आज रविवार. सकाळ पासूनच धमाल नुसती. आम्ही मुलं परसात खेळत होतो. लपाछपी चा खेळ म्हणुन मी एका आंब्याच्या झाडामागे लपलेले. एवढ्यात बाजूलाच असलेल्या सुक्या पानांच्या ढिगामध्ये काही तरी पडल्याचा आवाज झाला. पण बाहेर पडले तर पकडले जाईन म्हणून मी तिथुनच निरिक्षण करायला लागले.काहीच दिसेना.
थोड्याच वेळात चि....चि.....असा काहीसा आवाज झाला तिथे आणि मी ओरडत त्या दिशेने धावतच सुटले.
आई गं ! ते इवलेस चिमणीच पिल्लू, कुणी बरं त्याची पिस ओरबाडली असतील? पिसातुन रक्त येत होत, थोडी स्कीन पण निघाली होती. धड उडता पण येत नसाव. त्याला तसंच हातात घेऊन काहीही विचार न करता मी पळत सुटले ते थेट घरीच.
'आईईईई हे बघ ना, ये ना इकडे लवकर, काय झालं गं याला बघ ना'
आईने थोडं पाणी चमच्याने त्याच्या चोचीत घातल पण सगळंच बाहेर आलं आणि त्या पिल्लाने शेवटचा श्वास घेतला.
चिमणी म्हणजे काय वाटतं माला, काय सांगू ! माझा अगदी जीव की प्राण आणि त्या पिल्लाने तर माझ्या हातावरतीच प्राण सोडला होता.
दिवसभर खुप रडले, जेवले सुद्धा नाही. 'मला एक पिल्लू आणुन दे आत्ताच्या आत्ता' माझा पाढा चालूच. बाबानी खुपदा समजावून झाल पण काहीच उपयोग झाला नाही. लहान होते तेवढी अक्कल कुठून असणार! आजी माझ्या जवळ आली, मी तिचं ऐकायची ना म्हणून.
आजी- ' बाळ असं नको ते हट्ट करू नये, तु आता मोठी झाली की नाही आणि बघ ....... ..
तिचं वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच माझी धुसफूस सुरू ' तु... तु ....ना गपच बस आज्जे, ते काल एक पिल्लू मिळालं होतं ना ? मग ते का सोडून दिलस ???
कोकणातल कोलारु घर कालच एक पिल्लू घरात सापडलं होतं, आणि आजी ने ते बाहेर झाडावर सोडून दिल होत. ते माझ्या लक्षात आलं.
मी परत चालू- 'आज्जे तु मला आत्ताच्या आत्ता दुसर पिल्लू आणुन दे, आत्ता च्या आत्ता'.
उन्हाळ्याचे दिवस होते. आई स्वयंपाक घरात आंब्याच पन्हं करत होती. ऐकुन ऐकुन घेऊन सरळ बाहेर आली. माझ्या बघोटिला धरून त्याच हाताने माझ्या एक कानाखाली वाजवली. मी नुसती लाल झाले, गंगा जमुना ना आणखीनच पुर् आला.
आई चालू - ' चुप बस, एकदम चुप, मघा पासुन ऐकुन घेते , आजी ला उलट सुलट बोलते, काय वेड आहे या मुलीला, मारायचे आहे का त्या चिमण्या ना ???
चिमणी हवीय म्हणे, काल आजी ने बाहेर झाडावर सोडूली ना तिचं हि चिमणी आज मेली ती. पक्षाचे सुद्धा काही नियम असतात, माणसांचा हात एखाद्या पक्षाला लागला ना मग इतर पक्षी त्याला स्विकारत नाहीत,चोचीने टोचुन मारतात.आपल्या हाताचा वास येतो त्या पक्षाला म्हणून कदाचित.
एक दिवस शाळेला सुटी असेल तर तुम्ही मुलं सकाळ पासूनच बाहेर उंदडत असता ना??
तुला कोणी पकडुन ठेवल तर चालेल का???
आई खुप ओरडली, तरीही मी मात्र अर्धा-निम्मा दिवस पायात डोक खुपसून रडतच होती.
चिमणी हवीय म्हणून.
खुप वर्ष झाली आता, गावी कौलारू घर जाऊन स्ल्याप, प्लास्टर ची छोटेखानी इमारत आहे, आजी पण देवाघरी गेली, चिमणी दिसणं पण तुरळकच, गावी गेलेच तर माझ चिमणी पुराण आईकडून एकदा तरी दोहरल जातच. मी ही चालुच ठेवलंय माझं चिमणी प्रेम.
.
.
माझ्या बाल्कनीतला हा फोटो, गेले काही महिने हि बाई स्वेच्छेने येऊन बसते रोज. घान करते म्हणून माझ्या शिवाय घरी फारसं कोणाला तीच येण आवडत नाही. पण मला याचा काही फरक पडत नाही आणि तिला ही.
.
.
एखाद्या पक्षाला फक्त माणसाचा हात लागला म्हणून बाकीचे पक्षी टोचुन मारतात. (आईच्या म्हणण्यानुसार, तिचा समजही असेल,खरं खोटं ते पक्षीच जाणोत) (कदाचित पंजी, आजी,आई पिढ्यांन पिढ्यांची समजुत असावी, कारण आई ला हे तिच्या आईने सांगितले असं ती म्हणते! असो यावर आपलं मत जाणून घ्यायला आवडेल.)
पण हे खरं असेल तर मग माझ्या मनात एक प्रश्न नेहमी टोचत राहतो! माणसं एवढी चुकतात, भरकटतात, अक्षम्य गुन्हे सुद्धा करतात, तरीही हा समाज आणि आपण त्यांचा स्विकार करतोच ना?
