संक्रांतीला मायबोलीवरील माय-भगिनी संक्रांतीचे वाण म्हणून काय लूटणार आहेत,हळदी-कुंक कार्यक्रमात!
दरवर्षी काय-काय लूटले?
या वर्षी काय वाण ठेवणार?
काय वाण ठेवायचे राहून गेले?
काय वाण ठेवायला हवे?
काय ठेऊ नयेत?
कसा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवायला हवा?
काय वाटते,या वर्षी संक्रांती कशी साजरी करावी?
गोड बोलून,की नुसतेच तिळगुळ देऊन!!!!
की आणखी काही भन्नाट कल्पना/आयडिया सुचली आहे/सूचत आहे/सुचली होती पण राहून गेली , मागच्या वर्षी!!!,की सुचतच नाही!
का हळदी-कुंकू कार्यक्रम आवडत नाही, पण काय करणार, करावा लागतो!
असं तर काही होत नाही ना????
की हळदी-कुंक म्हटलं की आनंदाचं भरत येत!!!
हळदी-कुंक म्हटलं की नुसता उत्साह ओसंडून वाहत राहतो!!!!
मासिकपाळी मुळे किती जणींना आपल्या आवडत्या हळदी-कुंक कार्यक्रमापासून वंचित राहावे लागले वा ठेवलं? कितीवेळा तसे घडले? किती वर्षांपासून वाण ववसा घेत/देत आहात वा आलात?
पहिल्या वर्षीचा ववसा आठवतो का? कुठे घरीच की मंदीरात/देवळात कुठे घेतला होता?
वाण कोणता होता?
आणि सगळ्यात महत्त्वाचं याविषयी मायबोलीवरील बाप,भाऊ,नवरे,मुलगा, सासरे (असाल तर!)अशा भूमिका निभावणारे पुरुष मंडळींना नक्की काय वाटते?
माझ्या माहितीप्रमाणे तरी पुरुष (बापेमंडळी) या साय्रा प्रकारात अतिशहाणा असल्यासारखे मते, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात/वावरत असतात.
तुमच्या माहितीप्रमाणे कोणती परीस्थिती आढळते?
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
जिरे, कापूस, तूप .. पहिली५
जिरे, कापूस, तूप .. पहिली५ वर्ष दुसरा पर्याय नसतो आमच्याकडे.. but I can accept any वाण...
रोपे द्यावीत असं वाटतं
मग रोप(नुसते फुलांचे की फळं
मग रोप(नुसते फुलांचे की फळं देणारी,की वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी की शो (शोभेचे) चे) देणार ६व्या वर्षी!
हे ३/की ४वर्ष आहे?तुमच वाण द्यायचं?
आमच्या कडे पाच वर्ष सवाष्णी
आमच्या कडे पाच वर्ष सवाष्णी चा वाण देतात. पहिल्या वर्ष हळद कुंकू must. नंतर कंगवा, आरसा, मेहंदी कोन, नेलपॉलिश, जोडवी, केसांचे बो.
हल्ली आम्ही उदबत्ती पुडा, कापूस वाती, मसाला पॅकेट देतो.
आमच्या कडे पाच वर्ष सवाष्णी
आमच्या कडे पाच वर्ष सवाष्णी चा वाण देतात. पहिल्या वर्ष हळद कुंकू must. नंतर कंगवा, आरसा, मेहंदी कोन, नेलपॉलिश, जोडवी, केसांचे बो.
हल्ली आम्ही उदबत्ती पुडा, कापूस वाती, मसाला पॅकेट देतो.
रिचार्ज कुपन्स, टाटा स्कायचं
रिचार्ज कुपन्स, टाटा स्कायचं भक्तिगीतांचं आठवड्याचं टाॅपप, काकडी गाजर मुळा पॅक, ग्रीन टी बॅग, मोडाचे मूग मटकी, शहाळं, कोरफडीचं पान वगैरे गोष्टी द्याव्यात काय?
अरे काही मजेच्या गोष्टी द्या
अरे काही मजेच्या गोष्टी द्या की! आठवड्याचा किराणा आणि भाज्या किती बोर वाटतील!
माझा ना घेण्याशी ना देण्याशी संबंध. सो नाही आवडलं तर इग्नोर मारा.
आता कुठली संक्रात्/हळदीकुंकु
आता कुठली संक्रात्/हळदीकुंकु मधेच?
अमितव, मजेच्या गोष्टी म्हणजे कुठल्या?
D :
.
D :
मजेच्या गोष्टी... लोळ
मजेच्या गोष्टी... लोळ
होळीच्या टायमाला संक्रांत
होळीच्या टायमाला संक्रांत काहून वर आली
मजेच्या गोष्टी म्हणजे मोबाईल
मजेच्या गोष्टी म्हणजे मोबाईल रिचार्जचे गिफ्ट कार्ड द्या.
ज्या जीवनावश्यक गरजात मोडत
ज्या जीवनावश्यक गरजात मोडत नाहीत. आणि मिळाल्या नसत्या तर त्या माणसाने कदचित पुढच्या आठवड्यात त्या विकत घेतल्या नसत्या.
ज्या जीवनावश्यक गरजात मोडत
ज्या जीवनावश्यक गरजात मोडत नाहीत. आणि मिळाल्या नसत्या तर त्या माणसाने कदचित पुढच्या आठवड्यात त्या विकत घेतल्या नसत्या.>>>>
काही वस्तु तरी सांगायच्या उदाहरणादाखल.
आता विचार करणं आलं.
मजेच्या गोष्टी+= जीवनावश्यक
मजेच्या गोष्टी+= जीवनावश्यक चैनीच्या गोष्टी.
टाटा स्कायचं भक्तिगीतांचं
टाटा स्कायचं भक्तिगीतांचं आठवड्याचं टाॅपप>>>>>> मला एका हळदीकुंकूमधे कोणत्यातरी बाबाच्या प्रवचन्/भजनाची सी.डी. मिळाली होती.महाबोअर झाले होते. सी.डी. पाहिलीच नसूनही.
एखादं फुलझाडाच रोप कुंडीसहित
एखादं फुलझाडाच रोप कुंडीसहित द्यावं , चिरलेल्या भाज्यांची पाकिटं, सोललेले लसूण, कानातले, गळ्यातले हार.... ज्याने समोरच्या बाईला आनंद मिळेल असे काहीही द्यावे.. तोंडभर खरे हसू लेऊन