हातात वाफाळलेला चहा आणि डोक्यात धूसर विचार. घरातील खिडकीच्या ऐका कोपऱ्यात उभा राहून चहाचा एक एक घोट घेत पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या त्या चिमुकल्या मुलांना बघत असताना नकळतच त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य रेखाटले. कधी त्या मुलांना तो निरखत होता तर कधी आकाशाकडे बघत होता. जमिनीवर अचानक पडलेल्या गुळाला जश्या मुंग्यांनी घेरा घालावा तसं आकाशात ढगांनी दाटी केली. काही क्षणापूर्वी पांढरं शुभ्र वाटणारा आकाश आता काळकूट दिसू लागलं . खिडकीतूनच त्याची नजर बस स्टॊपवर उभ्या असलेल्या त्या मुलीवर गेली. तिने बहुदा छत्री विसरली असावी.
मायबोलीवर भोंदू फॉर्वर्डस असा एक धागा आहेच. त्याच धर्तीवर, पण हा उपयुक्त असणाऱ्या फॉर्वर्डस साठीचा धागा.
सोशल मीडियामध्ये खोटे व दिशाभूल करणारे मेसेजेस जसे असतात तसेच अनेकदा आपल्याला उपयुक्त माहिती असणारे मेसेजेस पण वाचावयास मिळतात. खातरजमा करून ते मेसेज इथे शेअर केल्यास इतरांना त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ते खातरजमा केलेले असावेत. त्यासाठी आधी आपण स्वत:हून खात्री करून संबंधित बातमीची अथवा विकिपीडियावरची अथवा तत्सम विश्वासू संकेतस्थळची लिंक द्यावी हि विनंती.
बळी
(शतशब्द कथा)
______________
.
आज संध्याकाळ पासून तिची शोधक नजर भिरभिरत होती. गेल्या अख्ख्या आठवड्यात एकही कामाची गोष्ट न मिळाल्याने ती उपाशी होती. शारीरिक स्तर केव्हाच ओलांडलेली भूक आज तिला शांत बसु देत नव्हती. तेवढ्यात तिने सावज टिपले. शिकार आटोक्यात होती. त्याच्या मरण्याने कोणी दुःखीही होणार नव्हता.
होय ! तोच ज्याच्यावर दूसरीतल्या आसिफाची छेड़ काढल्याचा आरोप होता. अखेरचा पाश आवळण्यापूर्वी खात्रीसाठी समोरून पुन्हा पाहुन आली. हेतुपुरस्सर वाकत सर्व उभार दाखवल्याने सावज अलगद गळाला लागले.
.

.
आज जास्तच गर्दी होती तिकडे , कामाच्या ताणामुळे 3-४ दिवस नीट झोप सुद्धा झाली नव्हती हे त्याच्या डोळ्याखालची वर्तुळे स्पष्ट सांगत होती.
सर्वांकडे जातीने लक्ष देताना त्याची पुरती दमछाक होत होती. मी मात्र आजुबाजूच्या लोकांच्या नकळत फक्त त्यालाच बघत होतो. निराकार अस्तित्व माझं कुणाला जाणवत नाही पण सगुण परिणामाने सर्वजण हमखास बिथरुन जातात.
.

.
शब्द
~~~~
.
शब्द उमटला
अर्थ मिळवला
शब्द वाढला
कलह आरंभला
शब्द झिरपला
सांत्वन जाहला
शब्द गोंजारला
मद उफाळला
शब्द झेलला
आज्ञा लाधला
शब्द पडला
आब ओशाळला
शब्द अक्षय्य ठेवला
शब्द निश्चय मांडला
शब्द उलगड़ता मनाला
पुनश्च निःशब्द मात्र झाला ....!
― अंबज्ञ
1
- ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला.
आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे..ठरवून घेतला नाही.. सुरुवातीला हा निर्णय किंवा विचार जयच्या गळी उतरवायला वेळ लागला... टीव्ही नाही म्हणजे आपल्या जगण्यातला एक महत्वाचा हिस्सा नाही, आपण इतरांपेक्षा मागे राहू, आसपासच्या जगामध्ये, आपण जिथे काम करतो त्या इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आपल्याला कळणार नाही, अशी काहीतरी भावना त्याच्या मनात असावी... त्याला मी समजावलं, ट्रायल बेस वर हे करून बघूया, काही अडलं तर घेऊ की टीव्ही.. असं म्हंटल्यावर तो तयार झाला...