'मग आपण ज्यांना अज्ञानी समजतो त्या पक्षाचा न्याय मोठा की स्वतःला सर्वज्ञानी समजणाऱ्या माणसांचा'???
मलासुद्धा खूप आवडतात चिमण्या.
मलासुद्धा खूप आवडतात चिमण्या.. लहानपणी खूप वेळ घालवलाय चिमण्यांच्या निरीक्षणात. माझ्या घरी रोज 6-7 चिमण्या येतात. आई त्यांच्या साठी पाणी आणि तांदूळ ठेवत असते. छान वाटतं त्यांना खाताना बघून.
चिमणी ला मानवी स्पर्श चालतं नाही असंच ऐकलंय.
@Srd-चिमणी ला मानवी स्पर्श
@Srd-चिमणी ला मानवी स्पर्श चालतं नाही असंच ऐकलंय.
- धन्यवाद
माझी पण लाडकी चिमणी..
माझी पण लाडकी चिमणी..
माझ्या मते लहान मुलांनी चिमणी पाळायचा हट्ट करू नये म्हणून मोठे असं सांगत असावेत.
मोठा झाल्यावर दोन तीन वेळा चिमण्या पकडून त्यांच्या पायात ओळखी साठी रिंग घातलेल्या.पण कधी त्यांना त्रास झालेला दिसला नाही.
माझ्या घरी पण तिन्ही गॅलरी मध्ये घरटी करतात.कधी कधी तर एकाच वेळी असतात.
माझी अंधश्रद्धा ज्या घरात सुख व समृद्धी असेल तिथे त्या घरटं बांधतात.
चिमणीला मानवी स्पर्श चालतं
चिमणीला मानवी स्पर्श चालतं नाही असंच ऐकलंय सुद्धा
सरळसाधा-माझी अंधश्रद्धा ज्या
सरळसाधा-माझी अंधश्रद्धा ज्या घरात सुख व समृद्धी असेल तिथे त्या घरटं बांधतात.
मला ही असच वाट्त.
jayshree deshku-धन्यवाद
फारच छान.लीहीलय....नास्टँलजीक
एखाद्या पक्षाला फक्त माणसाचा
एखाद्या पक्षाला फक्त माणसाचा हात लागला म्हणून बाकीचे पक्षी टोचुन मारतात. >>
पुर्वी "बालचित्रवाणी" मद्धे अशा आशयाची एक गोष्ट होती की माणसाचा हात लागलेल्या पिल्लाला त्या पिल्लाचे भाईबंद टोचुन मारतात.
मला नेहेमी ती गोष्ट बघताना रडु यायचं ....
dilipp- कावळ्याच माहीत नाही
dilipp- कावळे माणसामध्ये लवकर मिक्स्अप होतात, असं ऐकलंय मी सुद्धा. पण चिमणी च्या बाबतीत अस नसत.....खर मलाही माहित नाही. आपण शेयर केलेला फोटो मस्त आहे.
"स्मिता श्रीपाद - मला नेहेमी ती गोष्ट बघताना रडु यायचं ."
अनुभव शेयर केल्या बद्दल धन्यवाद .
चिमणी आणि साळुंकी यांच्या
चिमणी आणि साळुंकी यांच्या गटाने एकाला टोचून मारताना पाहिले आहे. का मारतात माहित नाही.
फोटो चांगले आहेत.
> 'मग आपण ज्यांना अज्ञानी समजतो त्या पक्षाचा न्याय मोठा की स्वतःला सर्वज्ञानी समजणाऱ्या माणसांचा'??? > तुम्हाला काय वाटतं?
एकदा घरात चिमणी चुकुन आलेली
एकदा घरात चिमणी चुकुन आलेली आणि मग वेड्यासारखी कुठेही धडका द्यायला लागली. खिडकी उघडुनही तिकडे जईना. मग मी आणि माझ्या आईने चादरीचा पडदा करुन त्यात तिला पकडली. सोडुन द्यायच्या आधी त्या चिमणीच्या पायात समोरच पडलेला लाल रबरबँड दोन वेढे घेउन टाकला. हातात असताना मात्र ती चिमणी अगदी गुपचुप होती. अजिबात धडपड/फडफड नाही. आम्ही सोडल्यावर पण ती २-४ सेकंद बसुनच होती आणि मग अचानक उडुन गेली. सगळे म्हणत होते आता बाकीच्या चिमण्या तिला टोचुन मारणार. आम्हाला पुढचे २-३ दिवस ती दिसलीच नाही. मग अचानक एकदा दिसली. मस्त टुनटुन उड्या मारत होती. पुढचे ५-६ महीने ती अधुन मधुन दिसत रहायची. मग गायब झाली. किंवा तिच्या पायतला रबरबँड निघाला असेल.
ॲमी - तुम्हाला काय वाटतं?
ॲमी - तुम्हाला काय वाटतं?
मला वाटतं -अर्थातच पक्षाचा न्याय मोठा.
मृत्यू ही शिक्षा देताना high court त सुद्धा पुनर्विचार याचीका दाखल करतातच ना, पक्षामध्ये अस का ही नसाव.
व्यत्यय- सगळे म्हणत होते आता बाकीच्या चिमण्या तिला टोचुन मारणार.
तोच समज आमच्या इकडेपण आहे.
अरे बापरे मॉब लिचिंगच समर्थन
अरे बापरे मॉब लिचिंगच समर्थन करताय का तुम्ही?