नवय्राच्या वाढदिवसाला एक (एकुलती एक) बायको भेटवस्तू काय देते?

Submitted by Mi Patil aahe. on 19 January, 2019 - 02:43

याच महिन्यात मि. चा वाढदिवस आहे तरी काय गिफ्ट द्यावे यावर्षी हे सुचत नाही, कोणी सांगेल का एक बायको आपल्या नवय्राला देवून देवून काय गिफ्ट देवू शकते??????
काही आयडिया असेल तर बिनधास्त ( इच्छा असेल तर) सुचवण्याचे कष्ट घ्यावेत,ही विनंती!!!!!

___________ शांतपणे जाहिर सूचना__________
(खास फालतू"पालतू श्रद्धेसह"सल्ला/ प्रतिसाद देऊ पाहणाय्रांसाठी)

१)मुर्खासारखे फालतू सल्ले "पालतू श्रद्धेसह" (मायबोलीवर आपणच काय ते शहाणे या गैरसमजुतीने अथवा भ्रमामुळे) देणे शक्यतो टाळावे,ही विनंती!!!
२)मूळात फालतू व पालतू श्रद्धेतून दिर्घकाळ अज्ञातवासात राहून जी आपली केमेस्ट्री तयार झाली आहे,तिचा वापर (प्रयोग) या धाग्यावर कृपया करण्याचा जराही यत्न करू नये,
३)या सूचना लक्षात घेणे अन् मगच प्रतिसाद देणे.
४)अन्यथा येथे अगदी शांततेतच अपमान होईलच वर फालतूपणा चे लेबल मिरवावे लागेल.

ता.क.( वरील जाहीर सूचना माझ्या सर्व धाग्यांना लागू,त्याही अगदी शांततापूर्वक.)

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हणजे तुम्ही घटस्फोटीत आहात तर!!!!!>> त्यांचा काय संबंध?? Angry
उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलायचं का?
(तुमच्या फालतू धाग्यांसारखं)

फालतू श्रद्धा का दुखावली?>>>>>
जसं कावीळ झाल्यानंतर सगळं जग पिवळ दिसतं, तसं फालतू लोकांना सगळं जग फालतू दिसतं!
असो, उपचार घ्या! चांगले दवाखाने आहेत, वैद्य हकीम वगैरे. त्यासाठी धागा काढा, मायबोलीकर नक्कीच मदत करतील.
शक्यतोवर या अवस्थेत नवऱ्याला गिफ्ट वगैरे देऊ नका, काय आहे, बिचारे डिप्रेशनमध्ये जायचे (ऑलरेडी तुमच्याबरोबर विवाह करून आधीच डिप्रेशनमध्ये गेलेले असतील. अजून त्रास नको)
आणि श्रद्धा अशीच वाढावी, तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना Happy

दहावेळ आडून आडून चौकशी करणार...हे किती चांगल वाटेल तुम्हाला..
हे किती छान आहे ..ते किती छान आहे...त्यातलचं एखादं सरप्राईझ म्हणून गिफ्ट देणार आणि तेव्हा आपण ऑ..करायचं...व्हाॅट अ सरप्राईझ..जानू..असं म्हणायचं...

नोंद : तुम्हाला आधीच माहीत असलं तरी गिफ्ट दिल्यानंतर ऑ करण गरजेच नाहीतर "तुम्हाला मेलं कुठल्या गोष्टीच कौतुकच नाही..तो शेजारचा "हा"बघा शिका त्याच्याकडून काहीतरी...मी म्हणून सांभाळतेय तुम्हाला,दुसरी असती तर गेली असती लगेच..मेलं माझं नशिबचं फुटकं...तरी बाबा सांगत होते हे स्थळ तितकचः छान नाही म्हणून .. अमक्या गावच्या कलेक्टरची मागणी आलेली मला..पण नाही मी शेण खाल्लं ..मग रडारडी...माहेरी जाते आताच...सो अॅण्ड सो नाटकी असतातच की..

>>>>>>तुम्हाला आधीच माहीत असलं तरी गिफ्ट दिल्यानंतर ऑ करण गरजेच>>>>>>>>>>
सर्व नवरे मंडळींना हा सावधगिरीचा सल्ला म्हणायचा का?

एखद्या टूरचा प्लान. तुमचेही फिरणे होईल. शॉपिंग बोनस. त्यात एखादे चांगले टीशर्ट नवरयालाही घेऊन द्यायचे आणि हेच घालून फिरायचे असा लाडीक हट्ट करायचा. त्यावर त्याचे छान छान फोटोही काढायचे. आणि ते फोटो फेसबूकवर टाकून एकदोन रोमांटीक लाईनी लिहायच्या Happy

>>>>>>>> हट्ट करायचा. त्यावर त्याचे छान छान फोटोही काढायचे. आणि ते फोटो फेसबूकवर टाकून एकदोन रोमांटीक लाईनी लिहायच्या Happy>>>>>>>>> वाs s ही पण आयडिया भारीय!!!!!