बद्दल माहिती असल्यास कळवावी.

पराजय नव्हे, विजय!

Submitted by झुलेलाल on 14 October, 2018 - 13:20

सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा...
तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं.

शी-शु पालन

Submitted by DJ. on 3 October, 2018 - 07:26

गेल्या वीकेन्ड ला गावी गेलो असताना समोरच्या घरात रहणार्‍या प्रा. काकींना महिनाभरापुर्वी नात झाली ही बातमी समजली. प्रा. काकींची एकुलती एक लेक. लग्नानंतर ३ वर्षांनी तिला हे पहिलेच कन्यारत्न. प्रा. काकी पहिल्यांदाच आज्जी झालेल्या. म्हटलं चला त्यांचे आणि दिदीचे अभिनंदन करुन येऊ.. लहान बाळाला पाहुन येऊ.. बाळासाठी गिफ्ट घेउन आम्ही जोड आणि आमची दोन मुले त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्वांना भेटुन आणि लहान बाळाचे कोड्कौतुक करुन आम्ही घरी परतलो आणि आमच्या हिने लगोलग आईला एक 'खबर' दिली की : प्रा.

जर्मनी

Submitted by chamaki on 1 October, 2018 - 03:26

माझी मुलगी पुढच्या आठवड्यात जर्मनी (hamburg)ला शिकायला जात आहे
इथून काय काय घेऊन जायला हवे याबद्द्ल माहिति हवी आहे.

तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

Submitted by दीपा जोशी on 13 August, 2018 - 23:18

अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

दादाच्या गोष्टी

Submitted by अननस on 9 August, 2018 - 02:41

सन्ध्याकाळची वेळ होती. सुर्य नुकताच अस्ताला गेला होता, अजुन पश्चिमेचा नारन्गी रन्ग निळ्या काळ्या आकशात थोडी जागा धरून होता. मन्द वारा वहात होता पक्षी आपल्या घराकडे जायला लागले होते. टेकडीवर झाडाखाली दगडावर दादा बसला होता. आम्ही सगळे त्याच्या शेजारी गोल करून बसलो होतो. या वेळी दादा आम्हाला देशो देशी च्या गोष्टी सान्गत असे. मग त्यावर आमची चर्चा रन्गत असे. गोष्टी कधी पुराणातल्या असत, कधी इतिहासातल्या असत तर कधी चालू घडामोडीतील असत. कुणाची निन्दा नालस्ती, कुचाळक्या यासाठी मात्र कधी वेळ मिळाला नाही.

शब्दखुणा: 

लहान मुलांना "जात" संकल्पना कशी सांगाल?

Submitted by सिम्बा on 30 July, 2018 - 03:27

Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.

शब्दखुणा: 

"करुणा" : भाग ०१ (लग्न)

Submitted by दिपक. on 29 July, 2018 - 14:17

| दि. ११ फेब्रुवारी २०११ |
| स्थळ : यशवंतरावांच घर |

सुप्रसिद्ध लेखक व साहित्यकार यशवंतराव देशमुख आणि त्यांची पत्नी करुणा यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतरावांचे बालपणीचे मित्र दिगंबर, करुणाची धाकटी बहीण चंदा व इतर नातेवाईक व मित्रमंडळी यशवंतरावांच्या घरी जमले आहेत. यशवंतराव हॉलमधेच सजवलेल्या एका छोट्या स्टेजवर उभे राहून बोलत आहेत व सर्व मंडळी अगदी लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत आहे.)

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप